मार्च महिन्याचे राशीभविष्य

इंग्रजी मार्च महिना हा मराठी माघ कृष्ण पक्ष व फाल्गुन शुक्ल पक्ष तसेच फाल्गुन कृष्ण एकादशी मध्ये विभागाला गेला आहे.उत्तरायणात शिशिर हा ऋतु राहील.महत्त्वाचे सण आणि महत्त्वाचे ग्रह बदल ह्या महिन्यात होत असल्यामुळे एकंदरीतच हा महीना सर्व राशीच्या जातकांसाठी फार महत्त्वाचा राहणार आहे.

मार्च महिन्यात महत्त्वाचे ग्रह बदल खालील प्रमाणे राहतील.१४ मार्च ला रवी मीन राशीत प्रवेश करतो आहे.१५ मार्चला बुध वक्री होऊन कुंभ राशीत राहील.२१ मार्च ला शुक्र कुंभ राशीत राहील.मंगळ २२ मार्चला वृषभ राशीत येईल.सर्वात महत्त्वाचा बदल आहे राहु आणि केतु ह्या ग्रहांचा २३ मार्च ला राहु मिथुन राशीत मध्ये तर केतु धनु राशीत येईल.गुरु हा ग्रह धनु राशीत २९ मार्च रोजी येईल.

महत्त्वाचे सण :

१.महाशिवरात्री – ४ मार्च

२.हुताशनी पौर्णिमा होळी – २० मार्च

३.धुलीवंदन – २१ मार्च

४.तुकाराम बीज – २२ मार्च

५.रंग पंचमी – २५ मार्च

६.श्री एकनाथ षष्ठी – २६ मार्च

मेष

ग्रहांची स्थिती : २२ मार्च ला राशीतुन द्वितीय स्थानी मंगळ राहुचे चतुर्थातुन तृतीयात प्रवेश या महिन्या अखेरीस होणार आहे.अष्टमातला  गुरु काही काळासाठी भाग्य स्थानी जाईल,नवम स्थानी शनी असुन केतु या महिन्याच्या अखेरीस प्रवेश करत आहे.शुक्र दशमात असुन महिन्याच्या मध्याला रवी लाभतुन  आणि व्येय स्थानातुन भ्रमण करणार असुन आणि बुध महिन्याच्या मध्याला लाभत जात आहे.संमिश्र फलदायी असा हा महिना आहे.

आरोग्य : या महिन्यात होणाऱ्या ग्रह बदलाचा आरोग्यावर परिणाम होणार असुन वैयक्तिक तब्येतीला जपावे आणि तसेच कुटुंबातील वडिलधाऱ्या मंडळीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.मंगळ आणि गुरु यांची महिन्याच्या पुर्वार्धातील स्थिती समस्या वाढवत आहे पण उत्तरार्धात दोन्ही ग्रह अनुकुल होत असल्यामुळे महिनाभर असलेला त्रास महिन्या अखेरीस कमी होत आहे.आरोग्या बाबतीत या महिन्यात खर्च होऊ शकतो आहे त्याची तयारी असु द्यावी.

आर्थिक : एकंदरीत ग्रह स्थिती पाहत या महिन्यात आर्थिक चणचण जाणवणार असुन त्यामुळे मानसिक ताण वाढविणारा महिना राहील.वैद्यकीय आणि प्रवासाचा खर्च या महिन्यात जास्त होऊ शकतो आहे.महिन्याच्या पुर्वार्धात पैशाची चणचण जाणवेल आर्थिक मदत मिळणार नाही त्यामुळे आर्थिक कोंडी होऊ शकते.महिन्याच्या अखेरीस मंगळ आणि गुरु बदलामुळे असलेल्या परीस्थित सुधार होऊन काही प्रश्न मार्गी लागतील.

नौकरी : नौकरी करणाऱ्यांसाठी या महिन्यात एकंदरीत अनुकुलता नसुन महिन्यात संभाव्य हितशत्रु पासुन अत्यंत सावध राहावे लागणार आहे.आपली जराशी ही चुक आपल्याला संकटात ओढु शकते.वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांची अवज्ञा करू नका त्यांच्या  प्रत्येक आज्ञेचे पालन करा जेणे करून नौकरी टिकुन राहील.आगामी काळात राहु बदला नंतर एकंदरीत परिस्थिती बदलत आहे.ज्यांना वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील आणि तुम्हाला वरिष्ठांकडुन पाठबळ पण मिळेल.

व्यवसाय  : मार्चचा महिना अखेर असल्यामुळे व्यवसायिकांसाठी हा महिना चिंतातुर राहणार असतोच त्याच प्रमाणे तो आहेच.एकंदरीत भरपुर समस्या असल्यामुळे तुमचे वैयक्तिक कौशल्य तुम्हाला यातुन तारून नेऊ शकते आहे.एखादी छोटीशी चुक हि तुमच्या प्रगतीला खीळ बसवु शकते.कुठलेही काम  विचारपुर्वक आणि संयमाने करावे लागणार आहे.महिन्याच्या अखेरीस एकंदरीत असलेली परिस्थिती बदलुन अनुकुल असा काळ राहील.

कोर्टकचेरी : या महिन्यात कोर्ट कचेरीच्या बाबतीत प्रलंबित आणि निराशाजनक असा महिना असुन आपल्या सर्व कामांसाठी संयम बाळगावा लागणार आहे.एकंदरीत ग्रहस्थिती अनुकुल नसल्याने  कामांना गती देण्याएवजी काही काळासाठी पुढे ढकलावीत.

नातेसंबंध : मानसिक पातळींवर सुद्धा हा महिना परीक्षा पाहतो आहे.कुटुंबातील वातावरण नरम गरम राहील.घरातील सगळ्यांशी जुळवून घ्यावे लागणार आहे.एखादी अनपेक्षित अप्रिय घटना घडणार असुन त्यामुळे मानसिक ताण तणावात भरच पडणार आहे.शांततेचे धोरण स्वीकारल्यास महिन्या अखेरीस सर्व काही अनुकुल होत आहे.

विद्यार्थी : हा महीना परीक्षेचा कालखंड असल्यामुळे एकंदरीत परीक्षेचे आणि अपेक्षांचा ताण वाढवणारा असा महीना आहे पण अभ्यास नियोजित वेळेत पुर्ण करून भरपुर मेहनत घेतल्यास आगामी काळत प्रगती साठी उत्तम संधी आहेत आणि यश तुमचेच आहे.पालकांनी पाल्यांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्या कडे लक्ष द्यावे.

