एप्रिल महिन्याचे राशी भविष्य

एप्रिल हा इंग्रजी महिना फाल्गुन आणि चैत्र या दोन मराठी महिन्यात विभागला गेला आहे.दिनांक ६ एप्रिलरोजी चैत्र महिना सुरु होत असुन त्याच दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आहे. शके १९४१ विकारी नाम संवत्सर हे नवीन संवत्सर चैत्र    शुद्धप्रतिपदेला सुरु होत असुननवीन वर्षाआरंभ आणि चैत्रातील नवरात्रीचा प्रारंभ होत आहे.दिनांक १३ एप्रिल ला रामनवमी असुन चैत्र पौर्णिमेला म्हणजेच १९ तारखेला हनुमान जयंती आहे.या महिन्यात ११ एप्रिलला बुध मीनेत जाईल.रवी हा १४ तारखेनंतर मेष राशीत भ्रमण करणार आहे.१५ एप्रिलला शुक्र मीन राशीत जाईल.२२ एप्रिलला गुरु वक्री अवस्थेत धनु राशीतुन वृश्चिक राशीत येत आहे. राहू मिथून राशीत तर केतु धनु राशीत आहे.शनि धनु राशीत आहे.मंगळवृषभ राशीत आहे.

 

मेष

ग्रहांची स्थिती : रवी बाराव्या आणि पहिल्या स्थानातुन भ्रमण करणार असुन द्वितीयात म्हणजे धन स्थानात मंगळाचे भ्रमण असुन तो चांगल्या गोष्टीचे संकेत देत आहे.तृतीयातला राहु काही अनपेक्षित लाभाचा धनी करणार आहे.भाग्य स्थानी होणारी गुरु-शनी-केतु यांची युती सुद्धा सौख्यदायक असणार असुन लाभतील बुध-शुक्र युती सुद्धा लाभदायक ठरणार आहे.महिना एकंदरीत उत्तम फलदायी असा असणार आहे.महिन्याच्या मध्यानंतर महिना संमिश्र फलदायी राहील.

आरोग्य : सगळे ग्रह उत्तम स्थितीत असल्याने ग्रहानुसार प्रकृती उत्तम असणार आहे.त्यामुळे मागील महिन्यातील ज्या काही तब्येतीची तक्रारी होत्या त्या आता रोगाचे मुळ सापडल्यामुळे  महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येतील.परंतु रवीचे भ्रमण महिन्याच्या मध्या नंतर राशीत होत असल्यामुळे उन्हाळी रोगांपासुन स्वतःला जपावे उन्हाळी संसर्गाने डोके वर काढण्याआधीच योग्य ती काळजी घ्यावी असे संकेत आहेत.

आर्थिक : चैत्राचा पाडवा तुम्हाला आर्थिक बाबतीत काही अंशी सुखद आणि प्रगतिकारक महिना राहील.आर्थिक बाबतीत जी काही कामे खोळंबली होती ती कामे आता सुरळीत होतील असा संकेत आहे.कर्ज घेतली असतील तर लवकरात लवकर फेडली तर उत्तम राहील.

नौकरी : नौकरी करणाऱ्यानां उत्तम असा कालखंड लाभत आहे.काम करताना येणाऱ्या अनंत अडचणी असल्या तरी आपल्याला उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करता येईल अशी ग्रह परिस्थिती आहे.सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे कामाचा ताण कमी होईन निवळुन जाईल.संयमाने केलेल्या प्रयत्नामुळे वरिष्ठांचे तुमच्या कामाकडे लक्ष जाईल आणि हळुहळु त्याची दखल ही घेण्यात येईल.

व्यवसाय : उद्योजकांना व्यवसायासाठी आत्मबळ देणारे असे ग्रहमान आहे.या ग्रहमानाचा फायदा घेतल्यास हवी ती संधी मिळेल.प्रत्येक समस्येवर काही ना काही मार्ग असतोच अशी ग्रह स्थिती आहे आणि त्यामुळे तुमच्या समोर असलेल्या प्रत्येक समस्येचे उपाय ही तुम्हाला सापडतील आणि त्यावर यथोचीत अशी अंमलबजावणी ही तुम्हाला करता येईल.आत्मविश्वासाने परिस्थितीवर स्वतःचे वर्चस्व गाजवल्यास काहीच अवघड नाही.

कोर्ट कचेरी : काही बाबतीत प्रकरण पुढे जातील.कोर्टा बाहेर तडजोड करता आली तर उत्तम अथवा महिन्याच्या मध्यापर्यंत कामे उरकावीत असे ग्रह संकेत आहे.महिन्याच्या मध्यानंतर आगामी काळासाठी व्यवहार स्थगित केल्यास उत्तम अथवा संयम आणि सावधगिरीने निर्णय घ्यावा.

नातेसंबंध : कौटुंबिक पातळीवर नाते संबंध उत्तम राहील,चैत्राचे वारे सुख घेऊन येत आहेत सुखद आणि आनंदी वातावरण राहणार आहे.त्यामुळे मानसिक समाधान मिळेल आणि मानसिक आरोग्य सुद्धा लाभेल.वैवाहिक सौख्य सुद्धा उत्तम असणार आहे जोडीदाराकडुन उत्तम साथ लाभणार आहे.नात्यांच्या आघाडीवर निर्धास्त राहण्यासारखा असा महिना आहे.

विद्यार्थी : आत्मविश्वास वाढवणारे ग्रहमान असणार आहे.त्यामुळे परीक्षेची उत्तम तयारी करता येईल आणि पुढे येणाऱ्या परिक्षेसाठी मेहनत घेतली तर यश तुमचेच आहे असे संकेत ग्रह देत आहेत.पालकांनी पाल्यांना मानसिक पाठबळ द्यावे.

वृषभ

ग्रहांची स्थिती : रवी या महिन्यात अकराव्या आणि बाराव्या स्थानातुन भ्रमण करणार आहे.मंगळ राशीत असुन उन्हाच्या तीव्रतेसारखा तीव्र असणार आहे.धनस्थानी असलेला राहु समस्यांचे जाळे विणण्याचा प्रयत्न करेल.अष्टमातील शनी-गुरु-केतु यांची युती तुमच्यासाठी प्रतिकुल असणार आहे.दशमातील बुध आणि शुक्र यांची युती तुम्हाला मित्र मंडळीप्रमाणे दिलासादायक ठरतील व प्रतिकुलतेच्या विरोधात पाठबळ देतील.

आरोग्य : राशीत मंगळ असल्यामुळे शारिरीक पातळीवर प्रकृतीला जपावे असे संकेत देत आहे.शारिरीक व्याधींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.वेळेवर योग्य ती तपासणी करून घ्यावी उन्हामुळे होणाऱ्या त्रासांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी लागेल.शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी ध्यान धारणा आणि योगासन यांची साधना केल्यास उत्तम लाभ होईल.

