राशी भविष्य

मेष

ग्रहांची स्थिती  : राशीत येणारा मंगळ आणि हर्षल,द्वितीय स्थानात राहु,अष्टमात गुरु,नवम स्थानातील शुक्र, नवम स्थानातील शनी आणि अष्टमातील गुरु काही कटु अनुभव देतील,रवी व केतु या महिन्यात दहाव्या व लाभ स्थानातुन भ्रमण करणार आहे त्यामुळे त्याची उत्तम साथ लाभणार आहे.या महिन्यात राहु केतु ची प्रतिकुलता निवळणार असल्याने अनुकुलतेत भर पडणार आहे.या महिन्यात समोर आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे लागेल.मेष राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी महिना हा आव्हानात्मक आणि समस्या युक्त राहील.

आरोग्य : आरोग्य बाबतीत हा महिना त्रासदायक आणि काळजी करावयास करायला सांगणारा आहे.राशीतला मंगळ आणि अष्टमातील गुरु यांची स्थिती पाहता आरोग्या बाबतीत दुर्लक्ष करून चालणार नाही.मानसिक आणि शारिरीक पातळीवर दोन्ही बाबींनी स्वास्थ्याकडे पुर्ण लक्ष द्याव लागेल.पित्त असणाऱ्यानी जपावे डोकेदुखीचा त्रास संभवतो आहे.जुनाट व्याधी असणाऱ्यानी तब्येतीला जपावे.वडिलधाऱ्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.दुखणे अंगावर काढु नये.

आर्थिक : आर्थिक पातळीवर महिना खडतर राहील.अनपेक्षित खर्च वाढतील.पेशांची जुळवा जुळव करताना तारांबळ उडेल.अडकून पडलेले पैसे वेळेवर मिळणार नाही खर्चाचा आलेख वाढता राहील.खर्च करण्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे या महिन्यात बचत होणार नाही.उत्पन्न कमी आणि जावक जास्त राहील.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत कामाचे  दडपण राहील,वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल,अविरत काम करूनही वरिष्ठांची मर्जी संपादन करता येणार नाही.सहकाऱ्यांच्या अनैतिक प्रलोभनांना कडे दुर्लक्ष करावे कारण भ्रष्टाचार वगैरे सारखे प्रकार घडु शकतात.हाताखालील लोकांचा त्रास होऊ शकतो.कामावर निष्ठा ठेवावी.

व्यवसायाच्या बाबतीत लग्नी येणारा मंगळ तणाव दायक ठरेल.स्पर्धेमध्ये टिकुन राहण्यासाठी खुप मेहनत घेऊन ही टिकाव धरता येणार नाही.हाताशी आलेली एखादी नामी संधी सोडावी लागेल.भागीदारा सोबत वाद होण्याची शक्यता आहे.खर्च भागवताना तारंबळ उडेल.

कोर्ट कचेरी : या महिन्यात या बाबतीत काहीच मनाजोगते घडणार नाही.इच्छा नसतानाही कोर्टाची पायरी चढावी लागल्यामुळे काही अनुकुल परिणाम दिसुन येणार नाहीत त्यामुळे सध्या तरी काम लांबणीवर टाकावे.स्थावर मालमत्तेचे वाद अजुन चिघळतील.वकील मंडळींना हाताळताना काळजी घ्यावी.

नातेसंबंध : राशीत मंगळ व हर्षल असल्याने कुटुंबात कटु गोड अनुभव प्रत्ययास येतील.योग्य वेळ आणि योग संवादांच्या सहवासाने नाती दृढ करता येतील.जोडीदाराच्या बाबतीत शुक्राची साथ असल्यामुळे सहवासाचे सौख्य लाभेल,जोडीदारा बरोबर सुद्धा वेळ घालवावा येईल योग्य सुसंवाद साधावा अन्यथा तात्पुरता किंवा कायमचा दुरावा येऊ शकतो.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांसाठी हा महीना भरपुर श्रमाचा आहे.पुढील महिन्यात येणाऱ्या परिक्षेचा कसुन अभ्यास करावा लागेल.अभ्यासात निरुत्साह जाणवला तरी प्रयत्नांशिवाय यश नाही हे ओळखावे.एकाग्रातेकडे लक्ष पालकांनी पाल्यांनकडे योग्य ते लक्ष द्यावे आणि घरातील वातावरण आनंदी ठेवावे.

वृषभ

ग्रहांची स्थिती : तृतीयात राहु यशदायक आहे,सप्तमात गुरु या महिन्यात चांगला प्रत्यय देणार असुन,अष्टमात शनी प्रतिकुल असुन सुद्धा शुक्रची साथ मिळेल आणि नवमातील केतु,दशमातील बुध ,रवी चे नवम आणि दशम स्थानातील भ्रमण असल्यामुळे महिन्याच्या उत्तरार्धात त्याची साथ मिळेल ,बाराव्या स्थानातील मंगळ आणि हर्षल ताणतणाव आणि खर्च वाढवणारा राहील.एकंदरीत महिना प्रगतीकारक आणि यशदायी राहील.प्रगतीचे नवीन आव्हान समोर येतील.

आरोग्य : तृतीयातला राहु ,सप्तमातला गुरु आणि अष्टमातला शुक्र यांचे पाठबळ असल्यामुळे आरोग्य बाबतीत हा महिना उत्तम राहणार आहे.कुटुंबातील मंडळीच्या आरोग्यास जपावे.तब्येत उत्तम असल्याने उर्जा आणि उत्साह ओसंडुन राहील सकारत्मकत दृष्टीकोण जागृत होईल.व्यायामात खंड पडु देऊ नये,योग्य आहार-विहार आणि योगा करून प्रकृतीला जपावे.

आर्थिक : महिन्याचा पुर्वार्ध आर्थिक बाबतीत अनुकुल ठरेल.रखडलेल्या योजना मधुन पैसा मिळेल,कर्ज वैगरे सुविधांसाठी अर्ज केल्यास मंजुर होण्याची हि वेळ आहे.महिन्याच्या उत्तरार्धात अष्टमातील शनी आणि व्येयातला मंगळ यांच्यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता जास्त आहे.जमीन जुमल्यात केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरेल.कर्ज सुद्धा लवकरात लवकर फेडता येतील.एकंदरीत आर्थिक उंचवता राहणार आहे.महिन्याच्या शेवटचा काळ तसा अनुकुल राहणार नाही.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत हा महिना उत्तम यशाने परिपुर्ण राहील,मेहनतीचे चीज होईल,वरिष्ठांचे सहकार्य ही लाभेल आणि कौतुक केल्या जाईल.यशस्वी रित्या केलेल्या कामाची दखल घेतल्या जाईल.आपल्या कामामुळे बढतीचे योग आहेत.नौकरीच्या शोधात असणाऱ्यांना सुद्धा या महिन्यात नौकरी मिळेल.नियोजन बद्ध वाटचाल करावी.