वृषभ

ग्रहांची स्थिती : रवी महिन्याच्या मध्याला दशमातुन लाभत येईल.तर बुध भाग्यातुन दशमात येईल २१ मार्च रोजी भाग्यातून शुक्राचे भ्रमण दशमस्थानी होईल.मंगळ २२ मार्च रोजी व्येय तुन राशीत येईल.२३ मार्च ला राहु राशीत येत आहे आणि केतु अष्टमात जाईल.मंगळ धैर्य देईल.शनी आणि केतु त्रासदायक स्थिती उत्पन्न करतील.

आरोग्य : महिन्याच्या सुरवातीला रवी,गुरु,शुक्र यांचे अनुकुल ग्रहमान असल्यामुळे प्रकृती बाबतीत काळजी करावयाची गरज नाही.परंतु महिन्याच्या मध्यानंतर आणि महिनाअखेरीस होणाऱ्या राहु केतु बदलामुळे आरोग्यास जपावे लागणार आहे.व्यायाम,योगा आणि प्राणायाम यांचा अभ्यास सुरु ठेवल्यास आगामी काळातील आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.घरातील वडिलधाऱ्यांच्या तब्येतीला जपावे आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

आर्थिक : महिन्याच्या पुर्वार्धात आर्थिक पातळीवर समाधानकारक अशी स्थिती आहे असे म्हणता येईल.महिन्याच्या पुर्वार्धात एखादा अनुकुल निर्णय घेऊन अंमलात आणला तर पुढील येणारा काळ उत्तम जाईल.महिन्याच्या अखेरीस होणारा राहु बदल हा काहीसा प्रतिकुल असल्याने आर्थिक प्रगती संथ होईल किंवा काही काळासाठी स्थगिती येऊ शकते आहे.अचानक एखाद्या खर्चाला सामोरे जावे लागेल.त्यामुळे संकटाची परिस्थिती येऊ शकते आहे.

नौकरी : महिन्याचा पुर्वार्ध अनुकुल असणार आहे पण महिन्याच्या मध्यानंतर होणार कामच्या ठिकाणाचे बदल काही काहीसे वेगळे आणि मनाविरुद्ध असतील.आपण उत्तम काम करूनही काही गोष्टी आपल्या मनासारख्या  होणार नाही.सहकाऱ्या सोबत वाद संभवतो आहे आणि त्याच्या एकंदरीत तुमच्या कामावर परिणाम होईल वरिष्ठ सुद्धा तुमच्या विरोधात असतील.एकंदरीत महिना कसोटीचा आहे.

व्यवसाय: या महिन्यात एकंदरीत व्यवसायिक पातळीवर परिस्थिती स्वनियंत्रणात आणावी लागणार आहे.आपल्या स्पर्धकांसोबत सावध राहावे लागणार असुन व्यवसाय विस्तारीकरणापेक्षा व्यवसाय स्थिर करण्यावर जास्त भर द्यावा लागणार आहे.महिन्याच्या पुर्वार्धात महत्त्वाची कामे उरकुन घ्या,जेणेकरून आगामी काळात प्रतिकुल परीस्थित तुम्ही तग धरू शकाल.कुणावरही सहज विश्वास ठेवु नका.वैयक्तिक ग्रहबल उत्तम असल्यास प्रगती साधता येईल.

कोर्टकचेरी : प्रलंबित खटले अजुन काही काळासाठी प्रलंबितच  राहतील कोर्टाबाहेर तडजोड करता आली तर प्रयत्न जरूर करावा.वकील मंडळीशी वाद संभवतो आहे.त्यामुळे कायदेशीर बाबी बाबत जपुन व्यवहार  करावा.

नातेसंबंध : महिन्याची सुरवात उत्तम असणार आहे कुटुंबीयानकडून मानसिक पाठबळ मिळेल.कुटुंबासोबत उत्तम वेळ घालवता येईल,एखादी आनंदाची वार्ता मिळु शकते आहे.जोडीदारा कडुन विवाह सौख्य मिळेल.एकाकी हे सौख्यदायी वातावरण महिन्याच्या अखेरीस पुर्णपणे बदल होणार असुन त्यासाठी एकंदरीत संयमाची गरज असणार आहे.

विद्यार्थी : विद्यार्थ्यासाठी अनुकुल असा काळ राहणार असुन दिलेल्या परिक्षेचा निकाल चांगला लागलेला असल्यामुळे एकंदरीत मानसिकता उत्तम राहील.आगामी काळात असणाऱ्या परीक्षेसाठी भरपुर मेहनत घ्यावी लागणार आहे.पालकांनी पाल्यांच्या मानसिकतेकडे विशेष लक्ष द्यावे.

 

मिथुन

ग्रहांची स्थिती : महिन्याच्या मध्याला रवी भाग्यातुन दशमात जाईल तर बुध वक्री अवस्थेत भाग्यात येईल.२१ मार्च ला अष्टमातून शुक्र भाग्यात येईल २२ मार्च ला लाभातुन मंगळ व्येय स्थानात जाईल.२३ मार्चला राहु राशीत तर केतु सप्तमात शनी सोबत भ्रमण करेल.२१ मार्चला गुरु सप्तमात येत आहे.हा महिना पुर्वार्धात बराच प्रतिकुल तर उत्तरार्धात अनुकुल असणार आहे.

आरोग्य : एकंदरीत महिन्याच्या पुर्वार्धात आरोग्याची काळजी करावयाची काही गरज नाही कारण मंगळ आणि शुक्र अनुकुल असणार नाहीत.महिन्याच्या अखेरीस येणारा राहु आणि सप्तमातला शनी आरोग्याची काळजी घ्यावी लागणार असा संकेत देत आहे त्यामुळे महिन्याच्या अखेरीस आणि आगामी पुढील काळासाठी तब्येतीला जपावे लागणार आहे.योग्य वेळी योग्य ते उपचार घेऊन आरोग्याला जपावे.अनपेक्षित खर्च करावा लागणार आहे.

आर्थिक : आर्थिक आघाडीवर महिन्याच्या मध्या पर्यंत स्थिती एकंदरीत चिंताजनक राहणार आहे.आर्थिक आलेख हा काहीसा खाली जाणाराच आहे.पैशाची जुळवा जुळव करावी लागेल.कर्ज मंजुर होण्याची शक्यता नसल्यामुळे त्यावर अवलंबुन राहु नये.कुटुंबात एखादा अनपेक्षित खर्च उद्भवु शकतो.महिना अखेरपर्यंत एकंदरीत अशीच स्थिती राहणार असल्याने व्यवहार जरा जपून करावेत गुंतवणुक करताना काळजी घ्यावी.

