Skip to content
-: गुरु पालट :–
Jupiter’s Transit in Sagittarius
पुन:श्च धनु राशीतील भ्रमण
शालीवाहन शके १९४२ शर्वरी नाम संवत्सर दक्षिणायन आषाढ शुक्ल दशमी सोमवार २९ जुन २०२० उत्तर रात्री २९.२७ वाजता (०५.२७ पहाटे) मकर राशीत वक्री असलेला गुरु हा ग्रह पुनश्च याच वक्री अवस्थेत धनु राशीत प्रवेश करतो आहे.आता या पुढील गुरुचे धनु राशीतील भ्रमण २० नोव्हेंबर २०२० पर्यंत राहील, या धनु राशीतील गुरुचे भ्रमण वक्री अवस्थेत १३ सप्टेंबर पर्यंत राहील.या परिवर्तनामुळे पुन्हा कन्या,वृषभ व मकर या राशींना गुर अनुक्रमे चौथा,आठवा आणि बारावा राहील.या परिवर्तनाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे गुरु आणि राहु परस्परांच्या दृष्टी योगात राहतील व केतु सोबत गुरु भ्रमण करेल हा योग काहीसा अशुभ असुन अशुभ फळे देणारा असतो.
“गुरुबळ” असणे हा शब्द जातक मंडळी मध्ये प्रचलित आहे.गुरु बळ असने म्हणजे चंद्र राशीनुसार गुरु हा ग्रह जर दुसरा ,पाचवा ,सातवा ,नववा आणि अकरावा असणे होय.जातकाच्या समजुतीनुसार गुरु बळात अनेक कामे मार्गी लागतात तसेच गुरुकृपा असणे म्हणजे बलवान उच्च स्थितीत असेल तर जीवनात कुठलीच कमतरता जाणवत नाही.तसेच व्यक्ती मध्ये सात्विक तत्व अनुभवयास येतात.गुरु हा ग्रह ज्ञान विवेक,बुद्धी उच्च शिक्षण संपन्नता समृद्धी उच्च अध्यात्मिक प्रगती आदींचा कारक ग्रह असतो मान सन्मान संतती ज्ञान वर्धन धन प्राप्ती व लौकिक प्रगती हे योग गुरूंच्या आशीर्वादाने उत्कर्ष पावतात.
मेदनीय ज्योतिष शास्त्रा नुसार १९ सप्टेंबर २०२० पर्यंत अशुभ फळे देणारे राहील १९ सप्टेंबर पर्यंत गुरु केतु सोबत तर राहुच्या दृष्टी योगात आहे.आणि याचा परिणाम संपुर्ण विश्वावर व आपल्या सभोवतालावर पडणार आहे मोठे राजकीय बदल ,राजकीय उलथापालत षडयंत्रे आणि सत्ता परिवर्तन आदी फळे अनुभवयास येतील काही राजकीय नेते मंडळींचे विधान वादग्रस्त बोलतील त्यांचे स्वतःच्या वाणी वर नियंत्रण राहणार नाही.मोठ्या राजकीय नेत्यांना अस्थिरतेला सामोरे जावे लागेल.सामाजिक पातळीवर अनेक बदल होतील.भौगोलिक तत्त्वावर या परिणामाचे मोठे परिणाम अपेक्षित आहेत .अनेक देशात यादवी अथवा अराजक माजेल युद्ध सदृश्य परिस्थिती राहील देशा देशांमधील संबंध बिघडतील जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर व मंदी निर्माण करणारी राहील.महागाई वाढीस लागेल सध्या वर्षा काळ असल्यामुळे नुकतेच मिथुन राशीत ग्रहण घडल्या मुळे अति वृष्टी वादळ पुर भुकंप आदी नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होईल सगळ्यात मोठा बदल हा शैक्षिणिक क्षेत्रात होणार असुन शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघणार आहे.शिक्षण व ज्ञानाचा मार्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलणार आहे ज्याचा येणाऱ्या पिधींवर फार दुरगामी परीणा जाणवेल लोकांच्या नीती मत्ते मध्ये प्रचंड बदल होतील स्वार्थ वृत्ती वाढीस लागेल मन-बुद्धी-चित्त अहंकार या चतुष्टीमध्ये प्रचंड प्रमणात संभ्रम अवस्था निर्माण होईल. गुरु हा ग्रह जीवनातील वास्तव दर्शिवणारा ग्रह आहे.मन बुद्धी चित्त अहंकाराला थाऱ्यावर आणण्याचे कार्य गुरु हा ग्रह करीत असतो त्याच्या कडे ज्ञान विवेक समज व वैचारिक अधिष्ठान असल्या मुळे तो चित्त स्वरुपात मन बुद्धी अहंकारा वर नियत्रण आणतो असा हा गुरु या कलयुगात आणि नुतन परिवर्तनात स्वतःचे नवीन ज्ञान सिद्ध करण्यास तत्पर झाला आहे.