व्यवसाया बाबतीत भरभराटीचा काळ आहे.महिन्याच्या मध्यापर्यंत उत्तम कामगिरी आणि योजना राबवता येतील ,दीर्घ काळ चालणारी कामे मिळतील त्यामुळे आगामी काही काळ पेशाचा निरंतर ओघ सुरु राहील.व्यवसायासाठी कर्ज मंजुर होईल.भागिदारीच्या व्यवसायात सुद्धा भरभराट होईल.नवीन करार मदार होतील.

कोर्ट कचेरी : या बाबतीत वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना अनुकुल तुमच्या बाजूने निकाल देणारा असा राहील.कुठल्याही कौटुंबिक प्रकरणासाठी कोर्टाची पायरी चढू नये सामोपचाराने कोर्टाच्या बाहेर प्रश्न सोडवावी.स्थावर मालमत्तेसंबंधी बाबतीत वाद सुटतील.कायदेशीर कचाट्यातून या महिन्यात सुटका होईल.

नातेसंबंध: कौटुंबिक पातळीवर वातावरण उत्तम राहील,घरात सौख्य,आनंद आणि शांतात नांदेल.वडीलधारी मंडळी पण खुश राहतील,मुल सुद्धा तुमच्या शब्दापुढे जाणार नाही.पाल्यांकडून सुखद वार्ता मिळतील.गुरु शुक्राचे समीकरण जोडीदाराबरोबर वैवाहिक सौख्याचा आनंद देणारा आहे.एकंदरित महीना उत्तम असणार आहे.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांसाठी हा महीना अनुकुल असुन त्यांनी घेतलेल्या मेहनतीला यश मिळेल परीक्षेची तयारी उत्तम झाली असल्याने आत्मविश्वास वाढेल.भरपुर अभ्यास आणि सोबत पालकांकडून पाठबळ या आनंदाने द्विगुणीत होऊन घवघवीत यश मिळेल.पालक हि पाल्यांची प्रगती पाहुन आनंदी होतील.

मिथुन

ग्रहांची स्थिती : चतुर्थात राहु आणि षष्टातला  गुरु या कळत तरी सहाय्यकारक नसुन सप्तमातील शनी-शुक्र युती ही काही अनुकुल नाही,अष्टमात केतु सुद्धा प्रतिकुलच असणार आहे,रवी अष्टमातुन नवम स्थानात  भ्रमण करणार आहे त्यामुळे महिनाभर प्रतिकुल असणार आहे. नवम स्थानातील बुध ,लाभ स्थानातील  मंगळ लाभदायक ठरणार आहे.एकंदरीत बऱ्याच ग्रहांची प्रतीकुलता लक्षात घेता या महिन्यात अधिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे तर धैर्याने या परिस्थितीला सामोरे जावे लागेल.अंगी हत्तींच बळ संचाराव लागेल.

आरोग्य : आरोग्याच्या बाबतीत आलेख चढता-उतरता राहील,काही वाढलेल्या दुखणी कमी होतील.मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यानी आपल्या आरोग्या बाबतीत दुर्लक्ष करून चालणार नाही वेळेवर तपासणी करणे गरजेचे राहील.व्यायाम आणि योगा कडे काळ वाढवावा जेणेकरून नैसर्गिकरित्या रोग बरे होण्यास मदत होईल.मानसिक बाळासाठी ध्यान आणि प्राणायाम यांची मदत होईल.

आर्थिक : आर्थिक बाबतीत हा महिना खडतर आणि परीक्षा पाहणारा असा हा महिना आहे.या महिन्यात खर्च मोठ्या प्रमाणावर होईल.कुठल्या बाबतीत खर्च करावा या बाबत संभ्रम अशी मानसिक स्थिती होऊ शकते आहे.कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर पुढील काही काळासाठी पुढे ढकलावा.कुठलीही मोठी जोखिम घेण्याचे टाळा.आपण कोणतीही चांगली गोष्ट करायला जल तर त्याचे विपरित परिणामच या महिन्यात पहावयास मिळणार आहेत.अनुभवी व्यक्तीचा सल्ला आणि विचार विमर्श करूनच पुढची पाऊले टाका.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत कार्यालयात काही छुप्या राजकारणाचा किवा तुमच्या विरोधकांच्या कारवायांचा त्रास होईल,त्यामुळे सगळ्यांशी समतोल राखुन काम करावे लागेल.कामाचा वाढता ताण नौकरी वर टांगती तलवार राहणार आहे.नवीन नौकरीच्या शोधात असाल तर अथक प्रयत्न करावे लागतील.

व्यवसायाच्या बाबतीत काही प्रमाणात परिस्थिती सुधारेल.काम मिळतील आणि लवकर संपतीलाही.महिन्याच्या मध्यानंतर  देणीदार मागे लागतील.कामच्या बाबतीत काही गोष्टींना संथ पणा येईल.एखाद्या कायदेशीर बाबी मध्ये फसवणुक होऊ शकते त्यामुळे व्यवहार करताना सावधगिरीने करावा.

कोर्ट कचेरी : या बाबतीत काहीही अनुकुल घडण्याची शक्यता या महिन्यात नाहीये.या महिन्यात प्रतिकुल निकाल लागण्याची शक्यता आहे.आपल्या बाजुने निकाल न लागल्यामुळे खुप मोठी आर्थिक हानी होऊ शकते.वकील मंडळी सोबत वाद घालु नये.

नातेसंबंध : या बाबतीत परीक्षा पाहणारा असा काळ आहे.कुटुंबातील काही समस्यांमध्ये भर पडणार आहे त्यामुळे मानसिक ताण वाढवणारा हा महिना असला तरी या सगळ्या परिस्थितीला धैर्याने सामोरे गेलात तर यावर मात करता येईल.त्यासाठी मंगळ तुम्हाला अनुकुल ठरणारा आहे.जोडीदाराबाबतीत वेळ घालवून संवाद साधुन समस्या सोडवाव्या लागतील.