नौकरी : आव्हानांनी परिपुर्ण असा हा महिना असुन त्यांचा सामना संयमाने आणि चिकाटीने करणे अत्यंत गरजेचे राहील.नौकरीच्या शोधात असणार्यांना आणि सध्या नौकरी करत असलेल्या जातकांना आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.नौकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा आणि तिथे असलेल्या छुप्या राजकारणाचा त्रास होऊ शकतो आहे.नकारात्मकतेचे सावट राहील.परंतु महिन्याच्या मध्यानंतर एकंदरीत स्थितीत बदल होणार असुन परिस्थिती अनुकुल अशी होईल आणि नौकरी शोधणाऱ्याना नवीन नौकरी मिळण्याचा योग संभवतो आहे महिना अखेरीस.

व्यवसाय : मार्च महिना खऱ्या अर्थाने व्यवसायिकांची परीक्षाच पाहतो त्यामुळे व्यवसायिकांना या काळ बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. खर्च वाढतील महिन्याच्या मध्यापर्यंत खर्च कमी करावेत असलेल्या परिस्थिती तग धरावा लागेल महिन्याच्या अखेरीस काही अनुकुलता तुमच्या वाट्यास येत आहे ज्याचा आगामी काळत लाभ होईल.

कोर्ट कचेरी : या बाबतीत कामे लांबवावी लागतील,एकंदरीत ग्रहदशा पाहता सगळ काही आपल्या विरोधात आहे अशी स्थित असल्यामुळे वकील मंडळींवर पण विश्वास ठेवता येण्यासारखी परिस्थिती नाहीये.महिन्या अखेरीस ग्रहदशा अनुकुल असल्याने कामे महिन्या अखेरपर्यंत लांबवली तर उत्तम राहील.

नातेसंबंध : सर्व बाजुनी समस्यांनी घेरलेले असताना त्यात कौटुंबिक पातळीवर सुद्धा अडचणींचा सामना करावा लागणार आहे.कुठलेही शुभ कार्य करताना सगळ्यांना समजुन घेताना मानसिक ओढा-ताण  होईल.परंतु या परिस्थितीतुन महिन्याच्या अखेरीस दिलासा मिळणार आहे.जोदिदारासोबात्चे नाते सुद्धा संयमाने जपावे लागेल.आणि महिन्या अखेरीस सगळ्या समस्या दूर होऊन कौटुंबिक पातळीवर आनंदाचे वातावरण राहील.

विद्यार्थी : परीक्षेचा काळ असल्याने खात्डत परिश्रम करणे आत्यंतिक गरजेचे असुन स्वत: वर विस्वास आणि आपला अभ्यास दोन्ही वाढवण्याची गरज आहे परीक्षेचा ताण न घेता त्या उर्जेचा वापर अभ्यासात करावा.पालकांनी पाल्यांचे मनोबल वाढवावे.

कर्क

ग्रहांची स्थिती : महिन्याच्या मध्याला रवी अष्टमातून भाग्यात जाईल.बुध अष्टमात जाईल.बुध अष्टमात वक्री जाईल राहील २१ मार्च ला शुक्र अष्टमात राहील.२२ मार्चला मंगळ लाभत येईल २३ मार्च ला राशीतुन राहु निघून जाऊन व व्येय स्थानी जाईल.केतु सप्तमात षष्टा त शनी सोबत राहील एकंदरीत महीना धावपळीचा आणि दगदगीचा राहील.

आरोग्य : या महिन्यात ग्रहांचे पाठबळ चांगले असल्याने प्रकृती बाबतीत काळजी राहणार नाही.तुमचे वेयक्तिक आरोग्य उत्तम राहिलच आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुद्धा उत्तम राहील.शारिरीक आणि मानसिक पातळीवर आरोग्य उत्तम असणार असल्यामुळे हा महीना उत्साहात वाढ करणारा राहील.

आर्थिक : एकंदरीत धनाने समृद्धीचा असा कालखंड आहे.उत्तम बचत आणि गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे गुंतवणुक म्हणुन एखादी वास्तु किंवा जमीन जुमल्याचा विचार करत असाल तर अगदी सहजपणे तुम्ही करू शकता.वाहन खरेदीसाठी सुद्धा अनुकुल असा काळ असल्याने योग्य ती तजवीज करून ठेवता येईल.सगळीकडे समृद्धी असाच हा महिना आहे त्याचा पुरेपुर वापर करावा.

नौकरी : या बाबतीत तुमच्या प्रगतीचा आलेख चढता राहील.वरिष्ठ तुमच्या कामा मुळे खुश होऊन तुमची दखल घेतली जाईल आणि तुमचे कौतुक सुद्धा होईल.बऱ्याच काळापासून रखडत आलेले बढतीचे योग या महिन्यात संभवतो आहे.तुमच्या कामामुळे तुमच्या विरुद्ध कारवाया वर आळा बसेल आणि काही काळासाठी तुमच्या विरुद्ध कारवाया थांबतील.

व्यवसाय : मार्च चा महीना असला तरी व्यवसायीकांसाठी उत्तम प्रगती साधुन देणारा असा महिना राहील.सगळी कामे तुम्ही नियोजित ठरविल्याप्रमाणे होतील.तुमच्या स्पर्धकांवर विजय मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.तुमच्या मनाप्रमाणे व्यवसाय विस्तार या महिन्यात करण्यासाठी अनुकुल असा काळ आहे.गुंतवणुकीचा प्रयत्न करावा.

कोर्ट कचेरी : या आघाडीवर समाधानकारक असा महिना राहील एखाद्या दीर्घ कालीन प्रकरणातुन सुटता येईल तुम्ही सदर केलेले सर्व सबळ पुरावे ग्राह्य धरल्या जातील आणि निकाल तुमच्या बाजुने लावला जाईल.महत्वाची कामे महिन्याच्या मध्या पर्यंत पुर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

नातेसंबंध : मानसिक सौख्य या महिन्यात उत्तम लाभणार आहे.घरातील वातावरण एकंदरीत सकारात्मक आणि खेळीमेळीचे राहील.घरातील ज्येष्ठ तसेच धाक्त्यांकडून भरभरून  प्रेम आणि सन्मान मिळेल घरात एखादे शुभ कार्य घडेल.एखादे शुब कार्य आपल्याकडून घडू शकते.त्यानिमित्ताने नातलगांच्या गाठीभेटी चे योग आहेत.जोडीदारा कडुन भरभरून प्रेम आणि कौटुंबिक सौख्याची प्राप्ती होणार आहे.

