|| ऑगस्ट महिन्याचे राशीफळ ||
मेष
ग्रहांची स्थिती :- महिन्याच्या अगदी सुरवातीला शुक्र राशीच्या षष्ट स्थानात येत आहे, तर मध्यामध्ये म्हणजे १७ तारखेला ,रवी चतुर्थातुन पंचमात येत आहे.बुध आणि राहु चतुर्थ स्थानामध्ये, सप्तम स्थानामध्ये गुरुचे भ्रमण, भाग्य स्थानात शनीचे भ्रमण, दशमा मध्ये मंगळ केतु, तर राशी मध्ये हर्षल, ही ग्रहस्थिती पाहता मेष जातकांसाठी हा महीना काहीसा अनुकुल, बराचसा प्रतिकुल राहील.प्रथामातल्या हर्षलमुळे रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. दशम स्थानात नुकतेच घडुन गेलेले चंद्रग्रहण जीवनात काही नवीन बदल करण्याची नांदी देईल.
आरोग्य :- महिन्याच्या सुरवातीला षष्टात आलेला शुक्र आरोग्याबाबतीत संमिश्र फळ देईल,योग्य निदान झाल्यामुळे औषधांची मात्र लागु होईल,मात्र प्रकृतीची हेळसांड करून चालणार नाही.मानसिक ताणतणाव नियंत्रणात करावे लागतील.
आर्थिक :- आर्थिक स्थिती बाबत कुठल्याही भ्रमात न राहता वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल,तसेच त्रासदायक व्यवहारापासुन दुर राहावे लागेल.आर्थिक नियोजन केल्यास महीना सुखकर जाईल.
नौकरी व्यवसाय :- दशम स्थानात घडलेलं चंद्र ग्रहण नवीन बदलाची नांदी देणारे राहील जुन्या गोष्टी सुटून नवीन गोष्टी सुरु होतील. कामातला उत्साह टिकवुन ठेवावा लागेल.वाढलेली जबाबदारी दडपण देईल. व्यवसायाबाबतीत महीना आव्हानात्मक राहील.भांडवलाची पुर्तता आणि खर्चाचा ताळमेळ, याचा जम बसवावा लागेल,आर्थिक देणी बाबत धोरण आखावे लागेल,व्यावसायिक योजनेचा सखोल अभ्यास केल्यास नवीन कल्पना राबवणे शक्य होईल.
कोर्ट कचेरी :- हा महीना तसा तापदायकच राहील मागील महिन्यातील तारखा पुढे ढकल्या जातील,मागील महिन्यात काही न झाल्यामुळे ,कोर्टाच्या खेपा माराव्या लागल्यामुळे, निरुत्साह जाणवेल. स्थावर मालमत्तेचे दावे मानसिक तणाव देणारे राहतील,वकिलांशी विनाकारण हुज्जत घालणे टाळावे .
नातेसंबध :- या बाबतीत अहंकाराचे तत्त्व सोडावे लागेल,आपले आपणच मनोधैर्य उंचावुन, तुटलेली नाती सांधुन विशिष्ट प्रयत्न करावेत,निरपेक्ष धोरण अवलंबविल्यास मनस्ताप होणार नाही.जोडीदाराशी जुळवून घेतल्याने काही आनंद देणाऱ्या घटना घडतील. महिन्याच्या मध्यात आलेला रवी दिलासादायक राहील.
संतती :- या बाबतीत महिन्याच्या मध्यात आलेला रवी दिलासादायक राहील प्रलंबित प्रवेश प्रक्रिया मार्गी लागेल.मनासारख्या अभ्यासक्रमाला खुप प्रतीक्षा अंती प्रवेश मिळाल्याने उत्साह द्विगुणीत होईल,पालकांची चिंता मिटेल.
वृषभ
ग्रहांची स्थिती :-महिन्याच्या सुरवातीला शुक्र पंचमात जाणार असुन,महिन्याच्या मध्याला रवी चतुर्थात येईल.गुरु चे भ्रमण षष्टात असुन,शनी अष्टमात स्थित राहील.तृतीय स्थानामध्ये राहु, आणि बुधा चे भ्रमण राहील.तर भाग्यामध्ये मंगळ-केतु भ्रमण करतील. ही ग्रहदशा पाहता,वृषभराशी साठी हा महीना बऱ्याच अंशी प्रतिकुल राहील.महिनाभर अज्ञात तणाव जाणवेल.
आरोग्य :-मागील महिन्यातील दुखणी या महिन्यात ही जाणवतील.जुनाट व्याधी डोके वर काढतील.रक्तदाब आणि मधुमेह ग्रस्तानी प्रकृतीची हेळसांड करून चालणार नाही.
आर्थिक :- या बाबतीत हा महीना संमिश्र जरी असला, तरी काही आकस्मिक धनलाभ होतील.आर्थिक तणावातून मुक्त होण्याचे मार्ग दृष्टीक्षेपात येतील,जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळाल्यामुळे एक मोठा दिलासा मिळेल.