विद्यार्थी : गेल्या काही काळापासून सुरु असलेली अभ्यासातील घसरण किंचीतशी सुधारू शकते.परीक्षा पाहणारा हा महिना राहील.पालकांनी पाल्यांना मानसिक पाठबळ देऊन आत्मविश्वास पुरवावा.मित्र मंडळींकडुन अभ्यासात मदत होईल.तरीसुद्धा भरपुर मेहनत घ्यावी लागेल.

कर्क

ग्रहांची स्थिती : लग्नी राहु बदलाची चाहुल लागेल,पंचमातला गुरु शुभ फळ देणारा राहणारा आहे,षष्टातील शुक्र काही अनुकुल नाही परंतु शनी अनुकुल आहे ,सप्तमात केतु ,रवी सप्तमातुन अष्टमात भ्रमण करणार असुन महिनाभर तो प्रतिकुलच राहणार आहे ,दशमात मंगळ कामाचा ताण वाढवणारा असणार आहे.एकंदरीत ग्रहमान उत्तम आणि अनुकुल असणार आहे.परंतु यशदायक असा महिना राहणार आहे.

आरोग्य : या महिन्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरते आहे कारण काही प्रमुख ग्रह प्रतिकुल असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.कामावरील ताणामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.पुर्शी विश्रांती घेणे गरजेचे राहील.कुटुंबियाचे पाठबळ मिळेल त्यामुळे लवकर बरे व्हाल.

आर्थिक : आर्थिक आलेख उंचावणारा असा महिना राहील.कर्ज घेतले असल्यास लवकरात लवकर फेडुन हातावेगळ करण्यात यश मिळेल.आणि या सोबतच बचत पण होईल पण आपल्या काही खर्चांना आळा घालावा लागेल.स्थावर मालमत्तामध्ये गुंतवणुक करणार असाल महिन्याच्या अखेरीस योग्य काळ राहील.

नौकरी व्यवसाय : नौकरीच्या बाबतीत प्रगतीकारक महिना राहणार आहे.ऑफिस च्या राजकारणाचा त्रास नसल्याने तणाव रहित काम करता येईल.तुम्हाला अनुकुल असे बदल होतील.नौकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नौकरी मिळण्याचे संकेत आहेत.दिलेली जबाबदारी तुम्ही योग्य रीतीने पार पाडावी.

व्यवसाया बाबतीत यशदायक असा काळ आहे.व्यवसाय वाढीसाठी उत्तम काळ आहे.नवीन कल्पनांचा विचार करत असाल तर नवीन योजना यथोचितपणे पार पडतील.चालु व्यवसायात यश मिळवुन देणारा महिना राहील.पेशांची रेलचेल राहील.

कोर्ट कचेरी : या बाबतीत सावधगिरीने पाऊले टाकावीत वकिल मंडळींच्या शाब्दिक चकमकीमुळे संभ्रम अवस्था निर्माण होऊ शकते.त्यामुळे वकिलांशी वाद टाळा.या बाबतीत मनासारखे कामकाज होणार नाही.एकंदरीत तणाव पुर्ण असा महिना राहील.

नातेसंबंध : या महिना सौख्यकारक राहणार आहे.घरातील वातावरण खेळीमेळीचे आणि सकारात्मकता राहणार आहे.सगळ्यांसोबत सुसंवाद राहणार आहे त्यामुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार आहे परंतु जोडीदारासोबत जरासे जुळवुन घ्यावे लागेल.पण गुरुचे पाठबळ असल्याने एकंदरीत उत्तम असा महिना आहे.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे चीज होईल ,परिक्षेत उत्तम गुण मिळतील,परीक्षेतल्या प्रगतीमुळे पालकांकडुन पाल्यांना पाठबळ मिळेल.पालकांनी पाल्यांच्या तब्येतीकडेही लक्ष द्याव.

सिंह

ग्रहांची स्थिती : चतुर्थात गुरु काही आघाड्यांवर प्रगतीकारक राहणार आहे.पंचमातील शुक्र आणि षष्टातला केतु हे अनुकुल राहतील.पण पंचमातला शनी काहीसा अप्रिय असणार आहे. रविचे षष्टातुन सप्तमातील भ्रमण महिन्याच्या मध्या पर्यंत अनुकुल राहील,सप्तमातला बुध नात्यांबाबतीत काहीसा कटु अनुभव देणारा आहे.नवमातील मंगळ चांगली आणि बाराव्या स्थानातील राहु लाभदायक आहेत एकंदरीत महिना खडतर परीश्रामानंतर यश अशी स्थिती दाखवत आहे.

आरोग्य : या बाबतीत महिना संमिश्र फलदायी असणार आहे.मंगळ काही प्रमाणात अनुकुल आहे.मात्र प्रमुख ग्रह प्रतिकुल असल्याने तब्येतीची काळजी घ्यावी लागेल मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यानी तब्येतीकडे विशेष लक्ष पुरवावे.मानसिक ताण वाढवणारा हा महिना राहील.

आर्थिक : मागील महिन्यातील वाढलेले खर्च याचा या महिन्यात नक्कीच ताण पडेल,खर्चाचा परिणाम या महिन्यातील बचतीवर होईल.कर्ज प्राप्तीसाठी महिन्याच्या मध्या नंतरचा काळ उत्तम असणार असुन त्यासाठी नंतर प्रयत्न करावा.आर्थिक बाबतीत या महिन्याचा आलेख काहीसा चढता आणि काहीसा उतरता असा असणार आहे.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत या महिन्यात शुक्र आणि मंगळाचे चांगले पाठबळ लाभणार आहे.कामाचा ताण या महिन्यात जरासा कमी होणार असुन सगळीकडे यथोचीत पण लक्ष देता येईल.आपल्या मेहनतीचे या महिन्यात फळ मिळणार आहे आपल्या कामावर वरिष्ठ हि खुश होऊन शाबासकी सुद्धा देतील.नवीन नौकरी च्या शोधात असाल तर या महिन्यात नवीन नौकरीचा योग संभवतो आहे.

व्यवसायाबाबतीत हा महिना लाभदायक राहणार आहे.दीर्घकाळ चालणारी काम मिळतील.त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल.अनेक मार्गांनी आर्थिक लाभ होईल.व्येकातिक व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा या महिन्यात चांगले ग्रहमान आहे.शत्रुवर्गाचा त्रास नसल्यामुळे प्रगतीसाठी उत्तम काळ आहे.

