मकर संक्रांती

संक्रमण सुर्याचे …शुभ चिंतन ग्रहांचे !!!!

भारतीय संस्कृतीची एक वैशिष्टयपुर्ण ओळख म्हणजे, सणांची,उत्सवांची आणि पर्वाची प्रचंड अशी रेलचेल असणे आणि हे सर्व काही, निसर्ग,पर्यावरण आणि मानवी संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवुन, वैज्ञानिक दृष्टीकोण  ठेवुन नियोजित केलेले आहे.मकर संक्रांती हा सण ही असाच निसर्ग  आणि विज्ञानमयी आनंदाची अनुभुती देणारा अनोखा सण होय.

सुर्य धनु राशीतुन ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी हा सण साजरा करण्यात येतो.सुर्याच्या मकर संक्रमणाने उत्तरायण आरंभ होते.उत्तरायणात दिवस मोठा होत जातो.हेमंत ऋतु संपतो आणि वसंताच्या आगमनाची चाहुल लागते.मकर संक्रांतीचे आणखि एक वैशिष्टय म्हणजे ह्या दिवशी रात्र आणि दिवस समसमान असते.त्यानंतर कालांतराने दिवस मोठा होत जातो.वैज्ञानिक दृष्टीकोणातुन याकडे पाहिलं तर असे लक्षात येईल की ही खगोलीय घटना मानवी जीवनाशी सखोलपणे निगडीत असुन, त्याचा सांस्कृतिक व अध्यात्मिक दृष्टीकोण असा समन्वयी भुमिका मांडणारा आहे.हेमंताची गुलाबी बोचरी थंडी हळु-हळु लोप पावते वसंत ऋतु प्रसन्नते बरोबर उष्मतेची ही चाहुल घेऊन आगमन करणार असतो निसर्ग त्याच्या वेळापत्रकानुसार अगदी लयबद्ध आणि काटेकोर असतो.शेतकरी वर्ग शेतात काम करून थकलेला असतो आणि याच काळत शेतातील पिक तयार झालेले असते.उष्णवर्धक पदार्थांचा आहारात समावेश झालेला असतो.बाजरी,गुळ,तीळ,वांग,गाजर आदी पदार्थांचे सेवन करणे आरोग्यदायी असते.ह्या उष्ण्मय,स्निग्धमय पदार्थांच्या सेवनाने शरीरात नवे पोषणमुल्य वर्धित होते व त्रिदोष निवारण होते.वात,पित्त व कफ चे संतुलन साधल्या जाते,संक्रांतीच्या अगोदर “भोगी” असते.कुलदेवतेला अथवा मनोदैवते चे मनोभावे पुजन करून आपल्या शेतातील धनधान्य अर्पण करतात व सर्व भाज्यांची एकत्रित मिळुन भोगीची भाजी करतात.प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या परंपरेनुसार व रूढीनुसार हा सण साजरा करतात.कृषी संस्कृतीचे महत्त्व ह्या आधारे अधोरेखित केल्या जाते हे विशेष महत्त्व आहे.

शके १९४० विलंबी नाम संवत्सर,उत्तरायण पौष शुक्ल नवमीला म्हणजे १५ जानेवारीला मकर संक्रांती असुन १४ जानेवारी ऐवजी १५ तारखेला संक्रांत साजरी करता येईल.कारण रवीचा प्रवेश धनु राशीतुन मकर राशीत १४ तारखेला सायंकाळी  ७.५१ ला होत असल्यामुळे  सुर्युदयानंतर पुण्य काळ असल्यामुळे सुर्योदया नंतर संक्रांत साजरी करतात.१५ जानेवारी २०१९ च्या सुर्योदया पासुन तर सुर्यास्त पर्यंत संक्रांतीच्या पुण्य काळ म्हणजे ह्या काळात अध्यात्मिक कार्य केल्यास उत्तम फळ प्राप्त होते.पहाटे अभ्यंग स्नान किंवा तीळ टाकुन स्नान करून सुर्याला अर्ध्य देणे पुण्यकारी असुन पवित्र नदीत स्नानाचे विशेष महत्त्व असते.

सुर्याला अर्ध्य देताना सुर्य मंत्र “ऊँ घृणी सुर्याय नम:” अथवा गायत्री मंत्र म्हणटल्यास सर्व व्याधींचे हरण होते व प्रचंड आत्मविश्वास लाभतो.तना-मनात नव चेतन्य संचारते.संक्रांतीला तीळाचे विशेष महत्त्व असुन तीळाचे स्नान, तीळाचे हवन तीळाचे तर्पण तीळाचे सेवन व तीळाचे दान करावे.ह्या मुळे पुण्य संचय पदरी पडतो.

सुर्याचे मकर संक्रमण म्हणजे मकर राशीतला प्रवेश संक्रांत घेऊन येत आहे.संक्रांतीचे वाहन सिंह असुन उपवाहन हत्ती आहे.वस्त्र पांढरे असुन कस्तुरीचा टीळा लावला आहे.वय बाल अवस्था असुन आसनस्थ आहे हाती चाफा असुन अन्न सेवन करीत असुन,पोवळे रत्न  धारण केले आहे.दक्षिणेतुन उत्तरेत प्रयाण होत आहे. “ध्वांक्षी” हे नाव धारण केले आहे.ईशान्य दिशेकडे नजर आहे.ह्या संक्रांत पुण्य काळत मुखमार्जन,कठोर बोलणे ,वृक्ष अथवा गवात तोडणे,गायी म्हशीचे दुध काढणे टाळावे.