आर्थिक : वाढत्या उन्हाची दाहकता या बाबतीत जाणवुन देणारा असा हा महिना आहे.नको असलेले खर्च ‘आ’ वासुन पुढ्यात उभे ठाकतील.मिळकत कमी आणि खर्च जास्त अशी एकंदर परिस्थिती आहे.इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टींवर विनाकारण खर्च होऊ शकतो आहे.बचत जरी होणार नसली तरी होणाऱ्या खर्चावर शक्य तितके नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा.

नौकरी : राशीतला मंगळ आणि अष्टमातील शनी कामाचा ताण वाढवणारा आणि मानसिक सौख्य हरणारा असणारा आहे. त्यामुळे कुठल्याही बदलांना किंवा निर्णयाला विरोध करण्याऐवजी जर जुळवुन घेतले तर परिस्थिती काहीशी आटोक्यात येऊ शकते.कार्यालयीन कामाचे योग्य नियोजन केल्यास कामाचा ताण जाणवणार नाही,काम वेळेत पुर्ण केल्यास वरिष्ठांच्या रागापासुन सुटका होईल.

व्यवसाय : उद्योजकांसाठी चैत्रातच वैशाख वणव्याची चाहुल देणारा असा महीना राहणार असुन.परिस्थितीचा सारासार विचार करून दुरदर्शी भुमिका लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा.हातच सोडुन धावत्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करू नये,जे काही सध्या परिस्थिती हातात आहे ते टिकवुन ठेवावे लागेल.योग्य ठिकाणी खर्च करावा आणि कुठल्याही प्रकारचा धाडसी निर्णय घेणे टाळावे.

कोर्ट कचेरी  : कोर्टाची पायरी शाहण्याने चढु नये असा स्पष्ट संकेत या महिन्यातील ग्रहमान देत आहे. कुठलेही प्रकरण कोर्टाच्या बाहेर मिटवुन संपवता आले तर अतिउत्तम राहील.अनुकुलता नसल्यामुळे घडणाऱ्या घटनांना स्थिर मनोवृत्तीने सामोरे जावे लागेल.

नातेसंबंध : अष्टमातील गुरु-शनी-केतु नात्यांमध्ये परिक्षेचा काळ आहे अस वाटु शकत आहे.सुसंवादाचा प्रयत्न करावा लागेल,शांततेने सगळ्याचं ऐकुन घ्यावे लागेल,अचानक घरातील मंडळीच्या मागण्या वाढतील आणि काही अंशी तुम्हाला त्या पुरवाव्या लागतील त्यामुळे कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा संयमपुर्वक प्रयत्न करावा.राशीतल्या मंगळा मुळे वैवाहिक सौख्याची कमतरता राहील पण सुसंवाद आणि योग्य वेळ देऊन नात्याला जपल्यास नाते टिकेल.

विद्यार्थी : सातत्य आणि चिकाटीने कठोर परिश्रमाशिवाय या महिन्यात काही अन्य पर्याय नाही अशी स्पष्ट सुचना आहे एकंदरीत ग्रह स्थिती त्याकडेच संकेत देत आहे.येणाऱ्या प्रत्येक आव्हांनाना सामोरे जावे लागेल.पालकांनी पाल्यांकडुन कसुन तयारी करून घ्यावी.

मिथुन

ग्रहांची स्थिती : रवी लाभ आणि दशम स्थानातुन भ्रमण करणार आहे.राशीत राहुचे भ्रमण सप्तमातील गुरु-शनी-केतु युती होत असुन काहीशी प्रतिकुल आहे पण गुरु बऱ्यापैकी तुम्हाला साथ देत आहे.भाग्य स्थानात होणारी बुध-शुक्राची युती महिन्याच्या मध्यापर्यंत दिलासादायक असणार आहे.व्येयातला मंगळ ताण तणाव वाढवतो आहे.एकंदरीत महिना संमिश्र फलदायी असा आहे.महत्त्वपुर्ण निर्णय ग्रहांच्या अनुकुलतेने घेतल्यास उत्तम असा महिना आहे.

आरोग्य : व्येयातला मंगळ अनावधानाने अनपेक्षित ताणाला आमंत्रण देत आहे.एकंदरीत तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल पण विशेष काळजी करण्याचे काही कारण नाही.राहु-केतुचे विपरित भ्रमण पाहता आरोग्याच्या बाबतीत हलगर्जी पणा करून चालणार नाही.योग्य ते औषधउपचार केल्यास गुरुचे पाठबळ मिळेल व तब्येत सुधारण्यात मदत होईल.

आर्थिक : आर्थिक पातळीवर सौख्यदायी असा महिना असणार आहे.मागील महिन्यात जी काही हानी झाली आहे ती या आगामी कळत भरून निघुन जाईल.योग्य वेळेत मदत सुद्धा मिळेल वर्षाच्या सुरवातील आर्थिक स्थिती उत्तम लाभती आहे.तिला कायम टिकवुन ठेवणे हे तुमच्या हातात असणार आहे.जे काही घेतलेले कर्ज असतील ते फेडण्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे.

नौकरी : ग्रह आपल्यासाठी काही चांगल्या बदलांचे संकेत देत आहेत.नवीन नौकरीच्या शोधात असाल तर एखाद्या मुलाखती साठी जाण्याचा योग संभवतो आहे आणि तुमच्या प्रयत्नांना यश सुद्धा मिळेल असे संकेत ग्रहस्थिती देत आहे.आपल्याला कामाच्या ठिकाणी असणारा त्रास कमी होऊन त्यामुळे मानसिक शांतात लाभेल.आपल्याला वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल आणि त्यामुळे वरिष्ठांकडुन वाहवा सुद्धा मिळेल.

व्यवसाय : ‘जो हरला तो संपला’ अशी स्थिती असल्यामुळे सगळ्या आघाड्यांवर प्राणपणाने लढावे लागेल.आपल्याला हवी ती संधी किंवा स्थिती काबीज करण्याची हीच योग्य संधी मानुन जोमाने मेहनत घेतल्यास यश तुमचेच आहे.सगळ्या समस्यांशी लढला तर विजय तुमचाच आहे असे समजा.