कोर्ट कचेरी : कौटुंबिक खटले तरी या महिन्यात तुमचा पिच्छा सोडणार नाही.घटस्फोटाच्या  प्रकरणा बाबतीत वाद संभवतात.शक्यतो काही प्रकरण कोर्टा बाहेर सोडवण्याचा प्रयत्न करा.स्थावर मालमत्ते संबंधी वाद महिन्याच्या मध्यानंतर मार्गी लागतील.

नातेसंबंध : शनी आणि बुधाची प्रतिकुलता असल्याने नात्यांबाबतीत हि प्रतिकुल ठरणार आहे.जणु सगळे जग आपल्या विरोधात आहे असे वाटायला लागेल.तुमच्या मत विचारात घेतल जाणार नाही.जोडीदारा सोबत वेळ घालवावा लागेल तरी सुद्धा संयम बाळगणे हे तुमच्यासाठी उत्तम असणार आहे.

विद्यार्थी : हा महिना काहिसा प्रतिकुलच राहील,अभ्यासात लक्ष लागणार नाही कारण अभ्यासाची चिंता राहील पण ताण-तणाव बाजुला सारून फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे जेणेकरून इतर विचारांची मनात गर्दी होणार नाही.

कन्या

ग्रहांची स्थिती : तृतीयेतला गुरु आणि शनी हे काहीसे प्रतिकुल असणार आहे ,चतुर्थात शुक्र पाठबळ पुरवणारा राहील,रवीचे पंचमातुन षष्टात भ्रमण होत असल्यामुळे महिन्याच्या मध्यानंतर अनुकुल असणार आहे.षष्टातील बुधही काहीसा सकारात्मक असणार आहे. अष्टमातला मंगळ मानसिक आणि शारिरीक आरोग्याच्या तक्रारी वाढवणारा राहील लाभातला राहु हा महिना एकंदरीत कसोटीचा असणार आहे ह्या खडतर काळात आत्मिक आणि अध्यात्मिक बळ ऐकवटावे लागेल.

आरोग्य : आरोग्य बाबतीत या महिन्यात विशेष काळजी घेण्याची गरज आहे.ग्रहमान अनुकुल नसल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी संभवतात आणि अष्टमातला मंगळ त्यात भर घालातो आहे.घरातील मंडळींच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल.मागील काही दिसांच्या दुखण्याला एवढ्या लवकर आराम पडेल अस वाटत नाही.

आर्थिक : आर्थिक बाबीत चित्र चिंता करायला लावणारे असणार आहे.वैद्यकीय उपचारात  किंवा एखाद्या आकस्मित खर्चामुळे आर्थिक खर्चात वाढ होऊ शकते.नियमित खर्च भागवताना सुद्धा तारांबळ उडेल.कुणाकडून ही आर्थिक अपेक्षा ठेवता येणार नाही.जो काही निर्णय घ्याल त्याच्या विपरितच परिस्थिती तुम्हाला या महिन्यात जाणवेल.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत हा महिना डोक्यावर टांगती तलवार ठेवणारा राहील.नौकरी असणाऱ्यांनी ती टिकवुन ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांचे एकवे लागेल त्यांच्या सोबत जुळवुन घ्यावे लागेल.आपल्या कामाशी काम ठेवावे कारण या महिन्यात बढतीचे आणि पगारवाढीची अपेक्षा न केलेली बरी.अविरत काम करावे लागेल.

व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा हा महीना प्रतिकुलच राहील.एकंदरीत ग्रहांची प्रतिकुलता जिने अवघड करून टाकणारी आहे.वैयक्तिक ग्रहबल असणाऱ्यांना थोडाफार दिलासा मिळु शकतो.कायदेशीर पेचप्रसंग उभा राहु शकतो.कर्ज फेडीसाठी बँका आणि देणीदार मागे लागु शकतात.त्यामुळे मानसिक ताण राहील,शक्यतो असलेल्या परिस्थितीवर लक्ष देऊन हाताळावे कुठल्याही नवीन योजनेच्या मागे लागु नये.

कोर्ट कचेरी : या बाबतीत याही महिन्यात तुमच्या बाजुने काही अनुकुलता दिसत नाहीये,खटले तुमच्या बाजुने काही सरकण्याची चिन्हे या महिन्यात दिसत नाहीये,यामुळे काही आर्थिक हानी होण्याचे संकेत मिळत आहे.आणि अजुन एखाद्या कायदेशीर बाबीत फसण्याचे चिन्ह आहेत.त्यामुळे जपुन व्यवहार करा.

नातेसंबंध : मानसिकता ठीक नसल्यामुळे नात्यांमध्ये कटुतेचा अनुभव येऊ शकतो.अष्टमातील मंगळ वाईट गोष्टींची मालिका या महिन्यात सुरु ठेवील.मनाविरुद्ध घटना आणि अप्रिय वार्ता ऐकायला मिळेल.जोडीदारासोबत सुद्धा खटके उडण्याची चिन्ह आहे त्यामुळे ह्या महिन्यात शांततेने सगळ्या परिस्थीचा सामना करा.

विद्यार्थी :या महिना अतिशय खडतर आणि परीक्षा पाहणारा असुन अभ्यासाचा ताण राहील.घरातील वातावरण अभ्यासासाठी पोषक असणार नाही.तरीसुद्धा आपला अभ्यास सातत्याने चालु ठेवावा लागणार आहे कारण आगामी परिक्षेत जर यश मिळवायचे असेल तर असलेल्या सर्व संकटाना सामोरे जाऊन अभ्यासाची जय्यत तयारी करावी.

तुळ

ग्रहांची स्थिती : द्वितीयेतला गुरु तुमच्यासाठी सर्वांगानी परिपुर्ण आणि हवे ते देणारा आहे . तृतीयेत शनी-शुक्र युती शुभ फळ देती आहे,चतुर्थात केतु तुमच्यासाठी अनुकुल आहे ,रविचे चतुर्थातुन पंचमात भ्रमण काही विशेष लाभ देणार नाहीये,पंचमात बुध आणि सप्तमात मंगळ तुमच्यासाठी प्रतिकुल असे आहेत,दशमातला राहु काही अंशी अनुकुलच आहे.

आरोग्य : आरोग्य उत्तम,ठणठणीत आणि सुदृढ राहील.लहान सहान कुरबुरी राहतील पण फार काळ टिकणार नाही.घरातील सगळ्यांची प्रकृती उत्तम राहील.सकारात्मक वातावरण राहील ही सकारात्मक उर्जा आणि सुदृढ वातावरण टिकवुन ठेवण्यासाठी ध्यान धारणा आणि अध्यात्मिक बळ नक्कीच उपयोगी ठरेल.