विद्यार्थी : एकंदरीत महिना उत्तम आनंदाचा आणि यास्दायी जाईल अभ्यास झाल्यामुळे आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाता येईल.मागील परीक्षांच्या यशामुळे आत्मविश्वास द्विगुणीत होईल.पालकांनी पाल्यांचा हालचालींकडे लक्ष ठेवावे उत्साहाच्या भरात काही चुका घडु नये.

 

सिंह

ग्रहांची स्थिती : राशीस्वामी रवी महिन्याच्या मध्याला आकस्मात येईल तर सप्तमात बुध वक्री राहील.२१ मार्च ला शुक्र सप्तमात येईल.२२ मार्च ला मंगळ दशमात येईल.२३ मार्च ला राहु व्येय स्थानातुन लाभ स्थानी जाईल तर केतु षष्ठात येईल २३ मार्च ला गुरु पंचमात जाईल.मार्च महिना सिंह राशीच्या जातकांसाठी बराच फलदायी राहील.

आरोग्य : एकंदरीत ग्रह स्थिती पाहता तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.तब्येतीची विशेष काळजी या महिन्यात घ्यावीच लागेल.कुठल्याही प्रकारचे विकार उद्भवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.जुने विकार डोके वर काढण्याची  शक्यता आहे.प्रकृती सुधारण्यासाठी योगा आणि प्राणायाम यांची मदत होईल त्याच प्रमाणे शिव उपासना व ध्यान धारणा लाभदायक ठरेल आणि मानसिक पाठबळ मिळेल.

आर्थिक : या बाबतीत महीना खर्चदायी राहणार असुन पैशाची आवक कमी आणि जावक जास्त राहील.खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा काही खर्चांना नाही म्हणता येणार नाही.महिन्याच्या मध्या पर्यंत तरी अशीच स्थिती राहणार असुन महिना अखेरपर्यंत परिस्थिती बदल होणार असुन काही नवीन पर्याय दृष्टीस पडतील.

नौकरी : नौकरी बाबतीत महिना अनुकुल राहील.कामाच्या ठिकाणी अनुकुल परिस्थिती राहील तरी सुद्धा वाढीव कामा मुळे ताण तणाव राहील आणि त्यामुळे एक अनामिक भीती घर करून राहील.परंतु महिना अखेर पर्यंत वरिष्ठांची मदत मिळुन कामाचा ताण निवळु शकतो.आणि बढतीचे योग आहेत.

व्यवसाय: व्यवसायीकांसाठी ताणतणावाचा महिना राहणार आहे.सर्व समस्या एकाच वेळी उद्भवल्यामुळे कुठे लक्ष देऊ आणि कुठे नाही असे होईल.त्यामुळे लक्ष विचलित होऊन कामावरून लक्ष उडेल आणि कामाची तारांबळ उडेल.स्पर्धकांमुळे दबाव वाढेल महिन्याच्या मध्यापर्यंत एकंदरीत अशीच परिस्थिती राहील.

कोर्ट कचेरी : या आघाडीवर महिन्याच्या मध्यापर्यंत काही अनुकुल असा कालखंड नसल्याने आपल्या बाजुसने सकारात्मक असे काहीही घडणार नाही.स्थावर मालमत्ते संबंधी चे खटले ताण वाढवतील,वकील मंडळींशी वाद संभवतो आहे.कुठलाही व्यवहार करताना जरा जपुन करावा.

नातेसंबंध : कौटुंबिक सौख्याच्या बाबतीत हा महिना काहीसा प्रतिकुल आहे.तुमच्या बद्दल गेरसमज झाल्यामुळे नकारात्मकता वाढीस लागेल.घरात एखादे कार्य असेल तर सगळ्या च्या मागण्या पुर्ण करताना मानसिक ताण तणाव वाढणार आहे.हि परिस्थिती महिन्याच्या शेवटपर्यंत राहणार असुन परंतु शेवटच्या टप्प्यात या सर्व समस्या निवळतील.जोडीदारा कडुन सुद्धा या महिन्यात कौटुंबिक सौख्याची अपेक्षा करता येणार नाही.संवादाने साधल्याने वाद मिटवण्याचे प्रयत्न करावेत.महिना अखेरीस सर्व वाद संपुन जाण्याची शक्यता आहे आणि गेरसमज पण दुर होतील.

विद्यार्थी : परिक्षेचा काळ असल्याने अभ्यासाची तयारी जोरदार करावी लागेल.आता केलेल्या खडतर प्रयत्नांना भविष्य कळत यश मिळेल.परिक्षेला सामोरे जातांना आत्मविश्वासाने सामोरे जावे लागेल.पालकांनी पाल्यांना मानसिक प्रोहत्साहन द्यावे .

 

कन्या

ग्रहांची स्थिती : महिन्याच्या मध्याला रवी  षष्ठतुन सप्तमात येईल तर बुध षष्ठात वक्री होईल २१ मार्च रोजी शुक्र षष्ठात येईल २२ मार्चला अष्टमातुन मंगळ भाग्यात येईल.२५ मार्च ला राहु दशमात तर केतु शनिसोबत चतुर्थात येईल २१ मार्च ला गुरु काही काळ शनी केतु सोबत चतुर्थात येईल.कन्या जातकांसाठी सावधगिरी बाळगावी लागेल.धाडस टाळावे काळजी घ्यावी.

आरोग्य : आरोग्याच्या तक्रारींनी परिपुर्ण असा महिना आहे .मंगळ आणि शनीची एकंदरीत दृष्टी बघता दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती आरोग्याच्या बाबतीत असणार आहे. शारिरीक आणि मानसिक पातळीवर आरोग्य जपावे लागणार आहे.तब्येतीचा आलेख खालवत राहील.कुटुंबातील लोकांच्या तब्येतीकडे पण लक्ष द्यावे लागेल.लवकरात लवकर योग्य उपचार घ्यावेत महीना अखेरीस यातुन दिलासा नक्कीच मिळेल.

आर्थिक : आर्थिक चणचण या महिन्यात प्रकर्षाने जाणवेल या आघाडीवर खुप त्रासदायक असा हा काळ असणार आहे.यामुळे अपमान होऊन मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे खबरदारी घ्यावी कुठलाही अचानक खर्च उद्भवु शकतो आणि त्याला नाही म्हणता येणार नाही.आर्थिक गणिताची जुळवाजुळव करतना तारांबळ उडेल.परंतु महीना अखेरीस असलेले सर्व ताण निवळायला सुरवात होईल.