नातेसंबंध : घरातील सगळ्या मंडळींशी सुसंवाद घडेल.नात्यामधील कटुता कमी होईल त्यामुळे सुसंवाद मनमोकळे पणाने होईल.त्यामुळे असलेले हेवे-दावे मिटुन जातील.कटुता मिटल्यामुळे नात्यांमध्ये ऐका प्रकारची सहजता येईल.ऐखादे कार्य घडल्यास सगळ्यांच्या गाठीभेटी होतील.जोडीदाराबरोबर संबंध उत्तम राहतील.जे काही दुरावे निर्माण झाले असतील ते मिटवण्याची हीच योग्य संधी आहे.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांनी लक्ष एकाग्र करून अभ्यास केल्यास यश तुमच्या पदरी पडेलच.परीक्षेची स्पर्धा असल्यामुळे अभ्यास करून मेहनत घेतल्यामुळे सहजपणे सरशी करून पुढे जाता येईल.शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल त्यामुळे ठरवलेली ध्येये सहज प्राप्त करता येतील.पालकांनी पाल्याकडे विशेष लक्ष पुरवावे.

कर्क

ग्रहांची स्थिती : रवी या महिन्यात दशम आणि भाग्य स्थानातुन भ्रमण करणार आहे.महिन्याच्या मध्या नंतर रवी लाभदायक ठरतो आहे.षष्टातील शनी-गुरु-केतु यांची युती बऱ्यापैकी अनुकुल आहे तरी गुरुचे पाठबळ या महिन्यात तितकेसे लाभणार नाही.अष्टम स्थानातील बुध-शुक्राची युती सुद्धा अनुकुल आहे.लाभातल मंगळ सुद्धा लाभकारक आहे.व्येय स्थानात राहु असल्यामुळे बऱ्यापैकी दिलासा या महिन्यात मिळेल.परिस्थिती हातात असल्यामुळे संयमाने आणि निर्णय घेऊन पुढील वाटचाल करावी.

आरोग्य : षष्टातला शनी काहीश्या आरोग्याच्या तक्रारी घेऊन येत आहे.त्यामुळे मानसिक आरोग्यावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो,घरातील वडिलधाऱ्या मंडळींच्या तब्येती कडे लक्ष असु द्यावे.पोटा संबंधी विकार उत्पन्न होऊ शकतात पण लाभातील मंगळाची उत्तम साथ असल्यामुळे तब्येत लवकरात लवकर बरी होत आहे.व्यायामावर विशेष लक्ष पुरवल्यास प्रकृती उत्तम राहील.

आर्थिक : आर्थिक आवक वाढणार असुन आणि त्याच बरोबर असणारी जबाबदारी सुद्धा या महिन्यात वाढणार आहे.आणि सगळ्या जबाबदाऱ्या यथायोग्य पणे पुर्ण करत येतील.त्याच बरोबर बचतीवर सुद्धा लक्ष ठेवावे लागेल.एखाद्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर स्थावर गुंतवणुकीचा विचार करावयास काही हरकत नाही.कर्जासाठी अर्ज केला असेल तर त्यासाठी वेळ लागणार आहे.

नौकरी : आपल्या उत्साहामुळे कामाच्या ठिकाणी चैतन्यदायी वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या कामामुळे तुमच्या प्रगतीचा वेग ही वाढता राहील,आणि आपले विरोधक आपल्या प्रगतीमुळे आपला विरोध करतील आणि त्यामुळे असुया निर्माण होईल त्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी.आणि आपली कामे यथायोग्य पणे पार पडवीत.

व्यवसाय : व्यावसायिक पातळीवर प्रगतीकारक असा उत्तम महिना असा असणार असुन त्याचा यथा योग्य लाभ घ्यावा त्यामुळे तुमच्या प्रगतीसाठी दारे खुले होतील स्पर्धकांसोबत असलेल्या स्पर्धेत चुरस होईल.सगळे ग्रह अनुकुल असल्यामुळे तुमच्यासाठी प्रगतीची उत्तम संधी आहे.योग्य ठिकाणी गुंतवणुक केल्यास योग्य अशी फळे मिळतील.

कोर्ट कचेरी : कोर्टा बाहेर तडजोडीचा पर्याय निवडला तर उत्तम राहील.आणि जो काही निर्णय घ्याचा असेल तो लवकरात लवकर घ्याव जेणेकरून काही बाबी अवघड होणार नाही.आणि पुढील काम काही काळासाठी पुढे ढकल्यास आपल्या मनासारखे काम होऊ शकते.

नातेसंबंध : गुरु नातेसंबंधाच्या बाबतीत काही अनुकुल नाही,पण इतर सर्व ग्रह अनुकुल स्थितीत असल्याने सर्व समस्यांना योग्य वेळ देऊन योग्य रितीने हाताळल्यास आणि नात्यामध्ये सुसंवाद साधल्यास सगळ काही नियंत्रणात राहील.महिन्याच्या मध्यानंतर एखादी आनंददायी वार्ता सौख्यकारक ठरू शकते.जोडीदाराबरोबर सुद्धा आनंदाने वेळ घालवता येईल.

विद्यार्थी : ‘अभ्यास एके अभ्यास’ असे धोरण ठेवावेच लागेल त्याशिवाय यशाची अपेक्षा करता येणार नाही.त्यामुळे एकाग्र चित्त होऊन अभ्यास करावा.शिक्षकांची मदत घेतल्यास अजुन उत्तम प्रगती साधता येईल.पालकांनी पाल्यांची एकाग्रातेकडे लक्ष द्यावे.

सिंह

ग्रहांची स्थिती : रवीचे भ्रमण नवम आणि अष्टम स्थानातुन होणार असुन काही अनुकुलता प्रदान करत नसुन पंचमात शनी-केतु-गुरु यांची युती होत आहे शनी केतु जरी फलदायी नसले तरी गुरु उत्तम फलदायी आहे.सप्तमात बुध-शुक्राची युती घडत असुन बऱ्यापैकी उत्तम फलिते आहेत.दशमातला मंगळ तणावपुर्ण स्थिती निर्माण करत आहे.मागील काही महिन्यांपेक्षा उत्तम असा फलदायी काळ असणार आहे.

आरोग्य : तब्येत उत्तम असणार आहे आरोग्य बाबत काळजी करायचे काही कारण नाही घरातील मंडळीच्या तब्येतीकडे लक्ष द्या उन्हाळी रोगांपासुन स्वत:ची आणि आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी.ग्रहमान आरोग्य उत्तम प्रदान करत आहे.जरासा मानसिक ताण असु शकतो आहे त्याचे योग्य नियोजन करून ध्यान धारणा केल्यास तेही निवळु शकते.

आर्थिक : चैत्राचा पाडवा तुमच्यासाठी आर्थिक संपदा घेऊन येत आहे.वाढलेले उत्पन्न तुम्हाला सुखकारक ठरू शकतो.कर्ज घेतली असतील तर लवकरात लवकर फेडता येतील आणि मनासारखी गुंतवणुक सुद्धा या महिन्यात संभवते आहे.तुमच्यासाठी आर्थिक सुगीचे दिवस आहे. सर्व ग्रह भरभरून देत आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि गुंतवणुक करावी.