नौकरी व्यवसाय :- नौकरी बाबती मध्ये संयमाची भूमिका घेऊन वाटचाल घ्यावी लागेल,वरिष्ठ सहकार्याशी जुळवून घेताना विशेष मेहनत लागेल.एखाद्या वाढीव जबाबदारीची टांगती तलवार राहील.मान-अपमानाचे प्रसंग उद्भवतील.
व्यवसायामध्ये आव्हानात्मक काळ राहील,भांडवलाची जुळवाजुळव करताना तणावाची स्थिती उद्भवेल.आर्थिक आपत्तीतुन मार्ग काढताना धैर्याने वाटचाल करावी लागेल,श्रद्धा आणि सबुरीचे धोरण ठेवल्यास हा महीना कसाबसा रेटता येईल, तुर्तास नवीन योजना पुढे ढकलाव्यात.
कोर्ट कचेरी :- या बाबतीत महिन्याच्या मध्यानंतर आलेला रवी अनुकुल राहील.कोर्ट कचेरीची रेंगाळलेली काम मध्यानंतर गतिमान होतील,वकिलांचा मिळालेला कायदेशीर सल्ला पुढील वाटचालीसाठी सहाय्य करेल.स्थावर मालमत्तेचे खटले मात्र रेंगाळतील.
नातेसंबध :- नातेसंबंधा बाबतीमध्ये हा महीना तारेवरची कसरत पाहणारा राहील,झालेले गैरसमज दुर करता-करता नाकी नऊ येतील,मध्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल.विशेष प्रयत्न करून काही उपयोग होणार नाही.जोडीदाराशी कसेही करून जुळवुन घ्यावे लागेल,तणावाचे प्रसंग हातळल्यास परिस्थिती उत्तम राहील.
संतती :-विद्यार्थी मंडळींना हा महीना आव्हानात्मक राहील,नवीन अभ्यासक्रमाला सामोरे जाताना काहीसे दडपण जाणवेल,मात्र स्वतःवर विश्वास ठेवल्यास चैतन्य आणि उत्साह प्राप्त होईल,रेंगाळलेली प्रवेश प्रक्रिया महिन्याच्या सुरवातील वेग घेईल, चिंतीत असलेले पालक मध्यानंतर बरेचसे चिंतामुक्त होतील,शैक्षणिक खर्च वाढविणारा हा महीना राहील.
मिथुन
ग्रहांची स्थिती :- महिन्याच्या सुरवातीला शुक्र चतुर्थ स्थानामध्ये येईल,तर रवी मध्यला तृतीय स्थानी येईल धन स्थानात बुध-राहु पंचामध्ये गुरु,सप्तमामध्ये शनी आणि अष्टमामध्ये मंगळ केतु हे ग्रहमान पाहता मिथुन राशींच्या जातकांसाठी ऑगस्ट महीना वादविवादांचा राहील.त्यामुळे प्रगती मध्ये अडथळे निर्माण होतील.
आरोग्य :-प्रकृती विषयी हा महीना चिंतेत भर घालणारा राहील. दुखापतींच आणि अपघातांच्या सत्रामुळे अस्थिरता जाणवेल.योग्य दक्षता आणि वैद्यकीय चिकित्सा केल्यास स्थितीवर नियंत्रण मिळवता येईल.
आर्थिक :- या बातीत हा महीना चिंतातुर वातावरण निर्माण करणारा राहील.घटलेला उत्पन्नाचा स्त्रोत आणि वाढलेली देणी यामुळे आर्थिक नियोजन कोलमडुन पडेल.उत्पन्न वाढीचे उपाय केल्यास याच्यातुन मार्ग काढता येईल.
नौकरी व्यवसाय :- या बाबतीत हा महीना दिलासादायक राहील.वाढीव जबाबदारी मुळे वरिष्ठांची मर्जी संपादित करता येईल,मात्र कामाचे कठोर नियोजन करणे क्रमप्राप्त राहील.नवीन नौकरीच्या शोधात असाल तर नवीन संधी मध्ये विलंब राहील, असलेली नौकरी टिकवण हितकारक राहील.व्यवसायाबाबतीत अडथळ्यांची शर्यत देणारा हा महीना राहील.आव्हानात्मक स्थितीतुन मार्ग काढताना कस लागणार आहे.प्रयत्नांती परमेश्वर या न्यायाने वाटचाल करावी लागेल,उत्पन्नात काहीसे ठोस नियोजन करावेच लागेल.
कोर्ट कचेरी :-या बातीत हा महीना जरी संथ असला तरी काही ठोस प्रयत्नांमुळे मार्गी लागु शकतो आहे,हाती आलेल्या काही नवीन पुरावे आणि कागदपत्रामुळे खटल्याला बळ येईल.वकील मंडळींशी सतत चर्चा यातुन काही मार्ग निघेल.स्थावर मालमत्तेचे प्रकरण काहीसे गंभीर स्वरूप धारण करतील.