आर्थिक : या बाबतीत मनासारखे कामकाज होणार आहे,बचत उत्तमरीत्या करता येणार असुन कोणतेही मनाविरुद्ध आणि वायफळ खर्च ह्या महिन्यात होणार नाही.इतर खर्च कमी झाल्यामुळे अपोआप बचतीचा आकडा वाढेल.कर्ज पण लवकरात लवकर फेडुन टाकुन मोकळ होता येईल,गृह कर्जासाठी अर्ज केला असाल तर तो पण या महिन्यात मंजुर होईल.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत या महिन्यात मागील काही महिन्यापासुन चालु असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.या महिन्यात शनी आणि गुरुचे पाठबळ मिळेल त्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रगतीचा वेग वाढेल.वारीष्ठाकडून कौतुक ही होईल आणि बढतीचे सुद्धा काही योग आहेत.घेतेल्या मेहनतीचे चीज या महिन्यात होणार आहे.

व्यवसाया बाबतीत समृद्धीचा असा काळ आहे.हा महिना धनाने समृद्ध करणारा असा महीना राहील.व्यवसायिकासोबत असलेल्या स्पर्धेत चुरशी होईल आणि त्याच प्रमाणे व्यवसाय विस्तार करता येईल.उत्तरार्धात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.स्थावर जमीन जुमल्यात गुंतवणुक करत असाल तर त्यांच्यासाठी ही लाभदायक काळ आहे.

कोर्ट कचेरी : या बाबतीत हा महिना उत्साह देऊन जाईल.कौटुंबिक बाबींबाबतीत यश तुमच्या पारड्यात पडणार असुन जी कुठली रेंगाळणारी काम असतील ती या आगामी कळत मार्गी लागतील.स्थावर मालमत्तेसंबंधी निकाल तुमच्या बाजूने लागतील.एकंदरीत मानसिक शांतता मिळवुन देणारा महिना राहील.

नातेसंबंध : कुटुंबातील वातावरण उत्तम आणि सकारात्मक राहील.कुटुंबातील मंडळींसोबत सुसंवाद आणि खेळीमेळीचे वातावरण राहील.मुलांकडुन आनंदाची वार्ता मिळेल..जोडीदारा कडुन वैवाहिक सौख्य पुरेपुर मिळेल. एकंदरीत मानसिकरीत्या आनंददायी वातावरण असणार आहे.

विद्यार्थी : या बाबतीत हा महीना प्रगतीकारक राहील.परिक्षेत आपल्या अभ्यासामुळे व कष्टामुळे मनासारखे यश नक्कीच मिळवता येईल,पालकांनी पाल्यांना मानसिक पाठबळ पुरवावे.पाल्यांच्या पाठबळामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळवता येईल.

वृश्चिक

ग्रहांची स्थिती : राशीतला गुरु आणि द्वितीयेतला शनी अप्रिय अनुभव देणारा राहील तरी द्वितीयेतला शुक्र आणि तृतीयेतला केतु काही चांगली फळे देतील.रविचे तृतीयेतुन चतुर्थात भ्रमण राहील त्यामुळे मध्यापर्यंत रविचे भ्रमण अनुकुल राहील आणि चतुर्थातला बुध अनुकुल राहील,षष्टातला मंगळ सुद्धा काही आघाड्यांवर बाजुने सांभाळुन घेत आहे.नवमातील राहु असलेल्या समस्यांना अजुन वाढवणारा राहील.काही ग्रहांची प्रतिकुलता असली तरी काही बाबतीत मंगळ,बुध,रवी तुम्हाला योग्य प्रकारे साथ देतील.

आरोग्य : मागील महिन्यापेक्षा हा महिना आरोग्याच्या बाबतीत महिन्याच्या मध्यानंतर उत्तम असणार आहे.मंगळ आणि शुक्र आरोग्याच्या बाबतीत बाजु संभाळुन घेणारे आहेत.व्यायाम आणि योगा सातत्याने चालु ठेवल्यास प्रकृती उत्तमच राहील.आहारात हि काही बदल करता येतील.कुटुंबातील मंडळींकडे आणि विशेष करून जोडीदाराच्या तब्येतीकडे विशेष लक्ष पुरवावे लागेल.

आर्थिक :मागील महिन्यापेक्षा या महिन्यात आर्थिक बाबतीत एकंदरीतच परिस्थिती उत्तम राहील.उत्पन्न सुद्धा वाढेल,या न त्या मार्गाने पैसा या महिन्यात मिळतच राहील.कर्जफेडीसाठी या महिन्यात बऱ्याच संधी मिळतील.त्याचप्रमाणे एखादे वाहन कर्ज किंवा गृहकर्ज बँकेकडुन मंजुर होऊ शकते.गुंतवणुकीसाठी एखाद्या स्थावर-जमीन  खरेदीचा विचार करायला हरकत नाही.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत गेल्या महिन्यातील प्रतीकुलता आता बऱ्यापेकी निवळलेली असेल. मागील महिन्यातील  नाखुशी ह्या महिन्यात निवळुन जाईल. ज्याकाही   जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील त्याच यथोचित पालन करणे तुमच्या हातात राहील.या महिन्यात तुमच्या कामाचे कौतुक जरी झाले नाही तरी वरिष्ठांकडून त्यांचा रोष पत्करू नका.

व्यवसाया बाबतीत काहीसा अनुकुल काळ आहे.या महिन्यात गुरूच पाठबळ मिळेल त्याचप्रमाणे केतु,शुक्र आणि मंगळ यांची पण सहाय्यता मिळेल व्यवसायाच्या बाबतीत पेशाचा ओघ वाढल्याने तुंबलेली सर्व काम नियोजित वेळेत पुर्ण होतील.या महिन्यात गुंतवलेले पेसे सुद्धा मिळतील.जुनी येणी असतील ती पण वसुल  होतील.

कोर्ट कचेरी : या बाबतीत या महिन्यात थोडीफार प्रगती संभवते आहे.आपल म्हणण खर करण्यासाठी सबळ पुरावे सुद्धा मिळतील.वकील मंडळी ची फीस आणि काही कायदेशीर बाबींमध्ये खर्चिक कार्यक्रम होण्याची दाट शक्यता आहे.