नौकरी : नौकरीच्या ठिकाणचे वातावरण उत्तम असणार आहे असा संकेत गुरु देत आहे.आनंदाचे आणि उत्साह पुर्ण वातावरण राहील आपली कामे आणि वेळेचे योग्य नियोजन केल्यास यश तुमचेच आहे आणि तुमच्या प्रगतीसाठी ते कारणीभुत पण असणार आहे.एकंदरीत तुमच्यासाठी अनुकुल असा काळ आहे.

व्यवसाय :चैत्राचा पाडवा तुमच्यासाठी यशदायी ठरत आहे.सगळी ग्रह तुमच्या बाजुने असल्यासारखी तुमची परिस्थिती आहे. इथुन पुढे कामे मिळतील आणि त्यामुळे मानसिक समाधान लाभुन योग्य प्रकारे अर्थार्जन करत येईल आणि योग्य प्रकारे हवी तशी गुंतवणुक करता येईल.आणि बँकाकडुन एखादे कर्ज मंजुर होऊन कामास गती मिळेल.उत्पन्नात झालेली वाढ सुखदायी ठरू शकते.

कोर्ट कचेरी : कोर्टाच्या रखडलेल्या कामात यश मिळेल.सगळे वाद संपुन तुमच्या बाजुने यथा योग्य निकाल लागण्याची एकंदरीत परिस्थिती आहे.हा महिना या बाबतीत सुखकारक ठरत आहे.

नातेसंबंध :या बाबतीत हा महीना उत्तम आणि प्रगतीकारक असणार असुन घरातील सर्व मंडळींसोबत सुसंवाद राहील आणि तुमच्या सर्व धोरणांना घरातील मंडळींकडुन पाठबळ सुद्धा पाठबळ मिळेल.जे काही गैरसमज असतील ते सगळे दुर होतील.एखादा छोटासा समारंभ घरातील सगळ्या मंडळींना एकत्र आणु शकतो आणि संबंध अजुन दृढ करता येऊ शकतात.जोडीदारा बरोबर सौख्यदायक काळ राहील.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास दुणावेल आणि त्यातुन त्यांच्याकडुन एखादी उत्तम कामगिरी सुद्धा घडु शकते आहे.आपल्या उद्दिष्ट पुर्तीसाठी असलेल्या सगळ्या बाबींची स्पष्ट कल्पना येऊन त्या दिशेने विद्यार्थ्यांना योग्य तो मार्ग मिळेल आणि ध्येयाकडे वाटचाल होईल.पालकांनी पाल्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष पुरवावे.

कन्या

ग्रहांची स्थिती : रवी सातव्या आणि आठव्या स्थानातुन भ्रमण करणार आहे त्यामुळे त्याची काही साथ या महिन्यात लाभणार नाही.चतुर्थात घडणारी गुरु-शनी-केतु ची युती विपरित घटनाकडे संकेत वर्तवणारी असली तरी गुरूच्या पाठबळामुळे तिचे वाईट परिणाम कमी होत आहेत.षष्ट आणि सप्तम स्थानातुन होणारे बुध-शुक्र या युतीचे भ्रमण काहीसे प्रतिकुल आहे.आणि नवव्या स्थानी मंगळ आणि दशमात राहु एकंदरीत ग्रहमान काही लाभकारक नाही.या महिन्यात उन्हाच्याझळाप्रमाणे समस्या सुद्धा तीव्र जाणवतील असे ग्रहांकडुन संकेत मिळत आहेत.

आरोग्य : तब्येत उत्तम आणि ठणठणीत राहील पण काहीश्या कुरबुरी राहतील.पण योग्य औषध उपचार घेतल्यास व योग्याहार विहार आणि विश्राम केल्यास लवकर बरे होण्याशी शक्यता जास्त आहे.जराही निष्काळजी पणा दाखवल्यास तब्येतीवर विपरित परिणाम होऊ शकतो.कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यावी लागेल.

आर्थिक : आर्थिक बाजुबऱ्या पैकी उत्तम असणार असुन परिस्थिती नियंत्रणात आणता येईल अशी स्थिती एकंदरीत ग्रहमान वर्तवत आहे.खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवल्यास बचत सुद्धा होईल आणि वैयक्तिक ग्रहबल असल्यास एखादे कर्ज प्रकरण सुद्धा मंजुर होईल.आर्थिक अडचणी या महिन्यात कमी होतील.

नौकरी : या बाबतीत कितीही अडथळे असल्यास त्यांना तुम्ही सहजरित्या पार पडु शकतात.ऑफिस मधील वरिष्ठ सहकारी तुमच्या बाजुने असल्यामुळे तुम्हाला समस्यांमधुन लवकरात लवकर सुटका मिळेल.काही बाबी मनासारख्या घडणार नाहीत म्हणुन कुठलाही टोकाचा निर्णय न घेता आहे त्या परिस्थितीत बदल घडवुन आणल्यास उत्तम राहील.

व्यवसाय : उत्साहाने आणि उमेदीने कामाला लागल्यास यावेळी तुमचे मानसिक आत्मबळ वाढीस लागुन त्यातुन काही ना काही मार्ग निघण्याची संभावना आहे त्यामुळे प्रयत्न करत राहावे लागतील.विचारपुर्वक निर्णय घेतल्यास पुढील काही काळासाठी योग्य योजना आखुन प्रवासाला सुरवात करावी लागेल.एखादे कर्ज प्रकरण मंजुर होईल पण त्यासाठी थोडा वेळ लागु शकतो आहे.

कोर्ट कचेरी : प्रगती अगदी एक पाउल पुढे जाणार आहे त्यामुळे खुप आनंदुन न जाता पुढील बाबीसाठी आपली बाजु अजुन भक्कम करावी कारण जी काही थोडीफार अनुकुलता लाभली आहे तिला पुर्णपणे आपल्या बाजुने वळवण्यासाठी प्रयत्न केल्यास तुमच्यासाठी उत्तम राहील.

नातेसंबंध : जरासे ताणतणाव असतील पण वेळीच सामंजस्यपणा दाखवला नाही तर गोष्टी बिघडु शकतात एखाद्या छोट्याश्या गोष्टीमुळे मोठा वादंग किंवा वाद होऊ शकतो.त्यामुळे जरासे मानसिक ताणतणाव जाणवतील वैवाहिक सौख्याच्या बाबतीत काहीसा संमिश्र असा महिना असणार आहे त्यामुळे जरा जपुन राहिल्यास हा काळ निघुन जाईल.