नातेसंबध :- या बातीत काही विशेष सुधारणा अपेक्षुन चालणार नाही त्यामुळे जैसे-थै स्थित राहील वाद-विवाद आणि तणावाचे प्रसंग टाळणे इतकेच हातात राहील.राग,लोभ दुर ठेवल्यास नातेसंबंधात सुधारणा होईल.पती-पत्नी नातेसंबंधात कभी ख़ुशी कभी गम असे वातावरण राहील.
संतती :- विद्यार्थी मंडळींना हा महीना अप्रतिम राहील.मनासारखा अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रिया झाल्यामुळे उल्हास आणि आनंदाचे वातावरण राहील.पालक वर्गांची चिंता मिटलेली असेल.
कर्क
ग्रहांची स्थिती :- महिन्याच्या सुरवातीला शुक्र धनस्थानातुन तृतीय स्थानात येत असुन रवी राशीतुन धनस्थानी जाईल,राशी मध्ये राहु,बुध चतुर्थामध्ये गुरु,षष्टा मध्ये शनी, सप्तमामध्ये मंगळ- केतु हे ग्रहमान पाहता कर्क राशींसाठी हा महिना संमिश्र फळ देणारा राहील.
आरोग्य :-षष्टात ठाण मांडुन बसलेला शनी आरोग्याचे प्रश्न निर्माण करणारा राहील,स्नायुंचा त्रास पाठीचे दुखणे मानसिक तणाव बळावेल.पथ्यपाणी योग्य ठेवल्यास आरोग्याची स्थिती भीषण होणार नाही, मानसिक तणावाला सामोरे जातांना मन स्थिर ठेवण गरजेचे आहे.
आर्थिक :- महिन्याच्यामध्ये धनात आलेला रवी आर्थिक मळभ बऱ्या पैकी दुर करेल,आर्थिक तणावाच्या प्रसंगातुन सुटका राहील. जुनी येणी वसुल झाल्यामुळे,तात्पुरता आर्थिक प्रश्न निकाली निघेल,त्या बळावर महीना रेटता येईल,उत्पन्न वाढीचे उपाय केल्यामुळे उत्पन्न वाढलेलं असेल.स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातुन हाती पैसा येईल.
नौकरी-व्यवसाय : या बाबतीत हा महीना संमिश्र फळदायी राहील,नौकरीच्या ठिकाणी जाणवणारी अस्थिरता,मानसिक तणावाला आमंत्रण देणारी राहील, मात्र कामात झोकुन दिल्यास हा तणाव सहज टाळता येईल,नौकरीच्या नवीन संधी दृष्टीक्षेपात येतील.
व्यवसायाबाबतीमध्ये कडक धोरणांची अंमलबजावणी करावी लागेल,आळस झटकुन कामाला लागल्यास,हाती बरेच काही प्राप्त होईल,भांडवलासाठी केलेला प्रयत्न मध्यानंतर मार्गी लागेल,नवीन करार-मदार होतील.
कोर्ट कचेरी :- या बाबतीत हा महीना दिलासादायक राहील प्रलंबित खटल्याचा निकाला पर्यंतचा प्रवास दृष्टीक्षेपात येईल,वकिलांचे सहकार्य आणि सलग पडलेल्या तारखांमुळे खटले मार्गी निघतील स्थावर मालमत्तेचे प्रश्न निकाली निघतील,त्यातुन आर्थिक लाभ अपेक्षित आहेत.
नातेसंबध :- या बाबतीत हा महीना मान-अपमानाचे प्रसंग निर्माण करणारा राहील,अहंकार बाजुला ठेवुन नातेसंबंधाना सामोरे जावे लागेल,भावंडांशी वाद टाळावा जोडीदाराशी वाद टाळुन नम्र धोरण स्वीकारल्यास कटु प्रसंगांना सामोरे जावे लागणार नाही तुटु-स्तर ताणने हा प्रकार वर्ज्य करावा अन्यथा नातेसंबंध संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
संतती :- या बाबतीत हा महीना बरा राहील,विद्यार्थी मंडळींचा उत्साह द्विगुणीत होईल,प्रवेश प्रक्रिया मार्गी लागल्यामुळे पालकांची चिंता मिटलेली असेल संततीचा हट्ट पुरवत असताना पालकांना खिसा रिकामा करावा लागेल.
सिंह
ग्रहांची स्थिती :- धनस्थानी जाणारा शुक्र आणि महिन्याच्यामध्ये राशी मध्ये येणारा रवी,तृतीय स्थानामधला गुरु,पंचमातला शनी, षष्ट स्थानातला मंगळ-केतु आणि व्येय स्थानातला बुध-राहु ही स्थिती पाहता,सिंह राशींच्या जातकांसाठी ग्रहांचा उन-सावलीचा खेळ अनुभवयास येईल.राशीस्वामी रवीची राशीतील उपस्थिती प्रतिकुल ग्रहांवर मात करणारी जरी असली तरी मानसिक ताण-तणावाला सामोरे जावे लागेल.
आरोग्य :- आरोग्याच्या तक्रारी वरचेवर जाणवतील,पाठीचे दुखणे, गुडघ्याचा आणि पायाचा त्रास आणि झोपेतील अनियमितता या अवस्थेवर महिन्याच्या मध्यानंतर सुधारणा अपेक्षित आहेत.आरोग्य बाबतीत हयगय करून चालणार नाही तज्ञ वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.
