मंगळ ग्रह परिवर्तन
मीन राशीतील भ्रमण
अग्नी तत्वाचा प्रखर असा ग्रह म्हणजे मंगळ.अग्नी ,धाडस , साहस ,शस्त्र, रक्त , धैर्य , उर्जा ,सेना, हिंसा आदीचा कारक ग्रह आहे.शल्य कर्म,शस्त्रक्रिया मंगळावरून बघितल्या जातात. मेष व वृश्चिक राशीचा स्वामी असुन शनीची मकर रस हि उच्ची ची असुन कर्क नीच रास आहे.तेज ,अग्नी तत्त्वाचा कारक असुन दक्षिण दिशेचा अंमल द्वार आहे.पित्त तसेच कफ या दोषांवर अमंल टाकतो.मंगळ या ग्रहाला सेनापती असेही म्हणतात.
जन्म कुंडलीत मंगळाच्या उपस्थितीला विशेष प्राधान्य असते.विशेष करून विवाहाच्या वेळेस मंगळाला अनन्यसाधारण महत्त्व येते.
ज्येष्ठ कृष्ण पक्ष त्रयोदशीला शर्वरी नामसंवत्सरी गुरवारी १८ जुन २०२० या प्रदोष काळी रात्री ८ वाजुन ०२ मिनिटांनी कुंभ राशीतुन मीन राशीत करता झाला.पुर्व भाद्रपद या नक्षत्राच्या ४ चरणात प्रवेश केला असुन १६ ऑगस्ट २०२० पर्यंत मीन राशीत भ्रमण करणार आहे.मीन ही रास गुरु तत्त्वाची असुन जल तत्वाची आहे.जल तत्वातील अग्नी तत्वाचे भ्रमण खगोलशास्त्रीय व नैसर्गिक रित्या अनेक आपत्तींना निमंत्रण देणारा राहील निसर्गाचा रौद्र रूप धारण करेल.
कलह ,संघर्ष युद्ध जन्य परिस्थिती अराजक राजकीय उलथा पालथ महागाई वाढीस लागणे अनेक प्रकारचे नुकसान व हिंसा आदींचा प्रकोप वाढीस लागेल.या मंगळ परिवर्तनाचे वैशिष्ट्य म्हणजे मंगळ ग्रहणाच्या तिसऱ्याच दिवशी ग्रहण लागते.ग्रहणावर मंगळाची दृष्टी दाहदायक असणार आहे.भुकंप,वादळ,पुर,अतिवार्षा आदी नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल ज्योतिष्य शास्त्रीय संकल्पनातुन मंगळाचे भ्रमण अतिशय महत्त्वपुर्ण असुन दैनंदिन आयुष्यात राशी परत्वे मंगळ बदलाचा परिणाम खालील प्रमाणे आहे.
-:मंगळाचे मीन राशीतील भ्रमणाचे राशीगत फळे:-
मेष
खर्चात वाढ होईल आर्थिक निर्णय चुकतील कर्जफेड देणे घेणे वाढतील.मतभेद व वाद विवाद टाळावा.आरोग्या बाबतीत अतिदक्षता बाळगावी.सध्याच्या काळात आजारांसाठी प्रतिकार क्षमता वाढवावी.
वृषभ
मंगळ भ्रमण लाभ देणारे राहील,आर्थिक चक्र गतिमान होईल,अनेक थांबलेली कामे मार्गी लागतील मरगळ दुर होईल उत्साह व उर्जा यांचा संचार होईल.नौकरी व्यवसायात लाभ होतील.लॉकडाऊन मध्ये आलेली शिथिलता हळुहळु कमी होईल.मुलांच्या आरोग्या कडे विशेष लक्ष द्यावे.
मिथुन
गेल्या तीन महिन्यापासुन अडकलेले कर्मचक्र आता रूळावर येईल अंगात उत्साह संचारेल.मेहनतीची तयारी ठेवल्यास कामाचा पहाड सहज उचलता येईल.थांबलेली कामे हातात घ्यावी लागतील.घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी विशेष करून वडिलांच्या व आईच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे त्यांची सेवा करावी स्वत:कडे सुद्धा लक्ष द्यावे.
कर्क
हे परिवर्तन बरेचसे सकारात्मक असुन नवीन संधी चालुन येईल.कामाचे स्वरूप बदलेल.मागील ३ महिन्या पासुन आलेले शैथिल्य झटकावे कर्ज फेडीसाठी उपाय योजावे लागतील.आरोग्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी.जनसंपर्क टाळावे जपलेली प्रतिकार क्षमता वाढीस न्यावी.