नौकरी : महिन्याच्या मध्यापर्यंत काळ खडतर असणार आहे.या महिन्यात सावधानतेने राहणे आत्यंतिक गरजेचे आहे कारण एकंदरीत वातावरण पाहता तुमच्या वर विशेष लक्ष असल्याने तुमची छोटीशी ही चुक तुम्हाला संकटात ओढु शकते.वरिष्ठांसोबत वाद न घालता त्यांची आज्ञा मान्य करा.कुणालाही तुमच्या विरुद्ध तक्रारीची संधी देऊ नका.महिना अखेरीस राहु बदला नंतर काही चांगले परिणाम पहावयास मिळतील.

व्यवसाय : मार्च अखेर असल्यामुळे व्यवसायिकांसाठी एकंदरीत प्रतिकुल परिस्थिती असणार आहे.पण तुमची ग्रहदशा त्यात अजुन भर टाकते आहे.देणीदार मागे लागतील.कुठलही काम करताना काळजीपुर्वक करा.स्पर्धकांशी काही काळ स्पर्धा थांबवुन आपली परिस्थिती सुधारण्यावर भर द्यावा लागेल.

कोर्टकचेरी : सर्व कामांवर स्थगिती आणुन संयमाची परीक्षा पाहणारा महीना असुन.आपल्या बाजुने पुरावे असुनसुद्धा आपली बाजु मांडता येणार नाही असे एकंदरीत चित्र आहे.काही कामकाज महिना अखेरपर्यंत लांबवावे लागतील.ऐखाद्या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागु शकतो.

नातेसंबंध : नात्यांमध्ये ताण तणाव जाणवेल.सगळे जग आपल्या विरोधात आहे अशी जाणीव आपल्याला या कळत होऊ शकते.कुठल्याही छोट्या गोष्टीवरून कालह  संभवतो आहे त्यामुळे कोणाशीही वाद घालु नका शांततेने समजून घेतल्यास महिनाअखेरीस काही बाबी आपल्या मनासारख्या घडायला सुरवात होईल.आणि परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल.जोडीदारा कडून सुद्धा वेवाहिक सौख्याची अपेक्षा करता येणार नाही कारण एकंदरीत हा काळ सर्व नात्यांमध्ये तुमच्यासाठी एक तणाव निर्माण करतोय.महिना अखेरपर्यंत सर्व परिस्थिती आणि समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतील.

विद्यार्थी : परिक्षेचा काळ असल्याने अभ्यास एके अभ्यास अशीच भूमिका असावी.प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.आगामी परिक्षेत मनाजोगते यश मिळवण्यासाठी अथक प्रयत्नाशिवाय पर्याय नाही.पालकांनी पाल्यांना अभ्यासासाठी पूरक असे वातावरण द्यावे.

 

तुळ

ग्रहांची स्थिती : महिन्याच्या मध्याला राहु षष्ठात  तर बुध वक्री अवस्थेत पंचमात  राहील.२१ मार्च ला शुक्र पंचमात येईल तर मंगळ २२ मार्चला अष्टमात जाईल.राहु केतु अनुक्रमे २३ मार्च ला भाग्य व पराक्रमात येईल.शनी पराक्रमात राहील.२१ मार्च ला शानिसोबत पराक्रमात येईल.तूळ राशीसाठी मार्च महीना उर्जा पुरवठा करणारा राहील.मेहनत वाढवावी लागेल जोखीम टाळावी.अपघातापासुन जपावे.

आरोग्य : तब्येत ठणठणीत आणि उत्तम राहणार असुन घरातल्या सदस्यांची सुद्धा तब्येत उत्तम राहील.शारिरीक स्वास्थ्य उत्तम असल्यामुळे एकंदर मन स्वास्थ्य पण उत्तम राहील.सर्व काही उत्तम असल्यामुळे गाफिल न राहत लक्ष असू द्यावे ,एखादी दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सकारात्मक ग्रहांचे पाठबळ उत्तम असल्याने त्यातून हि लगेच बरे व्हाल.

आर्थिक: आर्थिक आघाडी शुभ ग्रहांमुळे उत्तम असणार आहे आणि त्यामुळे बचत आणि मनासारखी गुंतवणुक करता येणार आहे.गुंतवणुकीमुळे पुढील काळात पेशाचा ओघ वाढता राहील.वास्तु किंवा वाहन खरेदीसाठी उत्तम योग आहेत.एकंदरीत लक्ष्मी स्वत: समृद्धी भरभरून तुमच्या साठी घेऊन येत आहे.

नौकरी : नौकरी करणार्यांसाठी उत्तम काळ असणार आहे.प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त असा महीना असुन तुम्हाला मिळालेल्या संधीच सोन केल्यास तुमच्या उत्तम कामगिरीमुळे तुम्हाला महत्त्वाची जबाबदारी अथवा पगार वाढीचे योग आहेत.शत्रूंची कुठलीच गोष्ट त्यात बाधा घालु शकणार नाही एकंदरीत कामामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि त्याचा आगामी काळातील प्रगतीसाठी तुम्हाला उपयोग होईल.

व्यवसाय : व्यवसायात नवीन उंची गाठता येईल.प्रगतीचा आलेख हा चढता राहील.स्पर्धा जरी असली तरी तुमच्या कौशल्याने आणि परिश्रमाने त्यावर सहज पणे तुम्हाला त्यावर मात करता येईल.एखाद्या कार्यासाठी जर आर्थिक मदत हि कर्ज किवा गुंतवणुक च्या रूपाने पुर्ण होणार असुन त्या बाबतीत काळजी करावयाचे काही कारण नक्कीच नाही.

कोर्ट कचेरी :  तुमचे पुरावे तुमच्यासाठी अनुकुल सिद्ध होऊन निकाल तुम्हास हवा तसाच लागेल.मानहानी ची एखादी बाब असेल तर त्यात नुकसान भरपाई सुद्धा मिळेल.दीर्घ कालीन प्रकरणातुन सुटका होईल.महीनाच्या मध्या नंतर असलेली प्रकाराने आगामी काही काळासाठी रखडतील.

नातेसंबंध : सगळ्यांसोबत या बाबतीत सुसंवाद,सकारत्मक्ता आणि सुसंबंध प्रस्थापित होतील.मुलांकडून प्रगतीची चांगली वार्ता मिळेल, कुटुंबातील एखाद्या शुभ कार्यात उपस्थित राहावे लागेल.नातेवाईक मंडळींशी,स्नेहीच्या गाठी भेटी होतील.त्यामुळे मन प्रसन्न राहील.जोडीदारा बरोबर उत्तम काळ घालवता येईल वेवाहिक सौख्य उत्तम राहील.

विद्यार्थी : शेक्षणिक प्रगती उत्तम राहील.परीक्षेचा कालखंड असल्यामुळे भरपुर अभ्यास केल्यामुळे परिक्षेत मनासारखे यश मिळवता येईल मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास द्विगुणीत होईल आणि घरातही आनंदी वातावरण राहील.पालकांनी पाल्यान पुढील काळासाठी प्रोत्साहित करावे.