पुण्य काळात नवीन भांडी कुठल्याही प्रकारचे अन्न पदार्थ गुळ-तीळ-सोने-गाय-वस्त्र-जमीन आदी दान करावेत.दानाचे विशेष महत्त्व आहे.सुर्याच्या संक्रमनातुन होणारी संक्रांत हि दिव्य अनुभुती असते त्यामुळे घाबरून जायचे कारण नसते,सुर्य तेजोनिधी आहे,अंधार सारून प्रकाश देणारा आहे.

असे हे मकर संक्रमण १२ राशींचे फळ पुढील प्रमाणे घेऊन येत आहे.

मेष : दशमातुन होणारी संक्रांत नौकरी-व्यवसायात नवीन बदल नवीन संकेत घेऊन येत आहे .अनपेक्षित लाभ झाल्यामुळे उत्साह लाभेल.वडिलांची सेवा केल्यास पुण्य मिळेल त्यांच्या आशीर्वादाने नवीन मान-सन्मान मिळेल बढती मिळेल.

वृषभ : भाग्य स्थानी होणारी संक्रांत भाग्य वृद्धिंगत करणारी राहील.जीवनाला नवीन अर्थ प्राप्त होतील नवीन आव्हाने पेलताना उर्जा साठवावी लागेल.नवीन योजना कार्यान्वीत होतील पर्यटन अथवा तीर्थाटन होईल.

मिथुन : अष्टमात होणारी संक्रांत तणाव जागृत करणारी व दुखापतींची राहील.दक्षता आणि अष्टावधानी धोरण ठेवावेच लागेल.आरोग्याला जपावे लागेल कष्टाविना फळ नाही,तेव्हा अपार मेहनत करावी लागेल.

कर्क  : सप्तमात होणारी संक्रांत प्रापंचिक सौख्याबाबत कटु-गोड अनुभवांना सामोरे जाण्यास सांगणारी राहील.जोडीदाराशी नमते घ्यावेच लागेल वाद घालुन चालणार नाही मनभेद आणि मतभेद तिथल्या तिथे मिटवावे प्रत्येक निर्णय तपासुन घ्यावा.

सिंह : षष्टात  होणारी संक्रांत आरोग्या मध्ये त्रास देणारी राहील.आरोग्य बाबतीत गाफिल राहुन चालणार नाही .कर्ज देणे व घेणे टाळावे.हितशत्रुंपासुन सावधान राहावे.

कन्या : अभ्यासामध्ये विशेष लक्ष घालावे लागेल,अभ्यासाचे तंत्र शिकावे लागेल.शिक्षणासाठी नवीन योजना कार्यान्वीत कराव्या लागतील. अपत्य प्राप्तीचे योग राहतील नवीन परिचय होतील.नवीन दिशा मिळेल.

तुळ: चतुर्थातुन होणारी संक्रांत सौख्यामध्ये ऊन पावसाचा खेळ घेऊन येईल,ग्रह सौख्य मिळेल.कुटुंबात वेळ घालवता येईल नवीन वास्तुचे नियोजन करता येईल कोर्ट प्रकरणाच्या बाबतीत सजग राहावे.आईची सेवा    करावी,पुण्य पदरी पडेल.

वृश्चिक : भावंडाशी नमते घ्यावे,दुरावा मिटवावा,अहंकार बाजुला ठेवाव,जोखिम पत्करताना काळजी घ्यावी नवीन कल्पना अमंलात आणताना उत्साह मर्यादित ठेवावा.

धनु : धन-वृद्धी-धन-लाभ घेऊन येणारी संक्रांत आर्थिक बाबतीत चिंता मिटवणारी राहील.कर्जाची फेड होईल, उत्पन्न वाढीचे योग येतील.बोलताना काळजी घ्यावी लागेल शब्दांनी कोणालाही दुखवु नये.

मकर : राशीत होणारी संक्रांत आत्मबळावर आघात करणारी राहील.बेसावध राहु नका.कर्म करावेत,कर्म हेच श्रेष्ठ आहे.निराश झटकुन कामाला लागावे.कष्टाशिवाय तरणोपाय नाही.राग-लोभ-मत्सर-मोह दुर ठेवावा प्रसन्न राहावे.

कुंभ : राशीच्या बाराव्या स्थानात होणारी संक्रांत खर्च वाढविणारी राहील.खिसा नक्कीच रिकामा करावा लागेल.अनपेक्षित खर्च उद्भवतील.अर्थात खर्च झाला तर पैसाही नक्कीच येईल हात अखडता घेऊ नये.

मीन : लाभात होणारी संक्रांत भरपुर लाभ घेऊन येत आहे.होणाऱ्या लाभचा  योग्य तो वापर करावा छप्पर फाडके मिळताना आपली झोळी भरून घ्यावी.लाभाचा अर्थ ज्ञान ही आहे ज्ञानचक्षु खुले ठेवावे.जीवनाची अनुभुती येईल.

असे हे सुर्याचे मकर संक्रमण आपणास हर्ष उल्हासित,तेजोमय,निरामय-आरोग्याचे जावो ह्या सदीच्छांसह

!!!!!! शुभम भवतु  !!!!!!!

!!! ऊँ घृणी सुर्याय नम: !!!

!!! ऊँ भास्कराय नम: !!!

!!! ऊँ मित्राय नम : !!!

!!! ऊँ साविताय नम: !!!