इसवीसन २०१८,अर्थात विक्रम संवत २०७४,शके १९४०, विलंबी नामसंवत्सर,दक्षिणायन वर्षा ऋतु,वर्षातील इंग्रजी सप्टेंबर महिना, हा दोन मराठी मासात विभागला गेला आहे.९ सप्टेंबर पर्यंत श्रावण कृष्ण पक्ष राहील तर १० सप्टेंबर पासुन भाद्रपद शुक्ल पक्ष सुरु होईल.या महिन्याचे वैशिष्टय म्हणजे श्रावण महिना सरता सरता असलेले सण तसेच भाद्रपदात होणारे गणपतीचे आगमन तसेच,भाद्रपद कृष्ण पक्षातील पितृ पक्षांचे महात्म्य, अशा विविध सणवारांनी आणि विशेष घटनांनी हा महिना आकार घेत आहे.त्याचप्रमाणे श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्णजन्माष्टमी किंवा कालाष्टमी असे म्हणतात.श्रावण कृष्ण एकादशीला अजा एकादशी असे म्हणतात.अजा एकादशी च्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होत आहे,या योगाचा पुण्य काळ दुपारी ३.१४ पासुन ते सुर्योदया पर्यंत आहे.आणि श्रावण कृष्ण अमावास्या म्हणजे पोळा अर्थात वृषभ पुजन,हा ही महत्त्वाचा सण भारतीय कृषी परंपरेनुसार वृषभांच्या श्रमाप्रती कृतज्ञ होण्याचा दिवस असुन,या सणाने श्रावण महिन्याची सांगता होत आहे. १० सप्टेंबर पासुन भाद्रपद शुक्ल पक्षाची सुरवात होत आहे. तसेच ११ सप्टेंबरला इस्लाम धर्मातील हिजरी सण १४४०, मोहरम महिना आरंभ होत आहे.भाद्रपद शुक्र तृतीया म्हणजेच हरितालिका पुजन होय,ह्याच दिवशी स्वर्णगौरी व्रत करतात.श्री गणेश हा ज्ञान-दाता आणि संकट-मोचक असल्यामुळे,श्री गणेशाची उपासना आणि आराधना म्हणजेच,ज्ञानयज्ञ सारखे पुण्य प्राप्त करण्याची प्रचीती होय,त्यासाठीच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पुजन, ज्ञानासहित संकटातुन मुक्त होण्याचा एक प्रशस्त असा समारोह होय.भाद्रपद शुक्ल पंचमीला ऋषी पंचमी असे म्हणतात. ह्याच दिवशी जैन धर्मातील, जैन संवत्सरी साजरी करण्यात येते. यालाच क्षमायाचना पर्व असे म्हणतात.भाद्रपद शुक्ल षष्टी ला गौरींचे आगमन होते ह्या दिवशी सुर्य षष्टी, आणि बलराम जयंती साजरी करण्यात येते.भाद्रपद शुक्ल सप्तमी या दिवशी घरोघरी गौरींचे पुजन, आणि जेवण करण्यात येते. या सप्तमीला भानु सप्तमी असेही म्हणतात. तसेच अष्टमीला गौरी विसर्जन करण्यात येते. या अष्टमीला दुर्गा अष्टमी असे म्हणतात,त्यानंतर येणारी नवमी, अदुख: नवमी म्हणुन साजरी करण्यात येते,भाद्रपद शुक्ल एकादशीला, परिवर्तनीय एकादशी असे म्हणतात.अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचे विसर्जन झाले, कि पितृपक्षाची होणारी सुरवात हा भारतीय परंपरेतील एक महत्त्वाचा आणि मोक्षदायी पर्व आहे. श्री गणरायांचे मंगल आगमन त्याच बरोबर गौरींचे पुजन आणि विसर्जन आणि त्यानंतर येणाऱ्या पितृपक्षातील श्राद्ध-कर्म हे उत्पत्ती,स्थिती आणि लय ह्या त्रिगुणात्मक त्रिपुटीशी, समन्वय साधुन देणारा, असा पवित्र कालखंड होय.भाद्रपद महिन्यातील अगदी महत्त्वपुर्ण घटना म्हणजे शनी ग्रहाचे मार्गी होणे होय.६ सप्टेंबरला शनी, धनु राशीतील मुळ नक्षत्राच्या तृतीय चरणात मार्गी होत आहे.हा या महिन्यातील सगळ्यात महत्त्वाचा ग्रह बदल अस निश्चित म्हणता येईल.तसेच ह्या महिन्यातील महत्त्वाचा ग्रहयोग म्हणजे १ सप्टेंबरला रात्री ११.०१ मिनिटांनी शुक्राचा तुळ राशीतील प्रवेश म्हणजेच शुक्राचे भ्रमण हे जवळपास संपूर्ण महिनाभर गुरु बरोबर तुळ राशीत राहणार आहे.दुसरी महत्त्वाची खगोलीय घटना, म्हणजे १० सप्टेंबर रोजी बुध हा ग्रह अस्तंगत होणार आहे. अस्तंगत म्हणजे सूर्याच्या अगदी जवळ असणारा २१ सप्टेंबर ला रवी आणि बुध या ग्रहांची अंशात्मक युती कन्या रशीत घडत असुन यालाच बुधादित्य योग म्हणतात.
!! शुभम भवतु !!