ग्रहणवेध : विश्वाला की मनाला ?
Annular Solar Eclipse: Astrological Significance
सुर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण या खगोलशास्त्रीय घटना मानवी जीवनासाठी व पृथ्वीसाठी अनन्यसाधारण अश्या घटना असतात याचे दुरगामी परिणाम जाणवतात.हि ग्रहणे नैसर्गिक हानी आणि इतर आपत्तीची सुचना देणारे महत्त्वाचे घटक असतात. नैसर्गिक आपत्ती जसे कि भुकंप ,धुमकेतु , भुस्खलन,ज्वालामुखी ,पुर त्यामुळे हिंसाचार आणि सामाजिक उद्रेकाला हि ग्रहण आमंत्रण देतात.फार अगोदर प्रसिद्ध अभ्यासक तथा विख्यात ज्योतिषि वरमिहीरांनी त्यांच्या बृहत संहितेत ग्रहणांचे स्पष्ट सदर्भ दिलेले आहेत.
ग्रहणांचे भुभागावर,विशिष्ट समुहावर,मानवावर होणारा परिणाम अधोरेखित केला आहे.मागील सूर्यग्रहण २६ डिसेंबर २०१९ रोजी घडले होते जगाच्या बहुतेक देशांमध्ये या ग्रहणांची दृश्य मानता होती.राशीचक्राच्या धनु राशीच्या मुळ नक्षत्रावर हे ग्रहण सिद्ध झाले होते,त्यावेळची एक दुर्लभ स्थिती सुर्य,चंद्र,बुध,केतु, आणि गुरु हे सर्व धनु राशीत आणि यांच्या समोर प्रतियोगात राहु होता.या ग्रहणाचे अतिशय दुरगामी परिणाम आज संपुर्ण जग भोगत आहे.वैश्विक महामारी,वैश्विक महामंदी आणि मृत्युचे तांडव या घटनांना सामोरे जात आहेत.ग्रहणाची तीव्रता आणि परिणाम वेगळे का दर्शवावे.हाताच्या कंगनाला आरसा कशाला ?येणाऱ्या २१ जुन ला पुन्हा एकदा सुर्य ग्रहणाला सामोरे जावे लागत आहे.हे ग्रहण मिथुन राशी आर्द्रा नक्षत्रात घडणार आहे.
२०२० चे पहिले सुर्य ग्रहण शके १९४२ शर्वरी नामसंवत्सर जेव्हा कृष्ण अमावस्या रविवारी २१ जुन २०२० रोजी होत आहे.हे ग्रहण कंकणाकृती सुर्य ग्रहण आहे भारता सह संपुर्ण आशिया ,आफ्रिका दक्षिण युरोप आणि उत्तर ऑस्ट्रेलियात हे ग्रहण दिसणार आहे.भारतात हे ग्रहण काही भागात कंकणाकृती तर काही भागात खंडग्रास स्वरुपात दिसेल.हे ग्रहण दिवसाच्या दुसऱ्या प्रहरात असुन सकाळी १०.०१ ला स्पर्श होईल तर ग्रहणाचा मध्य सकाळी ११.३९ ला होईल ग्रहणाची समाप्ती दुपारी १.२८ मिनिटांनी होईल.ग्रहणा मध्ये कंकणा कृती अवस्था फक्त ४० सेकांत ते एक मिनिट दिसणार आहे.कंकणाकृती व खंडग्रास सुर्य ग्रहण ग्रहणाचा विशेष चष्मा घालुन पहावे.सुर्याची प्रखर किरणे डोळ्या पर्यंत पोहचु नयेत.
ग्रहणाच्या वेळेस सुर्य व चंद्र मृग नक्षत्रातुन आर्द्रानक्षत्रात प्रवेश करत आहे.२१ जुन हा दिवस वर्षातील सगळ्यात मोठा दिवस असतो.बऱ्याच दिवसानंतर किंबहुना बहुतेक १०० वर्षानंतर दोन चंद्र ग्रहण व एक सुर्य ग्रहण १ महिन्याच्या अंतरात घडते आहे.त्यामुळे ज्योतिष शास्त्रीय अभ्यासानुसार ह्याचा दुरगामी परिणाम पर्यावरण पृथ्वी ,अंतराळ, व मानवी जीवनावर नक्कीच होणार आहे.विज्ञानाच्यादृष्टीकोनातुन ग्रहणे खगोलशास्त्रीय घटना असतात.सूर्यग्रहणाच्या खगोल शास्त्रीय मिमांसेतुन सुर्य ,चंद्र,आणि पृथ्वी एक विशिष्ट समकक्षेत येतात.ज्यामुळे पृथ्वीवरून सुर्य हा कंकणा कृती किंवा खंडग्रास स्वरुपात दिसतो.चंद्र सुर्याचे कंकण अडवतो.त्यामुळे पृथ्वीवरून सुर्याचे बिंब चंद्राने झाकल्याने सुर्याचे बिंब आपल्याला ग्रहण असे दिसते.याला इंग्रजीत Ring of Fire म्हणतात.
सुर्य ग्रहणाविषयी पुर्वापार काही रूढी व परंपरा असुन काही अंधश्रद्धा हि ग्रहणाशी निगडीत आहे.मात्र वैज्ञानिक,खगोल शास्त्रीय व ज्योतिष शास्त्रीय दृष्टीकोनातुन ग्रहणाचा वेध घेतल्यास बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल.संशोधन व अभ्यासातुन एक मंथन जागृत होते.आपल्या पुर्वासुरींनी पार वैदिक काळापासुन ह्याचा सखोल अभ्यास करून ठेवला आहे.