 

वृश्चिक

ग्रहांचीस्थिती : रवी महिन्याच्या मध्यानंतर पंचमात येईल तर बुध चतुर्थात येईल २१ मार्च ला शुक्र चतुर्थात येईल.२२ मार्च ला मंगळ सप्तमात येईल.२३ मार्च ला राहु अष्टमात तर केतु धनस्थानी येईल.धनस्थानी शनी आहे.२१ मार्चला गुरु शनी व केतु सोबत धनस्थानी येईल.हा महीना अनुकुल असल्याने शुभ फलदायी असणार आहे.

आरोग्य : महिन्याच्या सुरवातीला काहीशी मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे.वातावरण बदलामुळे संसर्ग होऊ शकतो आहे त्यामुळे तब्येतीला जपावे लागेल.मंगळ तुम्हाला उत्साह आणि उर्जा देत असल्यामुळे त्यावर सहज पाने मात करता येईल.घरातील मंडळींच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल आणि वेद्यकीय खर्चाची हि जमा-ठेव करावी लागेल.जेणे करून आगामी कळत त्याचा ताण येणार नाही.

आर्थिक : आर्थिक स्थिती समाधानकारक राहणार असुन काही खर्चांना इच्छा नसताना सामोरे जावे लागणार आहे.कुटुंबात एखादे कार्य असल्यामुळे अचानक खर्च करावा लागु शकतो.महिन्याच्या मध्यानंतर परिस्थितीत फरक पडतो आहे पण लाभ लगेच मिळणार नाही.असलेली परिस्थिती उत्तम नसली तरी,महिनाअखेरीस  परिस्थिती बदलण्याचे योग आहेत.

नौकरी : महिन्याच्या मध्या पर्यंत महिना त्रासदायक आणि ताण-तणावाचा आहे.कामात थोडाफार उत्साह जाणवणार आहे त्यामुळे नियोजित कामे वेळेत पुर्ण होतील.छुप्या राजकरणापासुन सावधान रहाव लागेल.पण अथक परिश्रम करणे आत्यंतिक गरजेचे आहे वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल.असलेली नौकरी टिकवुन ठेवावी लागेल.मध्यानंतर तुमच्या बढतीचे योग असतील.

व्यवसाय : मेहनतीमुळे मिळवलेली सगळ्या गोष्ठी हातातुन निसटून जाण्याचे योग आहेत.त्यामुळे आपल्या हितशत्रु पासुन सावध राहावे लागेल.एखादे काम मिळणारे पण मिळणार नाही अशा प्रकारची प्रतीकुलता आहे.हाताखालची माणसे पण काम सोडुन जातील किवा दगा देतील.महिन्याच्या मध्या पर्यंत एकंदरीत अशीच परिस्थिती राहील महिना अखेरीस परिस्थिती बदलण्याचे योग आहेत.

कोर्टकचेरी :महिन्याच्या मध्या पर्यंत तुमच्या बाजूने काहीही अनुकुल घडणार नाही.वकिलांशी आर्थिक देवाण घेवाणा वरून वाद संभवतो आहे त्यामुळे वकिलांशी विरोधाची भुमिका ओढवून घेऊ नका.

नाते संबंध: कौटुंबिक आघाडीवर संमिश्र असा महिना राहणार आहे.काही चांगल्या वाईट अश्या बातम्यांची वार्ता शृंखला सुरूच राहणार आहे.परंतु वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा उत्तरे आपल्याला वेळेनुसार मिळतीलच.सगळी बाजू समजुतदार पद्धतीने हाताळावी लागेल.जोडीदाराकडून काही सौख्याची अपेक्षा करता येणार नाही महिनाअखेरपर्यंत वातावरण निवळणार आहे.

विद्यार्थी : अभ्यासात लक्ष एकाग्र करावे लागेल.मन जरी लागले नाही तरी उमेदाने आणि उत्साहाने अभ्यासाला लागावे लागेलच परिक्षेत मनाजोगते यश मिळवण्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागतील.

 

धनु

ग्रहांची स्थिती : उत्तरार्धात रवी चतुर्थात तर बुध तृतीयात जाईल २२ मार्च ला मंगळ षष्ठात येईल.२३ मार्चला राहु सप्तमात तर केतु राशीत येईल.राशीत सध्या शनी आहे.२१ मार्च ला गुरु व्येयातुन राशीत येईल.मार्च महिना संमिश्र फलदायी राहील.आर्थिक व्यवहार फार जपुन करावेत.निर्णय घेताना काळजी घ्यावी.

आरोग्य :  नकारात्मक ग्रहांची स्थिती प्रतिकुल असल्यामुळे तब्येतीला जपावे लागेल.मानसिक स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.घरातील मंडळींच्या तब्येतीला सुद्धा जपावे लागेल.शारिरीक स्वास्थ्य उत्तम असल्याने त्या पातळीवर जमेची बाजु राहणार आहे.

आर्थिक : आर्थिक स्थितीचा आलेख खालावणारा राहणार असुन खर्च वाढवणारा महिना आहे.एखादे आकस्मित खर्च उद्भवून मोठा आर्थिक फटका बसु शकतो आहे.कुठलीही व्यवहार करताना जाणीवपुर्वक जपुन करावी लागेल एखादी क्षुल्लक बाब हि गोत्यात आणु शकते.काही महत्त्वाचे व्यवहार असतील तर काही काळासाठी पुढे ढकलले तर उत्तम राहील.

नौकरी : या महिन्यात अत्यंत अवघड अशी परिस्थिती असुन सगळ्याच पातळीवर सगळ्यांना सामोरे जावे लागणार असुन कामापेक्षा कार्यालयातल्या इतर बाबींचा त्रास जास्त होणार आहे.कार्यालयात होणारे बदल अंगीभूत करायला वेळ लागेल.सहकार्यांशी वाद संभवतो आहे त्यामुळे साग्ल्यासोबत खेळीमेळीचे वातावरण ठेवावे लागेल.

व्यवसाय: आर्थिक चणचण असल्यामुळे काम करण्याचे  स्वातंत्र्य राहणार नाही.असलेल्या परीस्ठीपेक्षा पण वाईट परिस्थिती येण्याचे योग आहेत.ग्रहबल अनुकुल नसल्याने सगळीकडून प्रतिकुलतेचा सामना करावा लागेल.कर्ज घेण्याचे टाळा प्रतिकुल परिस्थिती असली तरी कुणाचेही उपकार घेऊ नका.