शनी हा जसा कर्मदाता आहे तसा तर गुरु हा ज्ञान आहे विवेक आहे समृद्धी आहे.अश्या या ज्ञान संपन्न विवेक निपुण ग्रहाला राहुच्या दृष्टी योगाने बाधित केले आहे याची फळे संपुर्ण विश्वाला भोगावी लागणे क्रमप्राप्त आहे.आज गरज आहे ती विवेकाची ज्ञानाची व वैचारिक संपन्नतेची तर चला सिद्ध होऊ या स्वतः ला ज्ञान संपन्न करू या आणि मन बुद्धी चित्त अहंकाराला विवेकाने स्थिर करू या.
गुरु परिवर्तनाची राशिगत फळे
मेष
भाग्यात आलेला गुरु नवीन उत्साह,नवीन महत्त्वकांक्षा नवीन आशावाद निर्माण करणारा राहील नवीन कार्या आरंभाचा आढावा घेता येईल.महत्त्वाचे निर्णय घेता येतील आरोग्य बाबतीत दिलासा दायक आहे पण काळजी घेणे गरजेचे राहील.कामाच्या ठिकाणी मोठे बदल अनु भावायास येतील.मेहनत केल्यास फळ मिळणार आहे परिणामी मेहनत वाढवावी लागेल अध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ
पुनश्च अष्टम स्थानी गुरु परिवर्तन होणार आहे आरोग्य बाबतीत काळजी घ्यावी लागणार आहे पोटाचे विकार व जुनाट व्याधी डोके वर काढतील.व वाणीवर नियंत्रण ठेवावे बोलण्यातुन खूप जन दुखावले जातील अचानक काही लाभ अनपेक्षित पणे पदरात पडतील एकंदरीत एकंदरच सावध व दक्ष राहाण गरजेच राहील.
मिथुन
सातवा गुरु प्रचंड दिलासा देणारा राहील,आता कामांमध्ये गती मिळायला सुरवात होईल.आळस झटकुन कामाला लागावे लागेल.गुरूची शुभ दृष्टी राशीवर पडत असल्यामुळे उत्साह व आत्मविश्वास वाढणार आहे. नौकरी व व्यवसायात काहीतरी दिलासा दायक नक्कीच घडणार आहे.आरोग्या बाबत जागरूक राहावे लागेल.नवीन ओळखी मुळे कामे मार्गी लागतील मात्र जोडीदाराशी मतभेद होतील सांभाळून रहावे.
कर्क
गुरु परिवर्तन षष्ट स्थानात घडत असल्या मुळे अडचणींचा सामना करावा लागेल.योजलेली कामे मार्गी लागतील,मेहनत वाढवावी लागेल.आर्थिक गुंता गुंतीचे निर्णय टाळावे.हित शत्रुंचा त्रास वाढीस लागु शकेल.आरोग्या बाबतीत सतर्क रहावे लागेल.पोटाचा त्रास संभवतो आहे.एकंदरीत सजग राहणे महत्त्वाचे राहील.
सिंह
पंचमात होणारे गुरु परिवर्तन लाभदायक असु शकते आहे.कामाच्या स्वरुपात अमुलाग्र बदल होतील.काही नवीन पद्धतींचा अवलंब करावा लागेल.नवीन ओळखीमुळे काही नवीन पर्याय निर्माण होतील संतती विषयी चिंता दुर होईल.आरोग्या बाबती मध्ये जुने दुखणे डोके वर काढतील आर्थिक तणाव पुर्णपणे जाणार नाही.
कन्या
चतुर्थात आलेला गुरु स्थावर मालमत्ते संदर्भातील कामांना गती देईल.नौकरी व्यवसायात प्रगतीचे योग राहतील.आईच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.गृह सौख्या मध्ये शांतता ठेवायचा प्रयत्न करावा.आरोग्याबाबती मध्ये सचेत रहावे.आर्थिक बाबतीत जैसे ते स्थिती राहील.
तुळ
तृतीय स्थानातील गुरु परिवर्तन नौकरी व्यवसाया मध्ये वाढीव प्रगतीचा संकेत आहे पण कामाच्या अडचणीमुळे किवा संबंधित व्यक्तीकडून सहकार्य न लाभल्यामुळे प्रत्येक पाउल जपुन टाकावे लागेल.भाग्या ची साथ न मिळाल्यामुळे मेहनत वाढवावी लागेल दुसऱ्यांच्या सल्ल्या वर व मदती वर विसंबुन राहु नये आरोग्या बाबती मध्ये स्वतच्या व पत्नीच्या आरोग्या कडे विशेष लक्ष द्यावे.आर्थिक बाबतीत खर्च वाढतील.
वृश्चिक
राशीच्या द्वितीय स्थानात गुरु परिवर्तन होत असल्या मुळे आर्थिक बाबींवर परिणाम अपेक्षित राहील.खर्च वाढतील आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल प्रापंचिक तणावाला सामोरे जावे लागेल.आरोग्या बाबती मध्ये जुनी व्याधी काही नवीन दुखणे मागे लागेल.नौकरी व्यवसाया मध्ये जरी अडचणी आल्या तरी कामे मार्गी लागतील.शक्य तो दिलेल्या कामांबाबत गुप्तता बाळगावी सहकारी व वरिष्ठांशी विसंवाद टाळावा.
धनु
स्व राशीत गुरु चे भ्रमण होणार आहे राशीतच राशी स्वामी चे आगमन झाल्यामुळे उत्साह संचारेल.उर्जा तत्त्वात वाढ होईल ग्रहणा पासुन आलेल दडपण बरेच कमी होईल.थांबलेली व खोळमंबलेली कामे पुढे जातील.संतती विषयी चिंता दुर होईल.अध्यात्मिक प्रगती साधता येईल आरोग्यामध्ये बरिच सुधारणा होईल.नौकरी व्यवसाया मध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
मकर
राशीतुन आता गुरु पुनश्च एकदा एक पाऊल मागे म्हणजे मागच्या राशीत जाऊन बाराव्या स्थानात जात आहे.हे परिवर्तन शुभ सुचक नाही हितशत्रु डोके वर काढतील.देणेकरी मागे लागतील नौकरी व व्यवसायात मना सारखे काही घडणार नाही.उलट संघर्ष व तणाव निर्माण होईल.आरोग्याबाबत तर फार काळजी घेणे अपेक्षित आहे.वाढलेला खर्चाचा डोंगर बचत फार खाऊन टाकेल अर्थ चक्र कोलमडुन पडणार आहे.दक्ष राहावे व सावध राहुन कायदेशीर नियम पाळा.
कुंभ
राशीच्या लाभत आता गुरु चे परिवर्तन होईल.हाता बाहेर गेलेली परिस्थिती आता कुठे नियंत्रणात येईल.खर्च वाढतील नौकरी व्यवसायात अडचणीची मालिका सध्या सुरूच राहील.संतती कडे बारीक लक्ष द्यावे लागेल;त्यांच्याशी मन मोकळे बोलावे त्यांच्या सोबत वेळ घालवावा त्याच्या आवडीचा एखादा छद जोपासावा.वैवाहिक जीवनात काहीसा तणाव राहील.आरोग्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी.घरातील सदस्यांशी सुसंवाद साधावा.
मीन
राशी चक्राच्या दशमातील गुरु चे परिवर्तन संमिश्र फळ देणारे राहील.नौकरी व्यवसायात नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल.जबाबदारी मध्ये वाढ होईल कामाचे स्वरूप बदलेल वरिष्ठ व सहकाऱ्यांशी नमते घ्यावे लागेल.आर्थिक बाबती मध्ये तणाव राहीलच अपेक्षित येणी व उत्पन्न वेळेवर येणार नाही .घरातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृती कडे विशेष लक्ष द्यावे लागेल.आई वडिलांशी आपुलकीने वागावे त्यांना काही हवे नको ते पहावे.
!!! शुभम भवतु !!!
(टीप : हा गुरु परिवर्तनाचा फलादेश सर्व सामान्य राशी निहाय असुन , मुळ पत्रिकेनुसार त्यात बदल संभवतो आहे ; अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. )
९३२६८८३०४५,९९७०८५१९४७