ज्योतिष शास्त्रीय परिघातुन या ग्रहणाकडे पाहिल्यास हे ग्रहण मिथुन राशीत मृग व आर्द्रानक्षत्री घडत आहे.ह्या ग्रहणाचे दुरगामी परिणाम होणार असुन राजकीय,सामाजिक व पर्यावरणीय उलथा पालथींना सामोरे जावे लागेल.आर्थिक चक्र विस्कळीत होईल,वादळ,वावटळ, भुकंप,पुर आदी नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल.
या ग्रहण काळात गुरु व शनी वक्री आहेत.भारताला शेजारील राष्ट्राकडुन तणावाला सामोरे जावे लागेल.सध्या वर्षा ऋतु सुरु असल्यामुळे नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढेल मुसळधार पाऊस व पुर परिस्थितीला सामोरे जावे लागेल.सध्या वैश्विक महामारीने संपुर्ण विश्वाला व्यापले आहे.लोकांनी सव्यंशिस्त पाळली नाही तर ही महामारी अनियंत्रित होऊ शकते.संसर्ग व बळी दोन्हीचे प्रमाण वाढेल.सुर्य कर्केत आल्यावर थोडा दिलासा मिळेल.सुर्य सिंह राशीत आल्यावर प्रचंड दिलासा मिळेल.विषाणुचे उच्चाटन दृष्टी क्षेपात येईल अथवा लस संशोधनाला यश मिळेल.
तसे पहिले असता ग्रहण शुभत्व देत नसते.त्यावर जर एका महिन्यात ३ ग्रहणे असतील तर ही बाब खगोलशास्त्रीय दृष्ट्या अभ्यासनीय जरी असली तरी ज्योतिष विद्या अभ्यास नुसार ही बाब चिंता उत्पन्न करणारी असु शकते आहे.संपुर्ण विश्वाला प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागेल.अनेक ठिकाणी अराजकता माजेल हिंसात्मक घटना अमानवीय घटनांना सामोरे जाण्याचे संकेत आहे.अनेक देशात राजकीय पातळीवर उलथा पालथीला सामोरे जावे लागेल.
ग्रहण मिथुन राशीत घडत असुन मंगळ हा ग्रह मीन राशीत आहे.ग्रहणाच्या तीन दिवसापुर्वी म्हणजे १८ जुन ला मीन राशीत प्रवेश कर्ता झळाळ आहे या मंगळाची दृष्टी रवी,चंद्र,राहु,बुधावर पडणार आहे.मंगळाची हि दृष्टी त्रासदायक असुन अनेक आपत्तींमध्ये वाढ करणारी राहील.काही आपत्ती या नैसर्गिक राहतील तर काही मानव निर्मित त्याचदरम्यान शनी,गुरु, शुक्र हे ग्रह वक्री अवस्थेत आहेत.ही ग्रहदशा संपुर्ण मानवी जीवनात तसेच जगात प्रचंड उलथा पालथ घडविणारी राहील.वैयक्तिक पातळीवर त्या ग्रहणाचे परिणाम त्या त्या राशीनुसार होणार आहेत.ग्रहकाळात शक्यतो अन्न बनविणे,अन्न सेवन,जल प्राशान करणे आदी परंपरे नुसार वर्ज्य असे सांगितले जाते.तसे पहिले तर या मागचे सूत्र अतिशय वैज्ञानिक आहे.पृथ्वी ग्रह तारे आदींचे मानवी जीवनावर सखोल परिणाम होत असते.त्यामुळे ब्राम्हंडत घडणाऱ्या घटनेचे प्रतिबिंब मानवी जीवनावर होत असते.सुर्य ग्रहणात चुंबकीय लहरी व अतिनील किरणे उच्च प्रमाणात पोहचतात त्याच बरोबर आपले जैविक चलनवलन अर्थात Metabolism व पचन क्रिया मंदावते.त्यामुळे ह्या काळात अन्न सेवन करू नये असे सांगितले जाते.ह्या मागचे कारण अतिशय वैज्ञानिक आहे.त्याच बरोबर ह्याला अपवाद आहे जसे कि रुग्ण,वृद्ध व्यक्ती व गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी सात्विक आहार घ्यावा जो पचावयास हलका असतो मुगाचे सुप,मुगाची खिचडी असा हलका आहार घ्यावा.मनशांती साठी ध्यान धारणा करावी अध्यात्मिक अधिष्ठान उर्जा वाढविणारे असते.ग्रहण पर्व कळत घेतलेल्या सर्व मंत्रांचे पठन करावे,अध्यात्मिक ग्रंथ वाचावे,ह्या द्वारे उर्जा संवर्धन व संकलन होते दिव्य अनुभूती प्राप्त होते.ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे पर्व काळात जप अधिष्ठान तर्पण श्राद्ध हवन दान धर्म ज्याला जसे शक्य असेल तसे करावे.ग्रहण मोक्षा नंतर परत स्नान करावे स्नान करतना गंगा नर्मदा आदी नद्यांचे स्मरण करावे.ह्या स्नान कर्माने फक्त देहाचीच नाही तर आत्मा शुद्धी होते व जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण उर्जावान होतो.
!!! शुभम भवतु !!!