नातेसंबंध : नात्यांमधील मागील महिन्याची प्रतिकुलता या महिन्यात कमी होणार असुन काही समस्या हातावेगळ्या करता येतील आणि त्यात यश ही मिळेल.आनंदी वातावरण ठेवल्यास उत्तम राहील.गेल्या महिन्यातील वाद विवाद या आगामी कळत मिटतील.जोडीदारा सोबत सौख्याचे काही क्षण मिळतील.सुसंवाद साधल्यास जोडीदाराबरोबर नात्याची वीण घट्ट होईल.

विद्यार्थी : ह्या बाबतीत हा महिना काही अनुकुलता लाभेल मागील काही महिन्यांच्या प्रयत्नात काही यश मिळेल.अभ्यासात ज्या काही समस्या होत्या त्या आता सुटतील.परीक्षेतील यश समाधानकारक राहील.

धनु

ग्रहांची स्थिती : लग्नी शनी प्रतिकुल असणार आहे आणि शुक्र बऱ्यापैकी अनुकुल राहील,रवी द्वितीयेतुन तृतीयात भ्रमण करणार असुन महिन्याच्या मध्या नंतर अनुकुल फळे देईल,तृतीयेत बुध आणि पंचमातला मंगळ कौटुंबिक वातावरणात चिंता आणि ताण तणावाचे सावट निर्माण करू शकतो.द्वितीयातला केतु आणि अष्टमातला राहु बदलाचा खुप काही वाईट परिणाम होणार नाही आणि व्येय स्थानी गुरु खर्चात जास्त भर पाडणारा राहील.महिना तसा खडतर आणि परीक्षा पाहणारा असुन संयमाने या सगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल.

आरोग्य : प्रथम स्थानी असणारा शनी मानसिक ताण तणाव आणि दडपण वाढवतो आहे.घरातील वडिलधाऱ्या मंडळींची काळजी घ्यावी लागेल.मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी वेळेवर तपासणी करणे गरजेचे राहील.जोडीदाराच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल.मानसिक दडपण वाढल्यामुळे शारिरीक प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आर्थिक : हा महिना अवाजवी खर्चांना आमंत्रण देणारा राहणार आहे.इच्छा नसताना काही खर्च कुटुंबाच्या आनंदासाठी करावी लागतील.या सगळ्या खर्चिक परिस्थिती सुद्धा बचत ही करावीच लागेल.कर्जासाठी अर्ज करणार असाल मंजुरी साठी वेळ लागेल.प्रतिकुल वेळ असली तरी कोणाकडेही मदतीसाठी

नौकरी व्यवसाय : शनी,मंगळ आणि राहु-केतु यांची या महिन्यात सातत्याने प्रतिकुलता जाणवेल.कितीही काम केल तरी या महिन्यात वरिष्ठांकडून प्रशंसा होईल अशी अपेक्षा मुळीच बाळगु नये.वरिष्ठ आणि कनिष्ठा कडुन कुठलीही योग्य वागणुक आणि सहाय्यक अशी वागणुक मिळणार नाही.या सगळ्या मानसिकतेमुळे नौकरी सोडण्याचा विचार मनात येऊ शकतो.पण हा निर्णय तडकाफडकी घेऊ नका संयमाने या परिस्थितीला सामोरे गेलात तर तुमच्या संयमाचे फळ तुम्हाला आगामी काळात नक्की मिळेल.

व्यवसाया बाबतीत कसोटी पाहणारा महिना आहे.अप्रिय ग्रहांचे अप्रिय अनुभव हि मालिका सुरु राहणार आहे.प्रचंड प्रमाणात खर्च करूनही त्याच हवी ती परतफेड मिळणार नाही.पैसा गुंतुनही त्यातुन गुंतवणुकीची पण परतफेड होणार नाही.सहकाऱ्यांकडून सुद्धा फसवणुकीचे योग आहेत.त्यामुळे या महिन्यात कुठलाही व्यवहार करताना तपासुन पारखुन करावा.बेफिकरी करून चालणार नाही.

कोर्ट कचेरी : या बाबतीत हा महीना प्रतिकुलच म्हणावा लागेल. कायद्याच्या जंजाळात अडकुन पडण्याची शक्यता दाट आहे.कुठलाही निकाल तुमच्या बाजुने लागणार नाही.वकील मंडळींकडून काही विशेष मदत होणार नाही कायद्याच्या एखाद्या प्रकरणामुळे आर्थिक फटका बसु शकतो.साडेसातीच्या तीव्र झळा या महिन्यात जाणवतील.

नातेसंबंध : व्येयातला गुरु कौटुंबिक कार्यांसाठी प्रवासाचे योग दाखवतो आहे.शनी आणि पंचमातील मंगळ नातलगांसोबत काही वाद आणि ताण-तणाव दर्शवितो दर्शवितो.मुलांकडुन काही अनपेक्षित मागणी किंवा बातमी मिळु शकते.जोडीदाराच्या बाबतीत संमिश्र असा महिना राहील.शनी जरी ताण वाढवत असला तरी शुक्र काही संमिश्र प्रमाणात वेवाहिक सौख्य देत आहे.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांसाठी खुप मेहनतीचा महिना राहणार आहे.परीक्षेचा काळ असल्याने अभ्यासाचा वाढता ताण राहील पण या सगळ्यातुन आपण आपले प्रयत्न सातत्याने चालु  ठेवायचे आहेत कारण सातत्याने केलेले प्रयत्न या कसोटीच्या वेळेतुन बाहेर पडण्यास मदत होईल.वाईट संगतीच्या मित्र परिवारा पासुन दुर राहावे.पालकांनी पाल्याकडे लक्ष द्यावे .

मकर

ग्रहांची स्थिती : प्रथम स्थानात केतु बऱ्यापेकी अनुकुल असणार आहे.रवीचे प्रथम आणि द्वितीय स्थानात भ्रमण होणार असुन महिनाभर प्रतिकुल असणार आहे , द्वितीय स्थानी बुध आर्थिक बाबतीत उत्तम आहे.चतुर्थात मंगळ सुखद वार्ता देण्याचे संकेत आहे.सप्तमात राहु काही अंशी सर्वच आघाड्यानवर त्रासदायक आहे ,व्येयात गुरु आर्थिक पाठबळ पुरवणारा असुन आणि बाराव्या स्थानी  शुक्र आणि शनी यांची युती असल्यामुळे चिंता आणि ताण तणाव संभवतो.

