भाद्रपद शुद्ध चतुर्थी : पार्थिव गणेश पुजन

उत्सव मांगल्याचा , ध्यास ज्ञानाचा .

|| वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ

निर्विघ्नम् कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा ||

हा श्लोक श्री गणेशाच्या उपासने मधील महत्त्वाचा श्लोक असुन या शिवाय साधना आरंभ होत नाही.गणपतीची प्रार्थना उपासना साधना मंत्र पठन हे कुठलेही शुभ कार्य करण्याअगोदर म्हंणटले जाते कुठल्याही शुभकार्याला विघ्नहर्ता म्हणुन गणपतीला आमंत्रण देण्याची प्रथा आहे.

“निर्विघ्नम् कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा” या श्लोकातच सगळ आल. गणपती हे तसे सगळ्यांचे अतिशय लाडके दैवत होय.गणपतीची मुर्ती पाहताच मन प्रसन्न होते,अबालवृद्धांचे हे लाडके दैवत आहे आणि गणपतीविषयी प्रत्येकामध्ये एक विशेष प्रेम आणि आपलेपणा आहे.गणपती हा ज्ञान दाता आणि बुद्धी दाता आणि विघ्नहर्ता आहें .तो मांगल्याचे ही प्रतिक आहे. त्याची साधना संकटनाशन करतेच ,तसेच मनाला उर्जा आणि चैतन्य देऊन जाते.घरातल्या देवपुजनात हि गणपतीच्या पुजेला पहिला मान असतो. देवपंचायनातील तो एक प्रमुख देव असुन,प्रथम पुज्य आहे.

गणेश पार्थिव पुजन या संकल्पनेला, भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासुन आरंभ केला जातो.श्रावण अमावस्या संपली कि भाद्रपद प्रतिपदेपासून सुचीर्भूत होऊन, चांगली काळी माती ,घेऊन श्री गणेशाची प्रसन्न चित्त आणि सुबक अशी मूर्ती तयार करून, चतुर्थी ला तिची स्थापना करावी.मुर्तीची यथाविधी  षडोशपचार पुजा करावी आणि उत्तम आरास करून, घरा मध्ये स्वच्छता करून, उत्साहवर्धक आणि मांगल्य निर्मिती करून श्री गणेशाची आराधना करावी.नैवैद्य अर्पण करून यथा शक्ती दानधर्म करावा,अनंत चतुर्दशी पर्यंत हा नेम ठेवावा.अनंत चतुर्दशीला मुर्तीचे पुजन करून वाजत-गाजत निरोप द्यावा आणि विस्तीर्ण जलाशयात विसर्जन करावे.भाद्रपदातील या दहा दिवसाच्या आगमनाने ,घरोघरी उत्साह आणि चैतन्य सळसळते आणि मांगल्याची अनुभूती निर्माण होते.

!!!!!!!!शुभम भवतु !!!!!!!!!