आर्थिक :-आर्थिक तणावाला सौम्यता येईल,धन स्थानातील शुक्रामुळे तसेच मध्याला रवीचा राशीतील प्रवेश आर्थिक विवंचनेतुन बाहेर काढणारा राहील.राहु मुळे वाढीव खर्च आटोक्यात आणताना त्रेधातिरपट उडणार आहे.घटलेल उत्पन्न आणि वाढलेला खर्च ह्याचा ताळमेळ साधताना तारतम्य बाळगाव लागेल.
नौकरी व्यवसाय :- या बाबतीत हा महीना म्हणावा तितका दिलासा देणारा राहणार नाही,मात्र हळु हळु परिस्थिती आटोक्यात येईल,धीर धरल्यास आणि संयम बाळगल्यास हे हि दिवस निघून जातील.अंगमेहनत आणि बौद्धिक कौशल्य पणाला लावुन मेहनत करावी लागेल,वादाचे प्रसंग टाळावे.
व्यवसाया बाबतीत हा महीना आव्हानात्मक जरी असला तरी, चिकाटीचे धोरण ठेवल्यास महिन्याच्या मध्यानंतर व्यावसायिक तणाव निवळुन जाईल,नवीन करार-मदार करताना तांत्रिक मुद्याची खबरदारी घ्यावी,स्वाक्षरी करताना मजकूर २-३ वेळेस वाचवा.चुकीच्या निर्णयाच फटका बसु शकतो आहे.
कोर्ट कचेरी:- या बाबती मध्ये हा महीना दिलासादायक नक्कीच राहील,प्रतिपक्षावर मात करण्यासाठीचे मुद्दे कठोर परिश्रमामुळे हाती येतील,त्यामुळे दहा हत्तींच बळ संचारेल वकील मंडळींचं सहकार्य आणि तारखांची अनुकुलता लाभल्यामुळे खटल्यामध्ये गती येण्यास मदत होईल.स्थावर मालमत्तेचे खटले अंशत: निकाली निघतील.
नातेसंबध :- नातेसंबंधातील स्थिरतेसाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.झालेले गैरसमज आणि थांबलेला सवांद पुर्नस्थापित करण्यासाठी हा महीना योग्य राहील.ज्येष्ठ मंडळी आणि भावंडाशी विशेष करून नमत धोरण स्वीकारल्यास उत्तम राहील.जोडीदाराशी विशेष सवांद प्रस्थापित करावा लागेल.एखादा लहान गैरसमज उग्र रूप धारण करण्यागोदर त्याला आटोक्यात आणावा लागेल.
संतती :- विद्यार्थी वर्गाना हा महीना अडथळ्यांची शर्यत देणारा राहील.प्रवेश प्रक्रियेत झालेला विलंब आणि मनासारखा प्रवेश न मिळाल्यामुळे झालेला हिरमोड,त्यामुळे मानसिक तणाव जाणवेल, त्यामुळे पालकांना चिंता जाणवेल.विद्यार्थी वर्गाला मेहनती शिवाय पर्याय राहणार नाही.
कन्या
ग्रहांची स्थिती :- महिन्याच्या सुरवातीला राशीमध्ये येणारा शुक्र,महिन्याच्या मध्याला लाभातुन व्येयात जाणारा रवी,तसेच धनस्थानी असलेला गुरु,चतुर्थात असलेला शनी,पंचमातला मंगळ केतु आणि लाभातला बुध-राहु.हे ग्रहमान पाहता कन्या राशीसाठी हा महीना कठीण असा जाईल समस्यांना तोंड देताना काळजी चिंता तसेच ताण-तणाव जाणवेल.
आरोग्य :- या बाबती मध्ये हा महीना बरा राहील.व्याधींवर झालेलं निदान आणि योग्य औषध उपचारामुळे बरे वाटेल.साथी च्या रोगापासुन जपावे.या महिन्यातील बराचसा खर्च आरोग्यावर असण्याची शक्यता आहे.
आर्थिक :- या बाबतीत महिन्याच्या पुर्वार्धात आर्थिक विवंचना युक्त राहील.उत्तरार्धात मात्र आर्थिक स्थिती मात्र पुर्वपदावर येईल.अर्थकारणाच बिघडलेलं तंत्र नियोजनबद्ध जुळविल्यास काळजी राहणार नाही.उत्पन्न वाढीचे पर्याय शोधावे लागतील.
नौकरी-व्यवसाय : या बाबतीत हा महीना फार दिलासादायक असणार नाही मागील पानाहुन पुढे असे वातावरण राहील.कामाच्या ठिकाणी उत्साह ओतावा लागेल मेहनती शिवाय पर्याय राहणार नाही.नवीन नौकरीची संधी सध्या दृष्टीक्षेपात येणार नाही तणाव मुक्तीसाठी परिस्थितीशी जुळवुन घ्यावे लागेल.व्यवसायामध्ये बिकट परिस्थितीतुन मार्ग काढताना,ओढा-ताण जाणवेल.घसरलेली पत पुन्हा निर्माण करताना दिवस-रात्र एक करावे लागेल,कठोर कष्टाशिवाय पर्याय नाही.भांडवलाची व्यवस्था करावी लागेल.