आरोग्य : आरोग्या बाबतीत या महिन्यात दुर्लक्ष करून चालणार नाही, तब्येतीच्या कुरबुरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.गुरु आणि मंगळ बऱ्या पेकी पाठबळ पुरवणार आहेत.आजारपणा मुळे आणि सध्या चालु असलेल्या साडेसाती मुळे मनावर तंतानावाचे सवत राहील पण ते झटकुन कामाला लागावे लागेल.वातावरण बदलामुळे संसर्गजन्य रोग किंवा सर्दी,पडसे होण्याची शक्यता जास्त आहे,पण दुर्लक्ष करून चालणार नाही गुरुची साथ असल्यामुळे आजरातुन लवकर बरे होता येईल.

आर्थिक : या बाबतीत हा महिना अत्याधिक खर्चाचा राहणार असुन.आर्थिक बाबतीत दक्ष राहुन अवाजावी खर्च टाळावेत,या सगळ्यांचा बचतीवर ताण पडु देऊ नका.साडेसातीचे परिणाम महिन्याच्या अखेरीस जास्त तीव्रतेने जाणवतील.या महिन्यात कर्ज घेण्याचे टाळा कारण संकटकाळी घेतलेली मदत आयुष्य भरासाठी अवमानित करू शकते.आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊन काहिही करू नका.खुप मोठा तोटा सहन करावा लागु शकतो.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत हा महिना मध्या पर्यंत उत्तम कामगिरी बजावणारा असणार आहे.केलेल्या कामाचे कौतुक हि होईल परंतु महिन्याच्या मध्यानंतर परिस्थिती काहिशी अनुकुल राहणार नाही.नौकरीच्या ठिकाणी अचानक पाने काही बदल होतील त्या बदलांना अनुरूप असे स्वतः बदल घडवुन घ्यावा लागेल.अन्यथा आपली प्रगती चा आलेख घसरत खाली येऊ शकतो.

व्यवसाया बाबतीत महिन्याची सुरवात उत्तम राहील आणि मध्या पर्यंत हीच परिस्थिती राहील.महिन्याच्या मध्या नंतर साडेसातीची प्रखरता जाणवेल आणि काही संकटांचा सामना करावा लागेल.कामावर बारीक सारीक गोष्टी करताना सुद्धा भान ठेवून कराव्यात जेणेकरून आपण कुठल्या अडचणीत सापडणार नाही.सगळी कामे वेळेत पुर्ण करण्याचा प्रयत्न करा.अति जोखिम या महिन्यात टाळा.

कोर्ट कचेरी : तुंबलेल्या खटल्यात बऱ्या पेकी प्रगती संभवते आहे.काही कौटुंबिक वाद असतील तर ते सुद्धा या महिन्यात निकाली लागतील.पण असे सगळे मनासारखे घडण्यासाठी पुरावे गोळा करणे गरजेचे राहील.काही प्रकरण जर कोर्टा बाहेर सोडवता आले तर सोडवावी.

नातेसंबंध :  कौटुंबिक सौख्य चांगले राहील.लाभातला गुरु आपल्याला चांगले पाठबळ देतो आहे तरी सुद्धा व्येयातले शनी-शुक्र काही प्रमाणात प्रतिकुलता दर्शवितात त्यामुळे नाती संयमाने जपुन हाताळाली तर घरात आनंदी आनंद राहील.मुलांकडे विशेष लक्ष पुरवावे लागेल.जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवता येईल मानसिक पातळीवर एकमेकांना समजून घ्या त्याने नात्यांची वीण घट्ट होईल.

विद्यार्थी : विद्यार्थांना या महिन्यात पोषक वातावरण मिळेल त्यामुळे अभ्यासात समाधानकारक प्रगती होईल.पण थोड्याश्या यशाने हुरळुन न जाता अभ्यासात आणि मेहनतीत सातत्य ठेवाव लागेल.सातत्याने जर प्रयत्न केले तर शिक्षकांकडुन कौतुकाची थाप मिळेल.

कुंभ

ग्रहांची स्थिती :लग्नी बुध आणि नेपच्युन काहीसे अनुकुल आणि काहीसे प्रतिकुल राहतील,रवीचे प्रथम स्थानातुन बाराव्या स्थानी भ्रमण चालु असल्यामुळे महिनाभर त्याची साथ मिळणार नाही ,तृतीयेतला मंगळ ही सकारत्मक बाजु राहील आणि हर्षल सुद्धा तृतीयेतच राहील ,षष्टात राहु ,दशमातील गुरु काहीसा प्रतिकुल राहील ,व्येयात शनी आणि शुक्राची युती लाभ मिळवुन देणारी आहे आणि बाराव्या स्थानी केतु बऱ्यापैकी अनुकुल आहे.ही ग्रहस्थिती पाहता हा महिना कुंभ राशीच्या जातकांसाठी उत्तम प्रगतीकारक महिना आहे.

आरोग्य :तृतीयेतला मंगळ आणि व्येयातला शुक्र यांचे चांगले पाठबळ मिळत आहे.त्यामुळे तब्येत अगदी ठणठणीत राहणार आहे.आरोग्या बाबतीत या महिन्यात चिंता करण्याचे कारण नाही.स्वास्थ्य अगदी उत्तम असुन महिनाभर अंगात सळसळता उत्साह राहील.व्यायाम,योगा आणि प्राणायाम केल्यास अजुन उत्तम अशी तब्येत राहील.

आर्थिक : या बाबतीत हा महिना समाधानकारक असा राहणार असुन,प्रगतीकारक सुद्धा आहे.खर्च कमी होऊन बचीतेचे आकडे मनासारखे वाढवता येईल.आर्थिक प्रगतीबाबत समाधानी राहता येईल.गुंतवणुक करण्यासाठी सुद्धा योग्य काळ आहे.बचतीमुळे वस्तू खरेदी साठी उत्तम योग संभवतो.बँक कडुन सुद्धा कर्ज मंजुरी विनात्रास होईल.एकंदरीत आर्थिक बाबतीत प्रसन्न वातावरण राहील.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत हा महीना बऱ्या पेकी अनुकुल असुन मागील काही दिवसांपासून होत असलेला त्रास कमी होईल.कामाच्या ठिकाणी काही चांगले बदल होतील.नौकरी बदलाचा विचार करत असाल किंवा नौकरी शोधात असाल तर त्यासाठी सुद्धा अनुकुल असा काळ आहे. वरिष्ठांचे दडपण कमी होईल,आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करायची हीच योग्य वेळ आहे.