सिंह
मंगळाचे भ्रमण तणाव वाढविणारे राहील अतिदक्ष रहावे लागेल.वाद विवाद टाळावे,हितशत्रुंचा त्रास वाढीस लागेल.आकस्मित आरोग्याचे प्रश्न उभे राहतील,जुनाट व्याधी डोके वर काढतील वेळेवर वैद्यकीय चिकित्सा करावी घात-अपघाता पासुन सावध रहावे.भावंडाशी कलह व मतभेद निर्माण होतील.आर्थिक निर्णय चुकतील.
कन्या
ताण तणाव व अकारण भय जाणवेल.जोडीदारा सोबत मतभेद तीव्र टोकाला जातील.वाद टाळावे सामुपचाराने घ्यावे व्यवसायात भागीदाराशी मतभेद व मन भेद होतील.नातेवाईकांशी वाद संभवतो.जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल विवाह व विवाह निगडीत गोष्टी लांबणीवर पडतील.
तुळ
श्रद्धा सबुरी ठेवावी यश सध्या हुलकावणी देणार आहे.नियोजित कामे हुलकावणी देतील.आर्थिक बाबतीत विचार विनिमय करावा.कर्ज घेण्य संबंधी निर्णय टाळावा आरोग्याची विशेष काळजी घ्यावी वाहन चालवताना जाणीवपुर्वक जपुन वाहन चालवावे.गरजे नुसार वैद्यकीय चिकित्सा करावी.
वृश्चिक
नित्य कर्माचा श्री गणेशा करवा लागेल मंगळाची उर्जा मिळाल्यामुळे आलेली शिथिलता पळुन जाईल.विद्यार्थी वर्गांनी परिक्षेची योग्य तयारी केल्यास यश सहज प्राप्त होईल अभ्यासाची गती वाढवावी.पुढील शैक्षणिक धोरणाचे नियोजन करावे.नव दाम्पत्यांनी संतती विषय शुभ वर्तमानात समजेल.कर्ज व आर्थिक अडचणीसाठी आता दिशा मिळेल.आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.जनसंपर्क टाळा मुलांची विशेष काळजी घ्यावी.जनसंपर्क टाळा मुलांची विशेष काळजी घ्यावी सध्या तरी त्यांना बाहेर पडु देऊ नये.
धनु
मानसिक शांतात भंग होईल.अचानक गृह कलहाला सामोरे जावे लागेल.त्यामुळे मन:शांती ढळून जाईल.आईकडे विशेष लक्ष द्यावे लागेल आईशी मन मोकळे पणाने संवाद साधावा वडिलांची मनोभावे सेवा करावी.अतिआवश्यक असेल तरच प्रवास करावा.कामाच्या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी .वादांपासून दुर रहावे आर्थिक अडचण सुरूच राहतील.आरोग्या बाबतीत जागरूक रहावे लागेल.मनाची खंबीरता टिकुन ठेवावी.स्वत:ला जपावे.
मकर
मंगळाचे भ्रमण काहीसे दिलासा देणारे राहीलत्यामुळे मानसिक चिंता दुर होईल.मागील ३ महिन्यापासुन अनुभव पाहता धैर्य निर्माण होईल.अध्यात्मिक प्रगती साध्य करता येईल.प्रवास टाळणे योग्य राहील अति आवश्यक कामासाठी बाहेर पडावे.आर्थिक बाजु अजुनही काही काळ अस्थिर राहील जनसंपर्कातुन बाधा होऊ शकते.आरोग्याची हेळसांड करून चालणार नाही.
कुंभ
आर्थिक चक्र गती होईल नियोजित कामांना गती येईल बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल कटुता निर्माण होईल.काही गोष्टींबाबत नुकसानदायक राहील.उजवा डोळा जपावा वरिष्ठ सहकाऱ्यांशी जुळवुन घ्यावे.पित्त ,वात,विकार वाढतील गर्दीच्या ठिकाणी जाने टाळावे.
मीन
राशीतच मंगळाचे भ्रमण असल्याने अंगात हत्तीचे बळ संचारेल मागील अवस्था पार नाहीशी होईल.रेंगाळ लेल्या कामाच्या मागे उत्साहाने लागाल.आळस झटकुन कार्य करण्यास उत्साह राहील.आर्थिक तणाव हळुहळु नियंत्रणात येईल कोठल्याही आवेशाने निर्णय घेऊ नका.आरोग्या बाबतीत गाफील राहुन चालणार नाही जुने आजार बळावतील.
मंगळ मंत्र
ऊँ अंगारकाय नम: |
ऊँ भौम भौमाय नम: |
जपसंख्या – १०,०००
!!! शुभम भवतु !!!