ग्रहणाचा फलादेश

-: ग्रहणाचे वेध काळ :-

 वेध २० जुन शनिवारी रात्री १०.०० पासुन २१ जुलै रविवारी दुपारी ०१.२८ पर्यंत आहे या वेध काळाला ग्रहणाचे सुतक असेही म्हणतात ग्रहण स्पर्शाच्या १२ तासांअगोदर हा काळ सुरु होतो.

-: ग्रहणाचा पुण्यकाळ :-

सकाळी १०.०० ते दुपारी ०१.३० वाजे पर्यंत ग्रहणाचा  पुण्य काळ अथवा मुख्य काळ राहील.

०१.३० ते ०३.३० पर्यंत पर्व काळ राहील.ग्रहण  मुख्य  काळात पाणी पिणे,मलमुत्र विसर्जन व  निद्रा आदी कर्म शक्यतो टाळावे.

-: विशेष सुचना :-

 ग्रहणाचा हा फलादेश जन्म कुंडलीच्या चंद्र राशीनुसार असुन सर्वसामान्य आहे प्रत्येक जातकाच्या मुळ ग्रहदशेनुसार काही वेगळी फळे पण अनुभवयास येऊ शकतात.आपल्या वैयक्तिक मार्गदर्शनासाठी संपर्क करावा.

-:  ग्रहणाचे राशीगत फळ  :-

मेष

मेष राशी साठी हे ग्रहण शुभ असुन पराक्रम व धैर्य वाढीस लागेल.अहंकारावर व रागावर नियंत्रण ठेवावे.भावंडाशी कलह व संघर्ष निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यांच्याशी जुळवुन घ्या पद प्रतिष्ठा वाढीस लागेल तसेच मान-सन्मान ही प्राप्त होतील बऱ्याच काळा पासुनची खोळंबलेली कामे मार्गी लागतील मागील अपयशाचे यशात रुपांतर होईल.मन प्रसन्न राहील.

:  मंत्र  :

ऊँ हनुमंताय नम : | ऊँ अंगारकाय नम: |

मारुती स्तोत्र वाचावे,यथा योग्य दान धर्म करावे.

वृषभ

मिश्र फलदायी फळे प्राप्त होतील वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल,उजवा डोळा जपावा नाते संबंधात कटुता येईल आर्थिक नुकसानीची संभावना आहे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी नौकरी व व्यवसायात अडचणी वाढतील वाढत्या खर्चा वर नियंत्रण मिळवावे लागेल,आरोग्याची विशेष काळजी घ्यावी जण संपर्क कटाक्षाने टाळावा गरजे पुरतेच बाहेर पडावे.

:  मंत्र  :

ऊँ दुम दुर्गाय नम: | ललिता सहस्त्र नाम व स्त्री सुक्त वाचावे.

मिथुन

 हे ग्रहण अनिष्ट फल देणारे राहील,राशीतच ग्रहण होत असल्यामुळे सावध रहावे लागेल आर्थिक अडचणीन मध्ये वाढ होईल नियोजित कामांमध्ये अडथळे येतील मानसिक अस्वस्थता व तणावाला सामोरे जावे लागेल आरोग्याची विशेष काळजी घ्यावी शारिरीक प्रतिकार क्षमता वाढवावी.जनसंपर्क टाळलाच पाहिजे.गरजे शिवाय बाहेर पडु नये.

:  मंत्र  :

ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम: | ऊँ नमो कृष्णाय नम: |

या मंत्राचे पठण व विष्णुसहस्त्र नाम व व्यंकटेश स्त्रोत वाचावे.

कर्क

राशी चक्राला ग्रहण अनिष्ट फळ देणारे राहील आर्थिक अडचणीन मध्ये वाढ राहील काही कटु प्रश्न निर्माण होतील.स्थावर मालमत्ता संबंधी व्यवहार पुढे ढकलावे कर्जाचा विचार टाळावा ,आर्थिक निर्णय काळजी पुर्वक घ्यावे.आरोग्या बाबतीत विशेष दक्षता बाळगणे गरजेचे राहील श्वसन संस्था व डावा डोळा याची काळजी घ्यावी.जनसंपर्क टाळणे हिताचे राहील.आणखी काही काळ घरा बाहेर पडणे टाळावे.

:  मंत्र  :

 ऊँ नम: शिवाय | ऊँ हौम जु: स:| महामृत्युंजय मंत्राचे पठण करावे.शिवमहिमा किंवा शिवलीलामृत स्तोत्र वाचावे.

सिंह

 हे ग्रहण राशीसाठी शुभ फलदायी असुन लाभदायक राहील.मात्र हा लाभ घेण्यासाठी कठोर मेहनतही घ्यावे लागेल.आर्थिक लाभ राहतील त्याचप्रमाणात खर्च ही वाढतील.वाहन चालवताना दक्षता घ्यावी.आरोग्या बाबती मध्ये जुनाट व्याधी कडे लक्ष द्यावे.प्रतिकार क्षमते साठी विशेष प्रयत्न करावे.

:  मंत्र  :

ऊँ घृणी सुर्याय नम:| गायत्री मंत्र म्हणावा ,आदित्य हृदय स्तोत्र व शिव रुद्राष्टक वाचावे.

कन्या

राशी साठी हे ग्रहण शुभ फलदायी असुन मनाची प्रसन्नता लाभेल मन भयमुक्त होईल थांबलेली व रेंगाळलेली कामे मार्गी लागतील लाभ पदरी पाडण्यासाठी विशेष नियोजन करावे लागेल आर्थिक बाजु हळुहळु पुर्व पदावर येईल.कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी येईल.वडिलांच्या व आईच्या प्रकृती कडे लक्ष द्यावे.आरोग्या बाबतीत सजग राहणे गरजेचे राहील.

:  मंत्र  :

ऊँ विष्णवे नम: | ऊँ भगवते वासुदेवाय नम: | गजेंद्रमोक्ष स्तोत्र व श्रीमदभगवद्गीतेचा १६ वा अध्याय वाचावा.

तुळ

राशीला हे ग्रहण मिश्र फलदायी राहील मानसिक दडपण जाणवेल.संघर्षमय स्थिती राहील कामात आलेल्या अडथळ्यामुळे मन अशांत राहील धार्मिक व अध्यात्मिक गोष्टींकडे मन आकृष्ट होणार नाही.कायद्याचे पालन करावे.अस्थिर विचारातुन निर्णय घेऊ नये,आरोग्या बाबतीत हेळसांड करून चालणार नाही निरामय आरोग्या साठी विशेष प्रयत्न करावेत.आर्थिक बाजु कमकुवत राहील.

:  मंत्र  :

 ऊँ ह्री श्रीं श्री महालक्षम नम:| दुर्गा सप्तशती वाचावी तसेच ललितासहस्त्र नाम वाचावे.

वृश्चिक

ग्रहणाचा या राशीवर अनिष्ट फलदायी राहील.चिंतातुर अवस्थेत वाढ होईल.आर्थिक नियोजन करून ठेवावे.धन हानी संभवते,वाहन जपुन चालवावे अष्टावधानी रहावे,प्रतिकार क्षमता वाढवावी महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्यावी.आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे राहील स्वतःची व परिवाराची काळजी घ्यावी

:  मंत्र  :

ऊँ भौम भौमाय नम: | महामृत्युंजय  मंत्र म्हणवा,संकटनाशन गणेश स्तोत्र व मारुती स्तोत्र म्हणावे.

धनु

हे ग्रहण मिश्र फलदायी राहील.नाते संबंधात ताण तणावाला सामोरे जावे लागेल जोडीदाराशी तीव्र मतभेद होतील.जास्त तुटे पर्यंत ताणु नका.व्यवसाया मध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण भाग पडेल भागीदारातील व्यवसायात वितुष्ट येईल.आरोग्या बाबतीत अगोदर पेक्षा सतर्क रहाव लागेल स्वतः च्या व जोडीदाराच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे.जनसंपर्क टाळणे हितावह राहील

:  मंत्र  :

 ऊँ बृहस्पत्ये नम: | ऊँ दत्त गुरवे नम: | गुरु चरित्र अठरावा अध्याय , नवनाथ भक्तिसार ४० वा अध्याय वाचवा.

मकर

या राशी साठी ग्रहण शुभ फलदायी राहील चिंतामुक्त वातावरण राहील रेंगाळलेली कामे करता येईल नवीन गोष्टींचे नियोजन करता येईल अर्थ सहाय्य उपलब्ध होण्यास मार्ग उपलब्ध होईल.नवीन दिशा मिळेल.हितशत्रुंवर विजय मिळवता येईल आजोळकडच्या नाते संबंधा मध्ये वितुष्ट येईल मामा अथवा मावशीच्या प्रकृती विषयी काळजी घ्यावी त्यांची चौकशी करून दिलासा द्यावा.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.घरी बसुन कामाचे नियोजन करावे.

:  मंत्र  :

ऊँ शं शंनच्चराय नम: | ऊँ राम् राहवे नम: | कालभैरवाष्टक किंवा मारुती स्तोत्र वाचावे.

कुंभ

हे ग्रहण राशी चक्राला मिश्र फलदायी राहील मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल.चिंतेत वाढ होईल आर्थिक बाबतीत विशेष लाभ होणार नाही.कार्यालयीन व्यवसायिक व नाते संबंधात वितुष्ट येईल.आरोग्या बाबतीत जास्त काळजी घ्यावी लागेल.शारिरीक प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी विशेष उपाय योजावे लागतील.जनसंपर्क टाळणे हितावह राहील गरजेपुर्ते पाहेर पडावे.

:  मंत्र  :

ऊँ शं शंनच्चराय नम: | महामृत्युंजय मंत्र म्हणावा.शनी स्तोत्र व शिवलीलामृत वाचावे.

मीन

राशी साठी हे ग्रहण अनिष्ट फलदायी राहील.आरोग्याशी निगडीत प्रश्न निर्माण होतील आर्थिक बाबतीतल चिंता अजुन दुर होणार नाही.वाढीव उत्पन्नासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.मागील ठरवलेल्या कामांना चलना मिळेल सध्या प्रत्येक बाबतीत दक्षता बाळगलेली चांगली राहील निर्णय घेताना घाई करू नये.जमिनीची व प्रॅापर्टीची कामे पुढे ढकलावी लागेल उत्साह ओतुन काम करावे लागेल.जनसंपर्क टाळावाच लागेल.

:  मंत्र  :

ऊँ बृहस्पत्ये नम: | ऊँ नम: शिवाय | महामृत्युंजय मंत्राचे पठण करावे.

गुरुचरित्रचा १८ वा अध्याय,राम रक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र वाचावे.

!!!शुभम भवतु !!!