!!!!! कोजागिरी पौर्णिमा : वर्षाव चंद्र किरणांचा,शिडकाव अमृताचा !!!!!

दरवर्षी शरद ऋतु मध्ये अश्विनशुद्ध पौर्णिमेला जे पर्व साजरा करण्यात येते ते पर्व म्हणजे,शरद पौर्णिमा अथवा कोजागिरी पौर्णिमा.या पर्वाचे  वैशिष्टय म्हणजे ऋतुमानाचा अधोरेखित केलेला बदल,त्याची संस्कृतीशी घातलेली सांगड आणि निरामय आरोग्याचा आणि सखल समृद्धीचा दिलेला वारसा.एवढे थोर नियोजन या एका पर्वा मागे अर्थात आपल्या पुर्वसुरींनी,ऋषीमुनींनी अतिप्राचीन कळापासुन योजुन ठेवलेले आहे आपल्या संस्कृतीचे हेच तर प्रमुख वैशिष्टय होय.

ऋतुमाना प्रमाणे शरद ऋतु संपुष्टात येणार असतो पावसाळा संपल्या मुळे वातावरण हर्ष उल्हासित असते दिवसभराच्या तापमानात झालेली वाढ आणि रात्रीच्या तापमानात झालेली घट,याचा मानवी शरीरावर झालेला बदल,त्यामुळे शरीरातील पित्त प्रवृत्ती जागृत करतो.पुढे येणाऱ्या हिवाळ्याची चाहुल आणि कृषी क्षेत्राशी निगडीत काही पिकांचा येणारा हंगाम,या पुर्वी घेतलेला एक अल्प उसासा म्हणजे शारदीय पौर्णिमा होय. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासुन सुरु झालेला शारदीय उत्सव नवमीला संपलेला असतो.दशमीला साजरा झालेला विजय पर्व काळ यामुळे थकलेले शरीर व मन  याला उभारी देण्यासाठी या पौर्णिमेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. खगोल शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून या पौर्णिमेचे वैशिष्टय म्हणजे चंद्र हा पृथ्वीच्या निकट आलेला असतो.त्याच्या मुळे चंद्र दर्शन अतिशय मोहक आणि आकर्षक असते.अशा या चंद्राच्या शुभ अस्तित्वातुन पाझरणारे चंद्र किरणे एक अलौकिक प्रकाश धरतीवर अल्हादपणे सोडतात,ही चंद्रप्रभा अर्थात कौमुदी, ह्या  चंद्र किराणामध्ये दिव्य असा अमृताचा अंश असतो, अशी मान्यता आहे.अर्थात वैज्ञानिक दृष्टीकोनातुन या घटनेकडे पहिले तर दिवसभराच्या वाढलेल्या तापमानातुन शरीरावर झालेले उष्णतेचे आघात, या शीतल किरणांमुळे पार नाहीसे होतात.तसेच या चंद्र किरणांमुळे मन आणि वृत्ती उल्हासित होते.ह्या किरणांमध्ये औषधी गुणधर्म आढळतो, त्यामुळे पित्त प्रवृत्तीचा समतोल राखण्यास शक्य होते.पुढील काळत येणाऱ्या हिवाळ्याची सुचना हा चंद्र देतो.

चंद्र आपल्या संपुर्ण १६ कलांनी प्रतिभावान होऊन आपल्या अमृत किरणांनी संपुर्ण पृथ्वीवर प्रकाशाची अलौकिक पाखरण करतो .प्राचीन मान्यते नुसार या दिवशी महालक्ष्मीचा जन्म झाला होता,त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पुजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यामुळे रात्रभर जागरण करून श्रीलक्ष्मी ची उपासना केल्यास धन धान्य समृद्धी ची विपुल प्राप्ती होते.”कोण जागे आहे? कोजागरती “असा अपभ्रंश होऊन कोजागिरी असा शब्द निर्माण झाला.या पर्वाचे अनोखे वैशिष्टय म्हणजे दुग्धप्राशान होय.दुध हे चंद्राचे प्रतिक असुन दुधामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे त्यात चंद्र बिंब पाहिल्यास त्यामुळे वाढलेले पित्त आटोक्यात येते.तसेच ज्यांना श्वसनाचे विकार अथवा कफजाण्य विकार आहेत त्यांना लाभ होतो काही जण उपवास करून या दुधाने उपवास सोडतात.काही जण हा नेवेद्य श्री विष्णुना ,श्री महालक्ष्मीला,श्री कृष्णाला समर्पित करतात.

१२ पौर्णिमा पेकी हि पौर्णिमा सर्व श्रेष्ठ मानली आहे ज्यांच्या पत्रिकेत चंद्रबळ कमी आहे त्यांनी जागर केल्यास त्यांना उत्तम फळ मिळते,श्री महालक्ष्मी स्त्रोत,अर्गला स्त्रोत ,विष्णुसहस्त्रनाम ,श्रीसुक्त ,ललितासहस्त्रनाम आदी पठन केल्यास इच्छित मनोकामना पूर्ण होतात.अशा हा चंद्र किरणाचा पर्व आपल्या जीवनात सखल सुख,शांती,समृद्धी आणि निरामय आरोग्य घेऊन यावा या सदिच्छांसह श्री महालक्ष्मी आपणावर सदैव प्रसन्न राहावी ही प्रार्थना.

!!!!! शुभम भवतु !!!!!