विद्यार्थी : परिक्षेचे ओझे यामुळे मानसिक ताण वाढेल पण त्यामुळे खचुन न जाता योग्य नियोजन करून अभ्यास केल्यास तुम्हाला उत्तम लाभ होऊ शकतो.वेळेचे योग्य नियोजन करून खडतर परिश्रम करून अभ्यास केल्यास यश तुमचेच आहे.

तुळ 

ग्रहांची स्थिती :रविचे भ्रमण साहव्या आणि सातव्या स्थानातुन होत असल्यामुळे महिन्याच्या मध्यापर्यंतचा  काळ हा उत्तम असणार आहे.तृतीयात शनी-केतु-गुरु ची युती असुन शनी आणि केतु यांचे पाठबळ उत्तम आहे गुरु काही अंशी प्रगतीला खीळ घालु शकतो.पंचमातील बुध शुक्र युती हि प्रगतीकारक राहील.अष्टमातला मंगळ आगेकुच करण्यासाठी प्रतिबंध घालतो आहे.एकंदरीत महीना उत्तम असणार आहे महिन्याच्या मध्यापर्यंतचा काळ हा मनासारखा असणार आहे.

आरोग्य : आरोग्यासाठी हा महिना महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत उत्तम स्थितीत असणार आहे आणि मध्यानंतर बदलत्या तापमानाप्रमाणे उन्हाचा दाह असहनीय होईल त्यामुळे स्वतःची योग्य काळजी घ्यावी कुटुंबातील मंडळींचे आरोग्य सुद्धा उत्तम राहील.योग्य वेळी निदान करून योग्य उपचार घेतल्यास सर्व काही आटोक्यात येईल.संमिश्र फलदायी असला तरी उत्तम फळे देत आहे काळजी नसावी.

आर्थिक : आर्थिक आलेख असमाधानकारक स्थितीत असणार आहे.अनपेक्षित खर्च अचानक पणे वाढतील उन्हाळ्यातील चटक्यानप्रमाणे खर्च तुमच्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावे आणि जे आवश्यक आणि गरजेचे खर्च असतील त्यांना प्राधान्य देऊन त्यांचा निपटारा करावा.महिन्याच्या मध्यानंतर कुठलाही निर्णय घेताना काळजीपुर्वक निर्णय घ्यावा.

नौकरी : नौकरी करणाऱ्यांसाठी उत्तम असा काळ असणार असुन नौकरीतील प्रगती सुखावणारी असणार आहे त्यामुळे ऑफिसच्या सहकार्यांमध्ये तुमच्या बद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन तुमच्या विरुद्ध काही कारवाया आणि कुरघोडीना नवीन स्वरूप मिळेल पण आपण आल्या कामा व्यतिरिक्त अजुन कुठेही लक्ष देऊ नये आपल्या संघर्षाचा पवित्रा आपल्याला गोत्यात आणु शकतो.

व्यवसाय : स्पर्धा जास्त आल्यामुळे परिस्थिती समजुन तिला नियंत्रणात आणण्यात तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्यावर गोष्टी लवकरात लवकर साध्य करून घ्या महिन्याच्या शेवटी शनी वक्री होत असल्यामुळे त्या पुर्वी महत्त्वपुर्ण कामे केल्यास तुमच्यासाठी उत्तम राहील.खर्चावर नियंत्रण ठेवावेच लागेल.

कोर्ट कचेरी : या आघाडीवर हा महिना काहीसा प्रतिकुल आहे.या महिन्यात एखादी सुनावणी होईल परंतु ती तुमच्यासाठी अनुकुल नासर असुन त्यामुळे एखादे आर्थिक नुकसान होऊ शकते.तुमच्याकडील पुराव्यांच्या कमतरते अभावी समोरील पक्ष तुमच्यावर मात करू शकतो.

नातेसंबंध : नाती उत्तम स्थिती असल्यामुळे काही विशेष नाही पण छोट्या छोट्या गोष्टी सांभाळुन घ्याव्या लागतील रागावर नियंत्रण ठेवल्यास सगळ्या आघाड्यांवर तुम्हाला परिस्थिती नियंत्रणात आणता येईल.त्यामुळे जिभेवर साखर ठेवुन नाती जपल्यास कौटुंबिक आणि मानसिक सुख लाभेल.वेवाहिक सौख्य लाभेल त्यामुळे आनंदित असाल.

विद्यार्थी : अभ्यासातुन लक्ष उडवणारा काळ असला तरी प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्यास आणि मेहनत घेतल्यास यश मिळेल मित्र मंडळीसोबत झाल्येल्या वादाचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका.आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास उत्तम राहील.

वृश्चिक

ग्रहांची स्थिती : रवी षष्ट आणि पंचम स्थानातुन भ्रमण करणार आहे.महिन्याच्या उत्तरार्धा नंतर त्याची अनुकुलता लाभेल.द्वितीयात गुरु-शनी-केतु यांची युती होत असुन ती युती तुमच्यासाठी अनुकुल अशी आहे.पंचम आणि चतुर्थात होणारी बुध-शुक्राची युती सुद्धा अनुकुल ठरणार आहे.सप्तमातील मंगळ हा संमिश्र फलदायी आहे आणि अष्टमातील राहु सुद्धा उत्तम स्थितीत आहे.अधिकांश ग्रहांची अनुकुलता या महिन्यात जाणवत असल्यामुळे महिना प्रगतीकारकच राहील.योग्य ते निर्णय घेण्यासाठी अनुकुल असा काळ आहे.

आरोग्य : आरोग्याबाबतीत हा महिना संमिश्र फलदायी असणार आहे.कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची काळजी करण्याचे काही विशेष कारण नाही.आपल्या एखाद्या आजारावर लवकरात लवकर वैदयकीय उपचार घेतले असता गुरूच्या पाठबळा मुळे लवकर बरे होता होईल एकंदरीत तब्येती बाबतीत महिना संमिश्र असणार आहे वाहत असलेल्या उन्हापासुन स्वत:चे संरक्षण करून तब्येतीची काळजी घ्यावी.

आर्थिक : आर्थिक प्रगती उंचावणारा महीना असुन नवीन वर्षाच्या आगमनाने तुमच्यासाठी समृद्धी आणि संपन्नतेची दर उघडी केली आहे त्याच्या यथोचित सन्मान करावा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करून गुंतवणुकीचे योग्य पर्याय शोधावे.कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केलात तर ते हि मंजुर होऊ शकते.

नौकरी : नौकरीच्या बाबतीत काही बदल अपेक्षित आहेत आणि त्या बदलांमुळे तुम्हाला दिलासा वाटुन मानसिक समाधान मिळेल.कामाच्या ठिकाणी जर काही त्रास असेल तर तो आता नसणार आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करून काम्साठी बढती मिळण्यासाठी काहीसा अनुकुल काळ आहे त्यामुळे इथुन पुढचा काही काळ तुम्हाल प्रगती करण्यासाठी उत्तम असा काळ असणार आहे.

