राहुचे मिथुनेतील राश्यांतर : राशीगत परिणाम

नव ग्रहमालेतील एक महत्त्वाचे गोचर भ्रमण बदल म्हणजे राहु व केतु चे राश्यांतर.राहु चे एक राश्यांतर १८ महिन्याने होत असते व तो त्याच राशीवर परतुन दर १८ वर्षांनी येत असतो.शनिवारी २३ मार्चला सकाळी ११.३८ वाजता मिथुन राशीत प्रवेश करतो आहे.तर केतु धनु राशीत. ह्या राश्यांतरा चे मैदीनीय ज्योतिषा नुसार दुरगामी परिणाम राजकीय व सामाजिक जीवनावर होतील.जसे हे परिणाम राष्ट्राच्या व समाजाच्यारचनेवर होतील.तसेच ते व्यक्तीगत मनुष्याच्या आयुष्यावर पण होतील.ज्योतिष शास्त्रात राहु हा ग्रह छाया ग्रह संकल्पीत असुन,पाश्चिमात्य पद्धतीनुसार त्याला Dragon’s Head व केतु ला Dragon’s Tail म्हणतात.

शनी पाठोपाठ राहु ची भीती सर्व जातकात असतेच कारण तो एक क्रुर ग्रह आहे.राहुचा प्रादुर्भाव अनेक कुयोग उत्पन्न करतो.राग,लोभ,मोह व मत्सर,आळस आदी षडरिपुंना तो अनाठायी असे बळ देतो.राहु चे प्रमुख कारकत्व म्हणजे भ्रम आणि भ्रमित अवस्था व आळस राहुचे गारुड घट्ट करतात.राहु हा एका प्रकारचे संमोहन तयार करतो.ग्रहण नेहमी राहुच्या राशीतच घडतात.राहु हा ग्रह उच्च अभिलाषीअसा ग्रह असतो.राहुच्या भ्रमाचे भोपळे जेव्हा फुटतात तेव्हा भीषण वास्तवाला सामोरे जावे लागते.

राहु च्या विरुद्ध वर्तन केतु हा ग्रह करतो.मुळातच राहु वा केतु हे ग्रह नसुन ते प्रत्यक्ष राशी चक्राचे छेदन बिंदु आहेत.राहु हा भ्रम असेल तर केतु हे कटु वास्तव आहे.केतु मुक्तता देतो तर राहु जखडुन ठेवतो.केतु हा अध्यात्माचा मार्ग दाखवुन विरक्ती देतो.ह्या दोन्ही छाया ग्रहाचे गोचर राशीचक्र भ्रमण महत्त्वाचे असते कारण अनेकविद घटना ह्या भ्रमणकाळात अपेक्षित असतात.राहु चे मिथुन राशीतील  भ्रमण तसेच केतु चे धनु राशीतील भ्रमण सर्व राशींसाठी पुढील प्रमाणे राहील.

राशी निहाय फळे :

मेष : राहु राशीला तिसरा येत आहे.तर केतु भाग्य स्थानी शनी सोबत राहील.मेष राशीचे धैैर्य,साहस व धडाडी राहु मुळे वाढीस लागेल,नको ते साहस करावेसे वाटेल,वादविवाद होतील भावंडाशी मतभेद होऊन प्रश्न मार्गी लागतील,संबंध स्थिर होतील.राहु मुळे धावपळ वाढेल,राहु खुप प्रमाणात फायदेशीर असेल.केतु भाग्यात शनिसोबत राहील,प्रवासात काळजी घ्यावी,भाग्यकारक गोष्टी घडण्यात अडचणी येतील,वैराग्य येईल त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी.

वृषभ : राशी चक्राच्या धनस्थानी राहु येत आहे ,तर केतु अष्टमात शनी सोबत राहील.आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.कौटुंबिक सौख्यात काही ताण-तणावाचे प्रसंग येतील,वाद उद्भवतील,बोलण्यात तरबेजपणा व कटुता येईल.शब्द जपुन वापरावेत स्थावर अथवा वारसा हक्काचे वाद होतील.केतु अष्टमात शनी सोबत आहे.सदैव दक्ष राहणे गरजेचे आहे.वाद टाळावेत,घात,पात-अपघातापासुन सावध राहावे.मन स्थिर व शांत ठेवावे.

मिथुन : राशीतच राहु चे भ्रमण राहणार आहे तर केतु राशीच्या सप्तम स्थानात येईल.स्वतःची काळजी योग्य प्रकारे घ्यावी लागेल.नको ते साहस व धाडस अंगाशी येईल.बौद्धिक क्षमता ,तंत्रज्ञान व कलाक्षेत्रात असणाऱ्यांना शुभ फळ प्राप्त होतील,कल्पकता वाढीस लागेल,मन आनंदी व उत्साही राहील.केतु सप्तमात शनी सोबत असेल.सतत सावध असाव आणि स्वत:सोबत इतरांची काळजी घ्यावी,पारिवारिक,प्रापंचिक व व्यवहारिक जीवनात समस्या येतील,जोडीदाराशी जुळवून घ्यावे.

कर्क : राशीचक्राच्या बाराव्या स्थानी म्हणजे व्येय स्थानी राहु येत आहे.तर केतु षष्ठ स्थानात शनी सोबत येईल.राहु देण्या घेण्याचे प्रश्न मार्गी लावेल,मागील ताण तणावापासुन संपूर्ण नाही पण मोठा दिलासा मिळेल.प्रत्येक समस्यांना काही उपाय सापडणार आहे.विदेशगमनाचा मार्ग मोकळा होईल,व्हिसा अथवा पासपोर्टचे काम होईल.केतु षष्ठात राहील,हितशत्रुंचा त्रास वाढीस लागेल,जुने दुखण वर काढेल.नवीन व्याधी निर्माण होईल,वाहन चालवताना सावध असावे,आर्थिक व्यवहार जपुन करावा.

सिंह : राशी चक्राच्या लाभात राहुचे आगमन होईल,तर पंचमात केतु येईल,राहु मुळे लाभ स्थानाची शुभ फळे प्राप्त होतील,अनेक प्रकारचे लाभ होतील,आर्थिक व व्यवसायिक यश मिळेल,मित्र मंडळींचा स्नेह वाढीस लागेल,सततचे परिश्रम घबाड देऊन जाईल.केतु शनी सोबत पंचमात आहे.संतती ची काळजी घ्यावी,संतती व स्वत:चे ही आरोग्य जपावे,तीव्र दुख: वा संकट अचानक पणे दार ठोठवेल काळजी घ्या सावध असावे,योग्य आहार,विहार घ्यावा,मन प्रसन्न ठेवावे संततीच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे.

कन्या : राशी चक्राच्या दशमात राहुचे भ्रमण राहील.तर केतु शनी सोबत चतुर्थ स्थानी येईल.राहुचे भ्रमण कार्य शैलीत मोठा बदल घडवुन आणेल,कार्य शैलीतला बदल दिलासा ही देईल बदली अथवा बढती ही देईल.व्यवसायात हि अनेक फेरबदलांचा सामोरे जावे लागेल.नवनवीन संधी चालुन येतील.चतुर्थात केतु-शनी सोबत आहे.स्थावर मालमत्ता अथवा वास्तु संबंधी काही निर्णय होतील,वास्तु सोडावी लागेल किंवा नव्या जागेत स्थलांतर होईल,वाहन चालवताना काळजी घ्यावी,आईची सेवा करावी.

तुळ : राशीच्या भाग्य स्थानी राहुचे भ्रमण असेल तर केतु तृतीय स्थानी शनी सोबत भ्रमण करणार आहे.भाग्यातील राहु नव संकल्पना उभारी देईल.अध्यात्मिक यात्रा होतील,परदेशगमन  योग राहतील,धनलाभ होतील.केतु पराक्रमी भ्रमण करणार आहे.मनोवृत्ती प्रफुल्लीत राहील.भावंडाशी असलेले मतभेद ऐरणीवर येतील.नको ते साहस अंगाशी येईल.

वृश्चिक : राशीचक्राच्या अष्टमात राहु चे भ्रमण राहणार आहे.केतु शनी सोबत धनस्थानी विराजमान राहील.राहु चे हे भ्रमण आरोग्या संबंधी सजग रहावयास सांगणारे राहील.सतत काही ना काही त्रास घेत राहील,गाफिल राहु नका शांतता ठेवा.आर्थिक निर्णय जपुन घ्या,अपघातापासुन स्वतःला जपा,केतु व शनी धन स्थानात आर्थिक कोंडी निर्माण करतील,बोलताना शब्द जपुन वापरा.

धनु : राशी चक्राच्या सप्तम स्थाना मध्ये राहु चे भ्रमण राहणार आहे.केतु राशीत शनी सोबत भ्रमण करणार आहे.राहु चे सप्तमात भ्रमण प्रापंचिक सौख्य वादळ निर्माण करेल,गैरसमज  विसंवाद निर्माण होईल,सतत दक्ष राहावे लागणार आहे,निर्णय लांबणीवर टाकावेत,पत्नीशी भागीदारांशी कुठलाही वाद करू नका.केतु राशीत तापटपणा निर्माण करू शकतो.प्रसंगी नैराश्य ही येईल बैचेनी वाढणार आहे.मन शांतीचे विशेष प्रयत्न करावेत.

मकर : राहुचे भ्रमण षष्ठ स्थानात राहणार असुन केतु नवम स्थानात शनी सोबत राहील.राहु मुळे षष्ठ स्थानाची अप्रतिम फळे मिळतील.शत्रुंवर सहज विजय प्राप्त करता येईल,हित शत्रूंवर मात करता येईल,कोर्ट कचेरी बाबत निर्णायक यश मिळेल,ऋण मुक्तीचे मार्ग सुलभ होतील,आरोग्य सुस्थितीत राहील.केतु शनी सोबत व्येय स्थानात राहील,आर्थिक खर्च वाढतील,निर्णय चुकतील,मोठा आर्थिक फटका बसु शकतो आहे,नियम बद्ध काम करावे.

कुंभ : राशी चक्राच्या पंचम स्थानामध्ये राहु चे भ्रमण राहणार आहे.केतु लाभ स्थानात शनी सोबत राहील.इच्छा शक्ती प्रबळ होईल.नव कल्पना कार्यान्वीत होतील,संतती बाबतीत काळजी घ्यावी लागेल,संतती कडे दुर्लक्ष करणे महागात पडेल,आर्थिक लाभ होतील,स्वभावात बदल होऊन अहंकार वाढीस लागेल त्यामुळे शांत राहा वाद करू नका.केतुचे भ्रमण लाभात शनी सोबत आल्यामुळे कष्टाचा मोबदला मिळवताना अनंत अडचणी येतील,पैसा टिकणार नाही,नको त्या गोष्टी वर खर्च होईल सावध राहा.

मीन : राहुचे भ्रमण चतुर्थ स्थानी राहील.तर केतु शनी सोबत दशम स्थानात भ्रमण करणार आहे.राहुमुळे राहत्या जागेसंबंधी प्रश्न निर्माण होतील,एक तर वास्तुच नुतनीकरण होऊ शकते,अथवा वास्तु बदलण्याचे ही योग येऊ शकतात स्थावर मालमत्तेचे प्रश्न ऐरणीवर येतील,आईची काळजी घ्यावी लागेल.केतु चे दशमातील भ्रमण कठोर कष्टाशिवाय पर्याय नाही हे सांगणारे राहील.नौकरी व्यवसायात काहीसा तणाव निर्माण होईल.शांतात राखावी सबुरी ने घ्यावे हे ही दिवस जातील कार्य करत रहा.

राहुचा मंत्र : अर्धकाय महावीर्य चंद्रादित्य विमर्दनम् । सिंहिकागर्भसंभुत त राहु प्रणमाम्यहम् ।।

केतुचा मंत्र : पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम । रौद्र रौद्रात्मक घोरं तं केतु प्रणमाम्यहम् ।।

// शुभम भवतु //