व्यवसाया बाबतीत हा महीना चांगलीच परिक्षा पाहणारा आहे.येणाऱ्या संकटाना तोंड देत खंबीरपणे पाय रोवुन उभे राहावे लागेल.व्यवसाय विस्तारासाठी योग्य वेळ राहील ,आर्थिक बाजु सुद्धा अनुकुल राहणार आहे.कर्जासाठी अर्ज केला असाल तर ते मान्य होण्यासाठी सुद्धा योग्य असा काळ आहे.एकंदरीत स्पर्धा असली तरी आपल्या मेहनतीने उत्तम असे यश मिळवता येईल.

कोर्ट कचेरी  : खुप दिवसांपासून तुंबलेल्या कामना गती मिळेल ,पुरावे सुद्धा योग्य वेळेवर सिद्ध झाल्यामुळे निकाल तुमच्या बाजूने अनुकुल असा राहील.स्थावर मालमत्ते संबंधी असलेले वाद शक्यतो कोर्टाच्या बाहेर सोडवण्याचा प्रयत्न करा त्यात यश मिळण्याची संभावना जास्त आहे.

नातेसंबंध : कौटुंबिक पातळीवर आनंदाचा महिना राहील.मंगळ अनुकुल असुन शनी शुक्र पण वेगळाच आत्मविश्वास देणार आहे.सगळीकडे सकारात्मक वातावरण राहील आणि यामुळे मानसिकरित्या सुद्धा ह्या महिन्यात शांतता राहील.दूर गेलेली सगळी नाती स्वतः हुन जवळ येतील.जोडीदाराच्या बाबतीत हा महिना सौख्यकारक राहील,वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल.

विद्यार्थी : जसा जसा महिना पुढे जाईल तशी तशी उत्तम प्रगती साध्य करता येईल.मनासारखे यश हवे असेल तर कठोर मेहनत घ्यावी लागेल.अभ्यासा व्यतिरिक्त इतर प्रलोभानांकडे लक्ष देऊ नये पालकांनी पाल्यांकडे योग्य लक्ष द्यावे.खेळात उत्तम प्रगती साधता येईल.

मीन

ग्रहांची स्थिती : द्वितीय स्थानी हर्षल आणि मंगळ असल्याने मागील महिन्यातील ताण तणाव आता निवळणार आहेत.पंचमात राहु नवमातील गुरु महिनाभर चांगले पाठबळ पुरवणार आहे.शनी दशमात असुन सुद्धा त्याची प्रतिकुलता जाणवणार नाही आणि शुक्राची साथ थोड्या फार प्रमाणात लाभेल ,लाभ स्थानात केतु शुभ फळ देणार असुन रवी बाराव्या स्थानातुन लाभात जात असुन महिनाभर अनुकुल राहणार आहे  बाराव्या स्थानी बुध आणि नेपच्युन महिनाभर असणार आहेत.बुध सुद्धा या महिन्यात काहीसा अनुकुल काहीसा प्रतिकुल असणार आहे.एकंदरीत महिना हा फलदायी असणार आहे.सातत्याने यशाकडे वाटचाल राहणार आहे.

आरोग्य : आरोग्य बाबतीत हा महिना उत्तम राहील कारण मागील महिन्यातील मंगळ आता द्वितीय स्थानात भ्रमण करत असल्याने ताण-तणाव,चिंता,अस्वस्थता सगळे काही विरून जाईल त्यामुळे मानसिक शांतता लाभेल निश्चितच त्याचा परिणाम शारिरीक स्वास्थ्यावर होऊन ठणठणीत पणा जाणवेल.आत्मविश्वासाने परिपुर्ण असा महिना राहील.संपुर्ण महिनाभर सळसळता उत्साह अंगी राहील.

आर्थिक : या बाबतीत हा महिना समृद्धीचा राहील,अनेक मार्गांनी धनलाभ होईल,या महिन्यात सगळे मनाजोगते होत असल्याने खर्चावर तुम्हाला हवे तसे नियंत्रण ठेवता येईल.या महिन्यात मनासारखी बचत करता येईल.गुंतवणुकीचा विचार करत असाल तर घर खरेदीचा विचार करायला काही हरकत नाही,गृह कर्जास सुद्धा मंजुरी मिळेल.महिन्याच्या

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत हा महिना उत्तम असणार असुन,नवमातला गुरु आणि लाभातला केतु तुम्हाला महिनाभर साथ देणार आहेत.विरोधकांचे तुमच्या कामा पुढे काहिही चालणार नाही.आपल्या कामाची वरिष्ठाकडून कौतुक होईल.कामाचे दडपण वाढले तरी तुम्ही तुमची कामगिरी उत्तमपणे बजावल्यामुळे चिंतेचे काही कारण नाही.

व्यवसाया बाबतीत समृद्धतेने संपन्न असा महिना राहील.व्यवसाय भरभराटीचा राहील.व्यवसाय विस्तार करण्यासाठी हा कालखंड योग्य राहील.नवीन कल्पना प्रत्यक्षात आणता येतील.आर्थिक मदत पण सहज साध्य होईल मागील महिनाभर जी ओढाताण होती ती आता निवळेल.त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.

कोर्ट कचेरी : नवमातील मंगळ या बाबतीत ह्या महिन्यात उत्तम साथ देत आहे.विरोधकांना प्रत्युत्तर देता येईल.कायद्याच्या बाबतीत अनुकुल निकाल लागल्याने मानसिक शांतता लाभेल.स्थावर मालमत्तेसंबंधीचे प्रश्न मार्गी लागतील.

नातेसंबंध : कौटुंबिक सौख्याच्या बाबतीत हा महिना उत्तम राहील.कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत सुसंवाद होईल.सन्मानपुर्वक वागणुक मिळेल.एखाद्या कार्य घडेल आणि आप्तांच्या भेटींचा योग जुळवुन येईल.जोडीदाराच्या बाबतीत ही प्रेमपुर्वक राहणार आहे.वैवाहीक सौख्याचा पुरेपुर आनंद घेता येईल.नवविवाहितांसाठी स्थळ चालुन येण्याचा उत्तम काळ आहे.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा महिना उत्तम राहील.परिक्षेत उत्तम यश मिळवता येईल, केलेल्या मेहनतीचे चीज होईल,पालकांनी पाल्यांना मानसिक पाठबळ पुरवावे.कला आणि खेळात उत्तम यश मिळेल.

!!!!शुभम भवतु!!!!