व्यवसाय : एकंदरीत ग्रहमान पाहता इतक्या दिवस असलेल्या दडपणातुन सुटका होईल.ज्या काही समस्या असतील त्याच्यासाठी यथायोग्य उपाययोजना राबवता येतील.भांडवलाची एखादी समस्या असेल तर ती सुद्धा दुर होऊन जाईल.एकंदरीत आतापर्यंत असलेल्या दडपणामुळे प्रगतीला जी खीळ बसली होती ती आता हळु हळु कमी होईल.

कोर्ट कचेरी  : जी काही प्रकरणे रखडली असतील ती आता या महिन्यात संपुन जाऊन सुटकेचा निश्वास सोडता येईल.काही बाबतीत तुमच्या मनासारखे घडणार नाही पण जे काही झाले आहे ते विसरून नव्याने कामाला लागता येईल.एखादे प्रकरण मिटवण्यासाठी आर्थिक खर्च अचानक वाढु शकतो आहे.

नातेसंबंध : चैत्राची सुरवात तुमच्यासाठी शांतता आणि सुसंवाद घेऊन येत आहे ,त्यामुळे मानसिक शांतात लाभेल घरातील काही वाद असतील तर ते मिटुन त्यातुन समाधानकारक गोष्टी घडतील.कुटुंबात सर्वांशी सुसंवाद घडेल आणि त्यामुळे नाती सुधारून दृढ होतील.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांनी अभ्यासात योग्य लक्ष देऊन तयारी केल्यास आपल्याला गुरु आणि शुक्राचे चांगले पाठबळ मिळत आहे.आपल्या कामगिरीमुळे शिक्षकांकडुन शाबासकीची थाप मिळेल पालक ही कौतुक करतील.आत्मविश्वास उंचावेल आणि पुढील कामगिरीसाठी तो लाभदायक ठरत आहे.

धनु

ग्रहांची स्थिती : रवी या महिन्यात चतुर्थात आणि पंचम स्थानातुन भ्रमण करत असल्यामुळे त्याची साथ काही मिळणार नाही राशीतच गुरु शनी केतु यांची होणारी युती काही अनुकुलता दर्शवित नाही अवघड वाट असणार आहे याची जाणीव देत आहे.तृतीय आणि चातुर्थातले भ्रमण बऱ्यापैकी दिलासा देणारे ठरणार आहे.षष्टातील मंगळ हा अनुकुल असुन सप्तमातील राहु त्रासदायक ठरणार आहे.हा महिना बऱ्यापैकी संमिश्र फलदायी असणार असुन काही काळ समस्याची तीव्रता प्रकर्षाने जाणवुन देणारा असा महिना राहील.

आरोग्य : ग्रहांची एकंदरीत स्थिती पाहता तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही योग्य ती काळजी घ्यावी.योग्य काळजी घेतल्यास लवकरात लवकर बरे होण्यासारखी परिस्थिती आहे त्यामुळे योग्य काळजी घेऊन स्वतचे आजारांपासुन संरक्षण करावे.घरातील मंडळी च्या तब्येतीकडे सुद्धा विशेष लक्ष द्यावे लागेल.योग्य आहार आणि योग्य विश्राम केल्यास तब्येत सुधारेल.

आर्थिक : आर्थिक चित्र काहीसे विदारक व विकृत असणार आहे.एखाद्या वैद्यकीय खर्चाला अचानकपणे सामोरे जावे लागु शकते.आणि त्याहीपेक्षा एखादा खर्च दत्त म्हणुन उभा राहील.एकंदरिक खर्चाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविणारा महिना राहणार आहे.त्यामुळे कर्ज घेण्याची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते.कोणाकडुन ही उसनवारी टाळा महिन्याच्या अखेरीस काही आशादायक चित्र नक्कीच दिसुन येईल.

नौकरी : आपण भले आणि आपले काम भले अशी स्थिती आहे त्यामुळे आपल्या कामाचे कौतुक झाले नाही किंवा आपल्याकडे वरिष्ठांचे लक्ष जरी नसले तरी आपल्या कामात आपण कमी पडु नये.कार्यालयीन राजकारणाचा त्रास आपणास होऊ शकतो त्यामुळे आपला पवित्र सावध ठेवावा.कामाचे आणि वेळेचे योग्य नियोजन करावे.

व्यवसाय : व्यवसायिकासाठी हा महिना उन्हाळ्याच्या उन्हाच्या उष्णतेप्रमाणे असणार असुन सर्व बाजुनी कोंडी होण्याची शक्यता संभवते आहे.जी काही बचत किवा गुंतवणुक असेल त्याचे प्रमाण लक्षात घेऊन पुढील पाऊले सावधगिरीने उचलावीत.भांडवलाची चिंता निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी मित्रांकडे मदत मागण्याची सुद्धा वेळ येऊ शकते.

कोर्ट कचेरी  : एखाद्या प्रकरणात पैसा घालून सुद्धा योग्य त्यातुन योग्य ते फळ न मिळाल्यामुळे निरास होऊ शकते आहे.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर काही कामे सुरु केल्यास यश पदरी पडण्याची शक्यता आहे.

नातेसंबंध : नात्यांमध्ये कटुता येत असेल तर वेळीच मिटवावी लागेल.नात्यामध्ये तुमच्या बोलण्यामुळे काही मतभेद होऊ शकतात पण वेळीच वाद मिटवण्यात सध्या तरी यश मिळणार नाही त्यामुळे थोडा वेळ जाऊ दिल्यास अपोआप काही गोष्टींना उपाय सापडतील.परंतु कुटुंबाला यथायोग्य वेळ देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या विषयी कटुता निर्माण होणार नाही.जोडीदाराकडुन आणि तुमच्या एकंदरीत ग्रहस्थिती मुळे योग्य अशी साथ लाभणार नाही.

विद्यार्थी : आपल्या ऐखाद्या निकालामुळे निराशा येऊ शकते पण त्यावर मात करून जर पुढे गेलात तर यश मिळवता येण्याशी शक्यता नाकारता येणार नाही कठोर मेहनत आणि संघर्ष याशिवाय या महिन्यात पर्याय नसणार आहे.शिक्षकांशी होणारा वाद टाळा.

मकर

ग्रहांची स्थिती : रवी तृतीय आणि चतुर्थ स्थानातुन भ्रमण करणार असुन महिन्याचा बरचसा काळ हा अनुकुल असणार आहे.द्वितीयात आणि तृतीयात बुध आणि शुक्राची होणारी युती ही सुखदकारक असणार आहे.पंचमातील मंगळ ताण वाढविणारा राहील.षष्ठातील राहु सुद्धा अनुकुल स्थितीत आहे.व्येय स्थानात शनी-केतु-गुरु घडत असुन यांची सुद्धा काही अनुकुलता लाभत नाहीये पण फक्त काही काळासाठी कारण नंतर यांची युती मार्ग दाखवत आहे.

आरोग्य : या महिन्यात शारिरीक आरोग्याबाबतीत काहीच तक्रारी नसणार आहेत.त्यामुळे या बाबतीत चिंता करावयाचे काही कारण नाही.परंतु कुटुंबातील सर्व सदस्यांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.आणि कदाचित त्यामुळे तुम्हाला स्वत:चे मानसिक आरोग्य जपावे लागेल.मानसिक ताणतणावा पासुन दुर राहणे योग्य ठरेल त्यासाठी ध्यान धारणा केली तर उत्तम फळे मिळतील.

आर्थिक : आर्थिक आघाडी या महिन्यात जेमतेम असणार आहे.आर्थिक आवक कमी आणि जावक जास्त असणार आहे शक्य तितके खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा एखाद्या अकल्पित येणाऱ्या खर्चाला सामोरे जावे लागु शकते.आर्थिक विवंचनेत सुद्धा काळात कर्ज घेण्याचे टाळा त्यामुळे कायमचे ऋणी व्हाल अशी स्थिती निर्माण होत आहे.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती काहीशी नियंत्रणात येणार आहे.

नौकरी : संमिश्रदायी असा महिना असणार आहे.तुमच्या विरोधात काही कारवाया जरी होत असतील तरी तुमच्या कामामुळे तुमची विरोधकांना चोख उत्तर देऊ शकाल त्यामुळे काळजी नसावी.वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित केल्यास इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला काही अंशी प्रगतीची दालने खुली होऊ शकतात.

व्यवसाय :व्यवसायिकांसाठी हा महिना काहीसा प्रतिकुल ठरणार असुन त्यांनी कुठलाही व्यवहार करताना जरा जपुन केल्यास त्यांच्यासाठी फायद्याचे राहील.त्याचप्रमाणे कुठलीही मोठी झेप घेण्याआगोदर त्यातील तुमच्या व्यवसायाची सावधनता सांभाळुन घ्या.योग्य ठिकाणी योग्य गुंतवणुक केल्यास पुढील काही काळासाठी चिंता करण्याचे काही कारण राहणार नाही.

कोर्ट कचेरी : कायदेशीर बाबी शक्य तितक्या कोर्टाबाहेर सोडवण्याचा प्रयत्न करा.या महिन्यात आपल्याला आपली बाजु ठाम पणे मांडण्यात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो काम शक्य तितक्या पुढे ठकलावे जेणेकरून आपल्याला हवे ते योग्य पुरावे गोळा करता येतील आणि आपली बाजु ठामपणे मांडता येईल.

नातेसंबंध : या बाबतीत आपल्याला परीस्थित सांभाळुन घ्यावी लागणार आहे.थोड्या फार कुरबुरी किंवा वादाचे प्रसंग उद्भवतील सगळ्या परिस्थितीला तुमच्या कौशल्याने हाताळल्यास सगळे काही आटोक्यात येईल.कुटुंबासोबत पुरेपुर वेळ घालवल्यास त्यांची बाजु समजून घेता येईल.मुलांसोबत वेळ घालवा त्याने बऱ्यापैकी वातावरणात शांतात निर्माण होईल.जोडीदारा सोबत काही गैरसमज होऊ शकतात त्यास तत्काळ दुर करून नात्यात जवळीकता कायम ठेवा.

विद्यार्थी : परीक्षेचा काळ असल्याने इतर लक्षवेधक प्रवृत्तीमुळे अभ्यासातले लक्ष न लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे अभ्यास हेच एक ध्येय ठेवल्यास आणि कठोर मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नसणार हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन अभ्यास करावा.पालकांनी पाल्यांच्या अभ्यासाकडे आणि त्यांच्या मानसिकतेकडे यथा योग्य लक्ष द्यावे.

कुंभ

ग्रहांची स्थिती : रवी द्वितीय आणि तृतीय  स्थानातुन भ्रमण करणार महिन्याच्या मध्यानंतर अनुकुल अशी परिस्थिती राहील.तुमच्या राशीत होणारी  बुध-शुक्र ची युती होत असुन बुध हा जरी लाभकारक नसला तरी शुक्र मात्र तुमच्यासाठी लाभकारक आहे.चतुर्थातला मंगळ हा काही शुभ संकेतांकडे लक्ष देत नाहीये आणि पंचमातला राहु हि या बाबतीत त्याला साथ देत आहे.लाभत घडणारी गुरु-केतु-शनी युती ही तुम्हाला बऱ्यापेकी लाभकारक ठरत आहे.एकंदरीत महिना सुस्थितीत असणार आहे.

आरोग्य : आगामी नवीन वर्षात तुमची तब्येत ठणठणीत राहील पण महिन्याच्या मध्यानंतर उन्हाच्या कडाक्याने तब्येत जपावी उन्हाळी आजार,किंवा संसर्ग जन्य रोगांपासुन स्वत:ला जपा.घरातील मंडळींच्या तब्येतीची काळजी करायचे काही कारण नाही.स्वतः च्या तब्येतीला जपा योग्य ती काळजी घ्या.

आर्थिक : चैत्राची आर्थिक सुरवात सुखावणारी राहील.ग्रह आपल्यासाठी उत्तम स्थितीत आहे त्यामुळे आर्थिक आलेख प्रगतीकारक राहील.नवीन वर्षाच्या सुरवातील प्रगतीचा हा चढता आलेख वर्षभरासाठी सौख्य समृद्धीची नांदी घेऊन येत आहे.ज्यात-कशात ही गुंतवणुक कराल त्यातुन धन लाभ होईल आणि मनासारखी बचत हि करता येईल.मानसिक समाधान देणारा महीना ठरणार हे नक्की.

नौकरी : नौकरी च्या ठिकाणी कामाची प्रांशसा होईल कुठल्याही विघ्नाशिवाय आनंदाने काम करता येईल तुमच्या कामा मुळे तुमचे शत्रु नामोहर होतील.पण तरी तुमच्या प्रगतीचा चढता आलेख पाहुन तुमच्या सहकाऱ्या मध्ये असुरक्षितता निर्माण होऊ शकते.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्यासाठी उत्तम असे वातावरण आहे.आणि शेवटच्या आठवड्यात परिस्थिती जराशी बदलु शकते आहे.आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर गोडी असल्यास परिस्थिती आटोक्यात येईल.

व्यवसाय : ग्रहमान शुभ फलदायी आणि लाभकारक महिना ठरवत आहेत.कुठलेही काम घ्या यश तुमचेच अशी अनुभुती आली तर वावग ठरणार नाही यशाने परिपुर्ण असा हा महिना आहे.आपल्या कामामुळे स्पर्धकांसोबत असलेली स्पर्धा वाढेल आणि तुमच्या यशामुळे असुया वाढीस लागेल.त्यामुळे येणाऱ्या ताणाचे योग्य नियोजन करून ती शक्ती कामाकडे वळवावी.

कोर्ट कचेरी : आपल्या खटल्या बाबतीत प्रगतीकारक महिना असणार आहे.आपल्या मागील काही काळापास न रखडलेल्या कामना यथा योग्य गती येईल.एखादे आर्थिक प्रकरण असेल तर त्यात तुम्हाला फायदा होईल हे नक्की.आपण अजुन प्रयत्न केल्यास सर्व बाबीमधुन आपली सुटका होऊ शकते.

नातेसंबंध : चैत्राचा महिना आनंददायी ठरणार आहे.कुटुंबातील मंडळीकडुन कौटुंबिक सौख्याचा पुरेपुर आनंद घ्याल.एखादे कार्य किंवा समारंभ होऊ शकतो त्यामुळे कुटुंबातील मंडळीसोबत वेळ घालवता येईल.मुलांकडुन आज्ञाधारक वृत्तीचे पालन होईल.आपल्या मनासारखी सुखावणारी वागणुक आपणास मिळेल.जोडीदारा कडुन सहवास आणि आनंद मिळेल.

विद्यार्थी : आपल्या कामगिरी मुळे मनासारखे यश मिळेल.आपल्याला हव्या त्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाल्या मुळे पुढील वाटचालीसाठी आपल्याला अजुन मेहनत घ्यावी लागणार आहे मोठ्या स्वप्नांसाठी मेहनत पण खुप घ्यावी लागते त्याच प्रमाणे. पालकांनी पाल्यांना योग्य ते पाठबळ पुरवावे.

मीन

ग्रहांची स्थिती : रवी या महिन्यात द्वितीय आणि प्रथम स्थानातुन भ्रमण करणार आहे यावेळेस रवी तुम्हाला साथ देईल असे वाटत नाही.तृतीयातला मंगळ उत्तम स्थिती दर्शवित आहे.आणि त्याच्या विपरित राहु एखाद्या प्रकरणा बाबतीत नाहक स्थगिती आणु शकतो.दशमात होणारी गुरु-शनी-केतु- यांची युती ही काहीशी प्रतिकुलच असणार आहे.आणि व्येयातील बुध-शुक्र युती महिन्याच्या मध्यानंतर तुमच्यासाठी अनुकुल असणार आहे.महिना खाचखळग्यांचा असणार आहे त्यामुळे वाटचाल करताना जरा जपुन आणि विचारपूर्वक करावी.महिन्याच्या मध्या नंतर बऱ्यापैकी परिस्थिती तुमच्या बाजुने नियंत्रणात येईल.

आरोग्य : या महिन्यात प्रकृतीच्या बाबतीत काही विशेष तक्रारी जाणवणार नाहीत.मंगळाचे पाठबळ आरोग्यास उत्तम ठरणार असुन आरोग्यावर कुठल्याही प्रकारचा विपरित परिणाम होणार नाही.योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास काळजी चे काही कारण नाही.आपल्या कामाचा प्रभाव आपल्या शरीरावर पडु देऊ नका.कुठल्याही त्रासाला तुमच्या मनोबलाने सामोरे गेल्यास प्रतिकारशक्ती पण साथ देईल.

आर्थिक : आर्थिक जबाबदारी वाढेल जे काही उत्पन्न वाढीस लागेल त्याच बरोबर खर्च पण वाढीस लागतील त्यामुळे व्यवहार करताना जरा जपुन खर्च केलात तर हाती काही उरेल.एखादा अचानक खर्च उद्भवू शकतो त्यामुळे आपल नियोजन पाहुन खर्च केला तर उत्तम राहील.

नौकरी  : आपल्या चांगल्या कामाचे फळ आपल्याला मिळता मिळता आपल्या हातातुन निघुन जाईल अशी स्थिती आहे.तरीसुद्धा वरिष्ठा ची मर्जी राखल्यास पुढील कळत तुमच्या कामाची दखल घेऊन योग्य तो मोबदला नक्कीच मिळेल.चालु काळात वरिष्ठा च्या मर्जीविरुद्ध जाऊ नका तुमच्या विरोधात कार्यालायातील छुपे राजकारण फोवावू शकते तरी त्याची काळजी घ्यावी.

व्यवसाय : जेमतेम अशी परिस्थिती या महिन्यात असणार आहे.सध्या मार्च एंड चा टप्पा संपल्यामुळे बाजारात जराशी शितीलता राहील आपणास हवी तशी आर्थिक उलाढाल होणार नाही.नवीन काही योजना असतील तर काही काळ वाट बघून त्यावर विचार विनिमय करून योग्य वेळी त्याची अंमलबजावणी करावी.

कोर्ट कचेरी : शक्य असल्यास कोर्टा बाहेर तडजोड करण्याचा प्रयत्न ठेवा आणि त्यात यश मिळवण्याचा प्रयत्न करा.घटना तुम्हाला अनुकुल अश्या घडणार नाही त्यामुळे तुमची बाजु खरी असुनही तुमच्या बाजूचा विचार केल्या जाण्याची शक्यता कमी आहे.

नातेसंबंध : कुटुंबातील काही मंडळी अचानकपणे नवीन प्रश्न निर्माण करतील जेणेकरून कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतो.कुटुंबात विसंवाद निर्माण होऊ देऊ नका शक्य तितका संवाद साधण्याचा आणि वेळ देण्याचा प्रयत्न करा.एखादी खरेदी किवा छोटासा प्रवास संबंधा मध्ये सुधार आणु शकतो.जोडीदाराकडुन बऱ्या पेकी उत्तम साथ मिळेल.पण त्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांनी येणाऱ्या आगामी परीक्षांवर लक्षपुर्वक लक्ष देणे आणि तसेच कठोर म्हेनात करणे हेच त्यांच्या हातात राहील.इतर कुठल्याही गोष्टीकडे वाज्विपेखा लक्ष देऊ नये.आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश तुमचेच आहे.पालकांनी पाल्यांच्या मनस्थितीकडे जाणीवपुर्वक लक्ष द्यावे.

!!!!! शुभम भवतु !!!!!