कोर्ट कचेरी : काम राखाद्लेलीच राहतील त्याने मानसिक रित्या त्रस्त व्हायला होईल.कोर्टा बाहेरील तडजोडीसाठी प्रयत्न करावेत.सध्या कुठलाही व्यवहार न करता सर्व व्यवहार काही काळासाठी पुढे ढकलावेत.

नाते संबंध : नात्यांबाबतीत सयमं आणि सबुरीने प्रकरण हाताळावे लागणार आहे.ग्रहस्थिती प्रमाणे कौटुंबिक पातळीवर सर्व काही तुमच्या विरोधात उभे राहतील.मानसिक शांतात लाभणार नाही आणि ताण तणावात भर पडेल.एकःडी अप्रिय घटना घडू शकते आहे.जोडीदाराकडून सुद्धा कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवून चालणार नाही.

विद्यार्थी : अभ्यासात लक्ष देणे आत्यंतिक गरजेचे राहणार असल्याने परीक्षेसाठी सातत्याने अथक अशी योग्य ती तयारी करावी लागणार आहे.मन एकाग्र करावे लागणार आहे.तब्येतीला जपावे लागेल पालकांनी पाल्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे.

 

मकर

ग्रहांची स्थिती : उत्तरार्धात रवी तृतीय स्थानी तर केतु व बुध धनस्थानी वक्री राहतील.२१ मार्चला शुक्र धनस्थानी येईल तर २२ मार्चला मंगळ पंचमात भ्रमण करेल.२३ मार्चला राहु षष्ठस्थानात तर केतु व्येय स्थानात सोबत राहील.२१  मार्चला गुरु व्येयस्थानी येईल.हा महीना दक्षता बाळगण्यास सांगणारा आहे.परिश्रम घ्यावेच लागतील कामांमध्ये अडथळे जाणवतील.

आरोग्य : या महिन्यात उत्तम ग्रहमान असल्याने तब्येतीची काळजी करायचे काही कारण नाही.ग्रहांचे फेरबदल तुमच्या राशील अनुरूप असे असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत अगदी उत्तम समृद्ध असा महिना आहे.एखादे संसर्ग जन्य रोगाचा प्रादुर्भाव संभवतो आहे.परंतु विशेष काळजी चे कारण नाही.

आर्थिक : आर्थिक आघाडी या महीयत ‘ना काम ना ज्यादा’ अशी राहणार असुन महिन्यात उत्पन्न कमी आणि एकंदरीत खर्च व्वाढणार आहेत त्यामुळे खर्च करताना अनावश्यक बाबी टाळाव्यात.बचतीवर लक्ष केंद्रित करावे.कर्ज मंजुरीसाठी अजुन काही काळ वाट पहावी लागेल असे चित्र आहे.एकंदरीत जे खी व्यवहार होतील ते व्यवहार हिशोबी पणाने करावेत जेणेकरून काही अंगलट येणार नाही.

नौकरी : महिन्याची सुरवात उत्तम आहे. कामात उत्साह वाढेल केलेल्या काम्मुळे महिन्याच्या मध्य्पर्यंत कामात स्थेर्य स्थापन केले तर पुढील काळासाठी अगदी उत्तम राहील.आगामी कळत आपले कर्म करण्याला प्राधान्य देऊन कार्यरत राहणे आत्यंतिक गरजेचे आहे.कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवून चालणार नाही संयम आणि सबुरी ची अत्यंत आवशक्यता लाभणार आहे.

व्यवसाय : साडेसातीची प्रखर झळ या कळत बसणार आहे.कुठलाही निर्णय घेताना अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागणार असुन बचती साठी योग्य ती तजवीज या महिन्यात कौन ठेवावी लागेल आगामी कळत हि एकंदर परिस्थिती काही अनुकुल नसुन मिळेल ते काम वेळेत पुर्व करून कामाची गती वाढवावी .

कोर्ट कचेरी : काहीसा दिलासादायक महिना आहे या पूर्वी सदर केलेले सर्व पुरावे अनुकुल तेकडे झुकुन निर्णय देतील.एकाहाडे दीर्घ कालीन प्रकरण लवकरात लवकर काही तरी मार्ग सापडेल.परंतु महिन्याच्या मध्यानंतर पुढील कामे रखडतील.

नाते संबंध : पत्रीवारिक सुख तुम्हाला पुरेपुर लाभणार असुन सगळे काही आपल्या मनासारखे होईल कोणीही आपला शब्द अव्हेरणार नाही.मुलांकडून एखादी सुखद वार्ता मिळु शकते.घरात शुभ कार्ये घडतील आणि कौटुंबिक समारंभात जाण्याचे योग आहेत.पुढील काळासाठी सगळेकाही संयमाने हाताळावे लागेल.जोडीदारा कडून वेवाहिक सौख्यात कुठलीच कमतरता राहणार नाही आणि तुम्ही हि कुठलीच कमतरता ठेवु नये आनंदाचा आणि सौख्याचा काळ असणार आहे तुमच्यासाठी.

विद्यार्थी : आपल्या अथक परिश्रमा मुळे या महिन्यात सगळ्यात अव्वल राहता येईल.परिक्षेत चांगले गुण मिळवता येतील.पुढील शिक्षणासाठी हव्या त्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळुन जाईल.

 

कुंभ

ग्रहांची स्थिती : महिन्याच्या मध्याला रवी द्वितीय स्थानी येत आहे.बुध राशीत वक्री होईल .२१ मार्च ला शुक्र राशीत येईल,२२ मार्चला मंगळ चतुर्थात राहील .२३ मार्चला राहु केतु पंचमात व लाभात येतील.२१ मार्चला गुरु लाभत येईल.शनी संपूर्ण महिना लाभ स्थानी राहील.महीना संमिश्र संकेत देईल.कार्यमग्न व्हावे लागेल.कलह वाद टाळावेत.

आरोग्य : महिनाभर उत्तम ग्रहमान असल्या कारणाने तब्येतीच्या आघाडीवर किंचितही तक्रार नसलेला महीना असुन.सर्व ग्रहमान तुमच्या तब्येतीला योग्य प्रकारे साथ देऊन ठणठणीत आरोग्याची प्रचीती देतो आहे.त्यामुळे मानसिक स्वास्थ्यही उत्तम लाभणार आहे.घरातल्या मंडळींची प्रकृती पण उत्तम राहील.आरोग्य च्या बाबतीत समाधानी असा महिना राहणार आहे.