कोर्ट कचेरी :- या बाबतीत मागील महिन्याचा प्रवास याही महिन्यात चालु राहील,संथ गतीमुळे उत्साह मावळलेला असेल तारखांबाबतीत रटाळपणा जाणवेल.स्थावर मालमत्ते संबंधात कोर्टा बाहेर तडजोड जर करता आली तर उत्तम राहील.
नातेसंबध :- या बातीत हा महीना उत्तम राहील,परिस्थितीशी तडजोड केल्यामुळे नाते संबंधात विलक्षण सुधारणा होईल. जोडीदाराचा एखादा हट्ट पुरवताना खिसा रिकामा करावा लागेल,भावंडाशी विवाद टाळावा शक्यतो जुळवुन घ्यावे.
संतती :- या बाबती मध्ये पालक वर्गाची चिंता वाढवणारा महीना राहील.एकतर शैक्षणिक खर्चाचा भुर्दंड आणि पाल्यांचा हट्ट पुरवताना थोडी ओढाताण राहील,विद्यार्थी वर्ग नवीन शैक्षणिक वर्षामुळे उत्साहित राहतील अभ्यासक्रमाशी जुळवून घ्यावे लागेल.
तुळ
ग्रहांची स्थिती :- महिन्याच्या लाभातुन व्येयात आलेला शुक्र, महिन्याच्या मध्यान्हाला दशमातुन लाभत गेलेला रवी,राशीत असलेला गुरु,तृतीयेतला शनी,चतुर्थातला मंगळ-केतु,दशमातला बुध-राहु हे ग्रहयोग पाहता तुळ राशी च्या जातकांसाठी हा महीना अतिश्रमाचा तसेच खर्चाचे प्रमाण वाढविणारा आणि अडथळ्यांचा निश्चित राहील.
आरोग्य :- या बाबतीत मागील महिन्यापेक्षा सुधारणा अपेक्षित राहतील,वैद्यकीय सल्ला आणि आहाराचे नियोजन तसेच व्यायाम आदी गोष्टींचा अवलंब केल्यास प्रकृतीच्या काळज्या दूर होतील, श्रावण महीना मनाला हर्ष उल्हासित तसेच चैतन्यमय करून जाईल.
आर्थिक :- अर्थचक्राबाबतीत हा महीना खर्चाचा राहील,आर्थिक तणावाला सामोरे जातांना मनाचे संतुलन ढळु देऊ नका,एखादे कर्ज प्रकरण मार्गी लागल्यामुळे,उत्तरार्धात आर्थिक चिंता मिटतील.
नौकरी व्यवसाय : या बाबतीत हा महीना आव्हानात्मक राहील,नौकरी मध्ये मनाविरुद्ध काम कराव लागल्यामुळे झालेला हिरमोड सहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही मात्र या कामातुनच पुढच्या कामाची बीज रोवली जातील,कामामध्ये झोकुन दिल्यास कर्तुत्तव सिद्ध होईल याची फळे गुरु पालटानंतर दिसून येतील.
व्यवसाया बाबती मध्ये हा महीना प्रगतीची बीज रोवणारा राहील,आलेल्या आव्हानांना सामोरे जातांना सकरात्मक वृत्ती ठेवल्यास मार्ग निश्चित मिळेल.गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील भांडवलासाठी नवीन पर्याय शोधावे लागतील.
कोर्ट कचेरी :- या बाबतीत हा महीना आकस्मिक लाभ देऊन जाईल.प्रलंबित खटले निकालापर्यंत निश्चित येतील त्यामुळे, पक्षकारांची तारांबळ उडेल,त्यामुळे वकील मंडळींशी विवाद टाळावा.स्थावर मालमत्तेचे विवाद ऐरणीवर येतील.
नातेसंबध :-या बाबतीत गुरु ची भक्कम साथ मिळाल्यामुळे श्रावणासारखा उत्साह जाणवेल बरसणाऱ्या श्रावण सरीत भिजताना नाते संबंध हि चिंब भिजून निघतील, ममत्त्व,प्रेम,जिव्हाळा याची अनुभूती मिळेल.भावंडांशी महत्त्वाच्या विचारांवर चर्चा होईल जोडीदाराला घेऊन निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा योग येईल.
संतती :- विद्यार्थी वर्गासाठी हा महीना “श्रावण मासी | हर्ष मानसी” असा राहील.नवीन पुस्तके,नवीन पाठ्यक्रम,नवीन शिक्षक लाभल्यामुळे मन मोहरून जाईल.पालक वर्गाला विद्यार्थ्यांची हौस पुरवताना नाकी नाऊ येतील.
वृश्चिक
ग्रहांची स्थिती :- महिन्याच्या सुरवातीला दशमातुन लाभत आलेला शुक्र, महिन्याच्या मध्याला भाग्यातुन दशमात आलेला रवी,व्येयातला गुरु, धनेतला शनी, तृतीये मधला मंगळ-केतु आणि भाग्यातला बुध-राहु हे ग्रहमान पाहता वृश्चिक राशीसाठी श्रावण धारा आल्हादायक बरसताना भाव भावनांचा पिसारा फुलविण्यास सांगणारा राहील .वाढलेली धावपळ आणि अडथळ्यांची शर्यत ह्याही महिन्यात राहील.
आरोग्य :- या बाबतीत हा महीना दिलासादायक राहील,बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित असलेला व्यायाम आणि योगासनाचा उपक्रम या महिन्यात हाती घ्यावा लागेल,पाणी उकळुन प्यावे मानसिक ताण-तणाव हाताळताना प्रसन्न राहण्याला महत्त्व द्यावे.मनातला सल बोलुन दाखवावा.
आर्थिक :- या बातीत हा महीना उर्जा पुरवठा करणारा राहील, आर्थिक गोष्टीमुळे अडलेली काम ह्या महिन्यात सुरळीत होतील, दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले कर्ज प्रकरण मार्गी लागल्यामुळे हाती पैसा येईल.आलेल्या पैशाचे योग्य नियोजन केल्यास काळजी राहणार नाही.
नौकरी व्यवसाय :- या बाबतीत हा महीन्यातला पूर्वार्धामधला तणाव उत्तरार्धात घालविणारा राहील,नौकरी मध्ये अप्रतिम फळे महिन्याच्या उत्तरार्धात मिळतील. मनासारखे काम मिळाल्यामुळे कामाचा उत्साह द्विगुणीत होईल,अनपेक्षित बढती मिळाल्यामुळे उत्साह जाणवेल,नवीन नौकरीच्या शोधात असणार्यांनी प्रयत्न केल्यास नवीन संधी उपलब्ध राहील.
व्यवसाया बाबतीत हा महीना काही उत्तम फळ देणारा राहील. व्यवसायाचे नियोजन आणि दीर्घकालीन योजनांची सांगड घातल्यास, प्रगतीची बीज रोवली जातील. भांडवलाची पुर्तता झाल्यामुळे नवीन कामांचे नियोजन सहज पार पडेल.
कोर्ट कचेरी :- या बाबतीत हा महीना संथ फळे देणारा रहील. वकिलांचा पाठ पुरावा करावा लागेल,स्थावर मालमत्तेचे खटले कोर्टा बाहेर सोडविल्यास उत्तम राहील.
नातेसंबध :- या बाबतीत हा महीना काही गोड तर काही कटु अनुभव देणारा राहील. आप्त इष्ट आणि भावंडाशी झालेले मतभेद उग्र रूप धारण करतील, त्याला वेळीच आवर घालावा श्रद्धा आणि सबुरी हेच धोरण ह्या महिन्यात कामी येईल. जोडीदाराशी वरचेवर खटके उडतील.
संतती :- या बाबतीत हा महीना एक नवीन दिशा देणारा राहील, विद्यार्थी मंडळींना मनासारखा प्रवेश लाभल्यामुळे उत्साह जाणवेल.नवीन अभ्यासक्रमाची सांगड घालताना उडालेली धावपळ हा एक अविस्मरणीय अनुभव राहील,पालक वर्ग विद्यार्थ्यांच्या यशामुळे आनंदात राहील.
धनु
ग्रहांची स्थिती :- महिन्याच्या सुरवातीला दशमामध्ये आलेला शुक्र लाभ स्थानी असलेला गुरु,राशीत असलेला शनी,धनस्थानी असलेला मंगळ-केतु,अष्टमात असलेला राहु-बुध हि ग्रहस्थीती पाहता धनु राशीसाठी संमिश्र फळ प्राप्ती देणारा महीना राहील.आर्थिक अडचणीमुळे चिंता आणि तणाव वाढतील.
आरोग्य :- या बातीत मध्ये हा महीना जुनाट व्याधींचे डोके वर काढणारा राहील.वैद्यकीय उपाययोजना मध्ये दिरंगाई करून चालणार नाही. शरीराची झालेली झीज या महिन्यात सकस आहार- योग्य विहार आणि मनाची प्रसन्नता या गोष्टी महत्त्वाच्या राहतील.
आर्थिक :- या बाबतीत मागील महिन्याची घसरण ह्या महिन्यात शुक्रामुळे थोडी आटोक्यात येईल .लाभातला गुरु आर्थिक चिंतेतुन बाहेर काढणारा राहील,उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न फलद्रुप होतील.
नौकरी व्यवसाय :- नौकरी बाबतीत जैसे थै स्थिती राहील, कामातली संथ गती महिन्याच्या उत्तरार्धात गतिमान होईल,नवीन नौकरीचा शोध ह्या महिन्यात पुर्णत्त्वास जाणार नाही व्यवसायाबाबतीत नवीन संधी निर्माण करणारा महीना राहील.संधीचे सोने करणे कि वाया घालवणे,याच्यावर यश अपयश अवलंबुन राहील,भांडवलाची पुर्तता पुर्वार्धात अपेक्षित राहील.
कोर्ट कचेरी :- मागील महिन्यातील परिस्थिती या महिन्यात आटोक्यात येईल.कागदपत्रांची पुर्तता करताना धावपळ उडेल,स्थावर मालमत्तेचे विवाद मार्गी लागतील.
नातेसंबध :- काही कटु अनुभव देणारा हा महीना राहील, मतभेदांची दरी सांधली नाही तर वाढेल,भावंडांशी जुळवुन घेणेच हितकारक राहील,जोडीदाराशी संतुलन साधल्यास मनस्तापातुन सुटका राहील.
संतती :- विद्यार्थी वर्गाला भरीव दिलासास देणारा हा महीना राहील. श्रावणातला हर्ष उल्हास अनुभवताना नवीन पाठ्यक्रम आणि अभ्यासाला सामोरे जातांना मन प्रचंड उत्साहित राहील.पालक वर्ग चिंता मिटल्यामुळे आनंदी राहील.
मकर
ग्रहांची स्थिती :-राशी मध्ये असलेला मंगळ-केतु, सप्तमात असलेला बुध-राहु,महिन्याच्या मध्याला अष्टमात जाणारा रवी,भाग्यातला शुक्र,दशमातला गुरु आणि व्येयातला शनी हे ग्रहमान पाहता मकर राशी साठी हा माहीना संमिश्र फळ देणारा राहील,ग्रहमानाची साठी कमी तर कधी जास्त,असा उन्ह-पावसाचा खेळ राहील.
आरोग्य :- बिघडलेली प्रकृती मानसिक ताणताणाव आणि सतत चे दुखणे यामुळे त्रस्त राहाल,दुखणे अंगावर काढू नका जुनाट व्याधींसाठी उपाययोजना करणे क्रमप्राप्त राहील.
आर्थिक :- या बाबतीत हा महीना आर्थिक चिंता वाढवणारा महीना राहील.अविचाराने घेतलेला निर्णय अंगलट येण्याची शक्यता राहील,आर्थिक अडथळ्यांची शर्यत ह्या महिन्यात पार पाडावी लागेल वाढलेले आकस्मित खर्च आ-वासुन उभे राहतील,आर्थिक नियोजन आणि बचतीवर भर द्यावा लागेल.
नौकरी व्यवसाय :- हा महीना आव्हानात्मक तसेच संघर्षशील जाईल,नको ते वाद उद्भवल्यामुळे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता राहील,श्रद्धा सबुरीचा मंत्र जपल्यास हा महीना कसा-बसा रेटता येईल आहे ते टीकवण्याला प्राधान्य द्यावे.
व्यवसाया बाबतीत हा महीना प्रचंड दडपण देणारा राहील,भांडवलाची गरज पुर्ण करताना प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागेल,हाती फार काही येणार नाही.
कोर्ट कचेरी :- या बाबतीत या महिन्यात मात्र खटल्यांना गती मिळेल प्रलंबित खटले मार्गी लागतील वकील मंडळींशी चर्चा करावी लागेल,स्थावर मालमत्तेचे विवाद मार्गी लागुन त्यातुन काही अर्थार्जन प्राप्त होईल.
नातेसंबध :- या बाबतीत हा महीना मात्र अतिशय त्रासदायक राहील,नातेसंबंधात झालेले जुने विवाद अचानक पणे डोके वर काढतील,क्रोधावर विजय न मिळवल्यास नाते संबंध बिघडतील पती-पत्नी मधील मतभेद उग्र रूप धारण करतील विसंवाद चे प्रसंग येतील.
संतती :- या बातीत विद्यार्थी वर्गाला हा महीना संघर्षातुन यशाकडे घेऊन जाणारा राहील.सुरु झालेल्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेताना सुरवातीला जड जाईल,कठोर मेहनतीशिवाय यश प्राप्त होणार नाही,पालक वर्ग शैक्षणिक खर्चामुळे मेटाकुटीस येईल.
कुंभ
ग्रहांची स्थिती :- षष्टातला बुध राहु ,शष्टातुन सप्तमात जाणारा रवी,अष्टमात असलेला शुक्र,भाग्यातला गुरु,लाभातला शनी, व्येयातला मंगळ-केतु,ही ग्रहस्थिती पाहता कुंभ राशीसाठी हा महीना गुरु आणि शनी च्या कृपेमुळे उन्हात सावलीचा फळ देणारा राहील,काही भाग्यकारक घटनांची नांदी ह्या महिन्यात राहील.
आरोग्य :- मागील महिन्यातील स्थितीपेक्षा या महिन्यात प्रकृती मध्ये उतार जाणवतील पाठ दुखी, कंबर दुखी, श्वसन संस्थेचे विकार याच्या मुळे महीना त्रासदायक जाईल.दररोज चालणे हा उपाय करावा.
आर्थिक :- या बाबतीत हा महीना मागील महिन्यापेक्षा उत्तम जाईल.आकस्मित काही खर्चाचे प्रसंग उद्भवल्यामुळे आर्थिक गणित कोलमडून पडेल आर्थिक साहस अंगलट येईल कर्ज देण आणि घेण दोन्ही टाळावे,जैसे थे स्थिती ठेवल्यास महीना रेटता येईल.
नौकरी व्यवसाय :- नौकरी बाबतीत ह्या महिन्यात काही मान अपमानाचे प्रसंग उद्भवतील.मानसिक संतुलन आणि संयम बाळगल्यास परिस्थिती चिघळणार नाही.वरिष्ठ आणि सहकार्यांशी जुळवून घ्यवे लागेल.नवीन नौकरी च्या शोधात असणार्यांनी तुर्तास संयम बाळगावा.
व्यवसायाच्या बाबतीत काही अनुकुल फळ मिळाल्यामुळे उत्पन्न वाढेल नवीन कामासाठी धावपळ करावी लागेल,तसेच कामासाठी वेळेचे बंधन पाळावे लागेल.
कोर्ट कचेरी :- या बाबतीत काही अकल्पित प्रसंग उद्भवतील परिस्थिती चिघळु न देता कायदेशीर मार्गाचा अवलंब केल्यास परिस्थिती उत्तम राहिल.स्थावर मालमत्तेचे विवाद गंभीर स्वरूप धारण करतील मनाचे संतुलन ढळु न देता कायदेशीर मार्ग अवलंबावा.
नातेसंबध :- या बाबतीत थोडे तणावाचे सावट राहील,वाद विकोपास जाणार नाही याची दक्षता घ्यावी,जोडीदाराचा वरचष्मा या महिन्यात जाणवेल,जोडीदाराशी समन्वयाचे धोरण ठेवल्यास प्रपंचाचे चक्र उत्तम चालेल.
संतती :-विद्यार्थी वर्गाला जीवनाला दिशा देणारा हा महीना राहील.अभ्यासक्रमाचे नियोजन आणि अंगभुत क्षमता यातील समतोल साधल्यास येणारे शैक्षणिक वर्ष यशदायी ठरेल.मात्र कठोर मेहनती शिवाय पर्याय राहणार नाही.
मीन
ग्रहांची स्थिती :- पंचमात असलेला बुध-राहु,पंचमातुन षष्टात जाणारा रवी,सप्तमातला शुक्र,अष्टमातला गुरु,दशमातला शनी लाभातले मंगळ-केतु मीन राशी साठी श्रावण महीना परिश्रम युक्त कटकटी चा आणि आव्हानांचा राहील.
आरोग्य :-पुर्वार्धात झालेला त्रास उत्तरार्धात आलेल्या रवी मुळे बऱ्याच अंशी कमी होईल,प्रकृतीतील सुधारणा बऱ्याच अंशी सुधार होईल मात्र त्यासाठी भरीव उपाय करावे लागतील.
आर्थिक :- हा महीना आर्थिक दृष्ट्या उतार चढावाचा राहील,आर्थिक आव्हानांना सामोरे जातांना हत्तीचे बळ एकवटावे लागेल,काटेकोर नियोजन केल्यास हा महीना पार करता येईल
नौकरी व्यवसाय :- नौकरी बाबतीत हा महीना कठोर परिश्रमाला सामोरे जाणारा राहील.कष्टाशिवाय यश नाही ह्याची प्रचिती ह्या महिन्यात येईल.वरिष्ठांची मर्जी संपादित करताना कामाचे डोंगर उपसावे लागतील,नवीन नौकरीच्या शोधात असाल तर सबुरीचे धोरण ठेवण योग्य राहील.
व्यवसाया बाबतीत जिद्द आणि चिकाटी बाळगल्यास उत्तम फळ प्राप्त होतील,खेळते भांडवल उपलब्ध करण्यासाठी वाढीव कष्ट घ्यावे लागतील,आर्थिक नियोजन आणि काटकसर करून मार्ग काढावे लागतील.
कोर्ट कचेरी :- या बाबतीत उत्तम फळ देणारा महीना राहील. एखादा मनासारखा निवडा झाल्यामुळे उत्साह संचारेल,स्थावर मालमत्तेचे विवाद कोर्टाबाहेर मिटवल्यास लवकर मार्गी लागतील.
नातेसंबध :- एका नाजुक वळणावर आलेले नाते संबंध सांभाळताना काळजी घ्यावी लागेल,मर्जी संपादन करताना अहंकार आणि मतभेद बाजुला ठेवावे लागतील,जोडीदाराच्या हट्टामुळे मनाविरुद्ध खर्च करावा लागेल.
संतती :- विद्यार्थी वर्गाला संभ्रमित करणारा महीना राहील.निर्णय घेण्याबाबती झालेली द्विधा स्थिती त्यामुळे अभ्यासक्रमाची निवड अवघड होईल,पालक वर्गानी हस्तक्षेप केल्यास प्रवेशाचा मार्ग सुखर होईल,पाल्यांच्या वर्तनाकडे विशेष लक्ष द्यवे लागेल.