आर्थिक : आर्थिक बाजु या महिन्यात उत्तमात उत्तम असणार आहे.भार्भार्तीचे आणि समृद्धी चा उपभोग घेता येण्यासारखी ग्रहस्थिती आहे.उत्पन्नात वाढ होईल आणि केलेल्या गुंतवणुकीतुन आर्थिक ओघ वाढता राहणार आहे.स्थावर मालमत्ते मध्ये गुंतवणुक करता आली तर उत्तम गुंतवणुक पर्याय राहील.

नौकरी : प्रगती करण्यासाठी उत्तम काळ आहे, दीर्घ काळापासून वाट पाहत असलेल्या गोष्टी पूर्ण होतील.वरिष्ठा कडुन कौतुकाची थापही मिळेल आणि तुमच्या मेहनतीमुळे बढतीचे योग ही संभवत आहे अथवा पगारवाढ होऊ शकते आहे.कामाच्या ठिकाणी होणारे बदल स्वीकारून त्यावर काम करावे लागणार आहे.नवीन नौकरीच्या शोधात असणाऱ्यांना महीना अखेरीस नवीन नौकरी मिळण्याची संधी आहे.

व्यवसाय : जे कराल त्यात यश प्राप्ती अशी एकंदरीत महिन्याची ग्रहस्थिती सांगत आहे.तुमच्या योजनान उत्तम प्रतिसाद मिळेल.त्यामुळे प्रगती साठी योग्य ते मार्ग खुले होतील.तुमच्या कामामुळे तुमची प्रतिष्ठा स्पर्थाकामध्ये उंचावेल.गुंतवणुकदार सुद्धा मागे पुढे न पाहता तुमच्या व्यवसायात गुंतवणुक करतील.एखादे मोठे काम मिळेल आणि पूर्ण महीना हा कामाचा राहील.कामाचा सळसळता उत्साह अंगात राहील.

कोर्ट कचेरी : निकाल तुमच्या बाजूने लागल्याने या बाबतीत समाधानकारक स्थिती राहील.दीर्घ कालीन गोष्टीतुन सुटका झाल्यामुळे हायसे वाटेल एखादी अडकलेल्या प्रकरणातून मोठी रक्कम मिळु शकते आहे.

नाते संबंध : भरभरून कौटुंबिक सौख्य आणि आनंदाचा महिना राहणार असुन मानसिक पातळीवर कुटुंबाकडुन संपुर्ण सौख्य अनुभवयास मिळेल.सुसंवाद राहील सगळ्यांना वेळ दिल्यामुळे सगळे आनंदात राहतील.दुरावलेली सगळी नाती नव्याने जवळ येतील.महिन्याच्या मध्या नंतर जोडीदाराकडून पण सुख पुरेपुर मिळेल.विवाह इचुकांसाठी उत्तम काळ आहे.

विद्यार्थी : मनासारखा अभ्यास होईल परिक्षेत मिळालेल्या यशामुळे हव्या त्या संस्थेत प्रवेश मिळेल आणि प्रगतीमुळे घरातील वातावरण आनंदाचे आणि सकारात्मक असे राहील.पालकांनी पाल्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करावे.

 

मीन

ग्रहांची स्थिती : रवी हा ग्रह महिन्याच्या मध्या नंतर राशीत येत आहे.१५ मार्चला बुध व्येयात वक्री राहील २१ मार्चला शुक्र व्येयात जाईल,२२ मार्च ला मंगळ वृषभेत म्हणजे तृतीयात जाईल.२३ मार्चला राहु चतुर्थात तर केतु दशमात रविबरोबर राहील.महिना सौख्यदायी व अनुकुल व आनंददायी राहील

आरोग्य : गुरु,मंगळ आणि शुक्र उत्तम स्थिती असल्याने आरोग्याच्या बाबतीत समृद्धी आणि सुदृढता लाभत आहे.आरोग्य उत्तमहे त्यामुळे आगामी काळात हि सुदृढ राहायचे असेल तर व्यायाम आणि योगा अभ्यास करावयास लागेल.

आर्थिक : या आघाडीवर हा महीना उत्तम राहणार आहे.कर्ज घेतली असतील तर ती न्फेज्ञासाठी अनुकुल अशी आर्थिक परिस्थिती या महिन्यातील ग्रहामुळे लाभते आहे.इतर सर्व अनावश्यक खर्च टाळावेत आणि महत्त्वाच्या खर्चांना आणि देणीना महत्त्व दिल्यास उत्तम राहील.आणि दुसरे कर्ज मिळण्यास सुद्धा बँकेची मंजुरी मिळेल.एखादी गुंतवणुक म्हणुन मालमत्ता खरेदीचा विचार योग्य राहील.

नौकरी : प्रगती कारक असा महीना आहे.दिलेले काम वेळेत पूर्ण केल्यामुळे वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी राहील वरिष्ठ तुमच्या कामामुळे खुश असल्याने एखादे बढतीचे प्रकरण पुढे जाऊ शकते आहे.तुमच्यासाठी नवीन आव्हाने आणि जबाबदाऱ्या प्राप्त होतील.नौकरीच्या ठिकाणी छुप्या शत्रुचा कारवायांमुळे राजकारण होऊ शकते आहे.

व्यवसाय : व्यवसायिकासाठी उत्तम प्रगतीकारक नवीन कल्पक योजनांनी परिपुर्ण असा उत्तम महिना राहील.स्पर्धकांसोबत चुरसीची लढाई राहील तरी सुद्धा स्पर्धकांवर सहज मात करता येईल.गुंतवणुक दार स्वतःहुन तुमच्या व्यवसायात गुंतवणुक करण्यास पुढाकार घेतील. आणि महिन्या अखेरीस एखादे कर्ज सुद्धा मंजुर होऊन जाईल.

कोर्ट कचेरी : या महिन्यात समाधानकारक प्रगती असणार आहे.आपण सादर केलेले पुरावे ग्राह्य धरल्या जातील.दीर्घ कालीन प्रलंबित खटल्यातून सुटका झाल्यामुळे हायसे वाटेल.

नाते संबंध : या आघाडीवर सगळीकडे आनंदी आनंद असे वातावरण राहील.कुटुंबासोबत क्गेलीमेलीचे वातावरण राहील.कुटुंब सुख आणि सहवास लाभेल आनंददायी वातावरणामुळे एखादे शुभ कार्य घडेल आणि सर्व आप्तांच्या गाठी भेटीचे योग आहे.जोडीदाराकडून वेवाहिक सौख्याच्या बाबतीत कुठेही कमतरता जाणवणार नाही भर भरून सौख्याचा अनुभव देणारा महिना आहे.

विद्यार्थी : अभ्यास मनासारखा झाल्यामुळे परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल.मागील परीक्षेतील यशामुळे नवीन परीक्षेला सामोरे जातांना आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल.