वक्री ग्रहांचे भ्रमण

वैशाख कृष्ण पक्षात एकापाठोपाठ तीन ग्रह वक्री होत आहेत.ज्योतिष्यशास्त्रा नुसार या तीन ग्रहांच वक्री होण हा एक दुर्मिळ योग गठीत झाला आहे.हे ग्रह वक्री होण म्हणजे सद्य स्थितीत मोठा बदल होण्याचे स्पष्ट संकेत असु शकतात,हे बदल नक्कीच काही प्रमाणात शुभत्त्व तर बहुतांशी अरिष्ट सुचक असतात.तीन ग्रहांपैकी पहिला ग्रह म्हणजे शनि.

शनि

शनि हा ग्रह ११ मे २०२० रोजी सकाळी ९.२७ मिनिटांनी मकर राशीत वक्री भ्रमण करणार आहे.शनिची हि वक्री अवस्था १४२ दिवसांची असुन २९ सप्टेंबर ला पुन्हा मार्गी होईल.या वक्री होण्याचे वैशिष्ट्य असे आहे कि शनि स्व राशीत आणि रवीच्या नक्षत्री उत्तर आषाढ च्या चौथ्या चरणी वक्री होत आहे.

शुक्र

१३ मे २०२० दुपारी १२.१२ मिनिटाला शुक्र स्व राशीत म्हणजे वृषभेत वक्री होत आहे.शुक्राची हि अवस्था जुन पर्यंत राहणार आहे.

गुरु

देव गुरु बृहस्पती अर्थात गुरु ग्रह त्याच्या नीच राशीत मकर राशीत १४ मे २०२० रोजी सायंकाळी ७.५८ मिनिटांनी वक्री होत आहे.गुरु चे वक्री भ्रमण १३ सप्टेंबर २०२० पर्यंत राहील.

ग्रह वक्री होतात म्हणजे नेमके काय होते ???

ग्रहांचे वक्री होणे एक खगोलशास्त्रीय स्थिती असते.वक्री होणे म्हणजे मागे जाणे पण प्रत्यक्षात ग्रह मागे जात नाही तर ते तसे भासमान होतात.याचे कारण पृथ्वीच्या अक्षाजवळ ग्रह आलेले असतात.म्हणजे रेल्वे चालु असताना झाडे मागे जातांना दिसतात,तशीच भासमान स्थिती दिसुन येते.मूळ नऊ ग्रहांपैकी राहु-केतु वगळता सात ग्रह आपल्या ठराविक मार्गाने गतीने पुढे पुढे मार्गस्थ होत भ्रमण करीत असतात.पण चंद्र आणि रवी कधीच वक्री होत नाही आणि बाकी पाच ग्रह हे वक्री होतात.अशा या वक्री ग्रहांचे फळ नेहमीच्या फळांपेक्षा निश्चितच वेगळे असते.अशा या पाच ग्रहांपैकी तीन ग्रह सध्या वक्री आहेत आणि ते म्हणजे शनि शुक्र आणि गुरु.ग्रह गोचरीने वक्री होतो तेव्हा तो सद्य स्थितीत अशुभ होण्याचे संकेत देतो.काही बदल शुभत्व दर्शवितात तर काही बदल अनिष्ट सुचक असतात.

राशी निहाय वक्री ग्रहांची फलिते पुढीलप्रमाणे आहेत.

मेष 

मेषेच्या धनस्थानात शुक्र वक्री होत असुन गुरु आणि शनि हे दशम स्थानात वक्री होत आहे.मेष राशीच्या जातकांसाठी आर्थिक अडचणी आणि अस्थिरतेला सामोरे जावे लागेल.तसेच पारिवारिक संबंधा मध्ये वितुष्ट आणि गृह कलहाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.या दरम्यान वाणी वर नियंत्रण ठेवावे.खाण्या पिण्याच्या बाबतीत काही नियम पाळावे.आरोग्य सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सुर्यनमस्कार आणि शितली प्राणायाम करावे.

गुरु आणि शनि दशमात वक्री होत असल्यामुळे अनिश्चितता व अस्थिरता प्राप्त होऊ शकते.सद्य स्थितीत नौकरी सोडु नये ती टिकवावी अस्थिर निर्णय घेऊ नये.कर्ज घ्यावयाचे किवा द्यावयाचे असल्यास त्यात  नियोजन बद्धता असावी आणि दक्षता बाळगावी.

वृषभ 

शुक्र स्वतःच्या च राशीत वक्री होत असुन गुरु शनि भाग्य स्थानात वक्री होत आहे.स्वतःच्या स्वभावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.नसते साहस करू नये सुसंवाद कायम ठेवावा पत्नीशी वाद घालु नये.भाग्य स्थानातील गुरु शनि मानसिक चिंतेत वाढ करतील. आरोग्य आणि ताण तणाव संतुलित राखण्यासाठी अनुलोम-विलोम प्राणायाम आणि मंडूकासन करावे.

पद प्रतिष्ठा जपावी भावनेच्या आवेगात येऊन कुठलाही निर्णय घेऊ नये सामंजस्याने गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करावा.अध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष द्यावे आर्थिक बाबींमध्ये नियोजन बद्ध वाटचाल करावी.आगामी काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढे मार्गक्रमण करावे.आत्यंतिक निकड असल्याशिवाय कर्ज घेऊ नये शक्य तोवर कर्ज घेणे टाळावे.

मिथुन

मिथुनेत शुक्र व्येय स्थानी आणि गुरु शनि हे अष्टमात वक्री होत असुन हि रस या वक्री ग्रहाच्या जास्त सान्नीध्यात येणार असुन या राशीच्या जातकांनी अष्टावधानी असणे गरजेचे आहे.आपल्या आरोग्यावर मन शांतीवर लक्ष केंद्रित करणे जास्त गरजेचे ठरेल कुठल्याही दुखण्या कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.उत्तम आरोग्या आणि मन शांती साठी ध्यान धारणा योगासने आणि उज्जयनी प्राणायाम करावा.

आर्थिक खर्च आटोक्यात ठेवावेत.इथुन पुढे येणारा काळ हा आर्थिक बाबतीत अस्थिरता देणारा राहील.अर्थार्जनाचे योग्य नियोजन करावे, असलेल्या भांडवलाचा योग्य वापर करावा कर्ज कटाक्षाने टाळावे.

कर्क

शुक्र लाभात वक्री होत असुन सप्तमात शनि आणि गुरु वक्री होत आहेत.त्यामुळे आर्थिक अस्थिरता राहील आणि आर्थिक बाबतीत काही निर्णय चूकण्याची शक्यता आहे.केलेल्या कष्टाचे फळ मिळणार नाही.आर्थिक लाभ होईल पण त्याला विलंब होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक बाबतीत संयमाने वाटचाल करावी.

सप्तमातले गुरु शनि भ्रमण प्रापंचिक जीवनात वादळ निर्माण करतील.जुणे वाद उफाळुन येतील.विवाह इच्छुकांना प्रचंड विलंबाला सामोरे जावे लागेल.व्यापार आणि व्यवसाय यांच्यात अस्थिरता आणि नुकसानाची शक्यता आहे कुठलाही व्यवहार करताना तो विचारपूर्वक करणे फायदेशीर ठरेल.आरोग्य कडे विशेष लक्ष द्यावे लागेल.मनशांती साठी ध्यानधारणा आणि योगासने करावीत भ्रसिका आणि अनुलोम विनुलोम प्राणायाम करावे.कर्ज आणि इतर उसनेवारी टाळावी आत्यंतिक गरज असल्यास परतफेडीचे नियोजन करून घ्यावे.

सिंह

राशीच्या दशमात शुक्र वक्री होत असुन षष्टात गुरु शनि वक्री होत आहे.त्यावरून व्यवसायात प्रचंड अस्थिरता आणि दडपण असणार आहे.नौकरीच्या ठिकाणी वारीष्ठाशी वाद घालु नये.आर्थिक लाभ आणि पदोउन्नती स विलं होऊ शकतो त्यामुळे कामाच्या बाबतीत सध्या सामंजस्याने विचार करणे गरजेचे राहील.कर्ज घेताना काळजीपूर्वक निर्णय घेऊन कर्ज घ्यावे आणि शक्यतो कर्ज टाळण्याचा प्रयत्न करावा.

षष्टातले गुरु शनि आर्थिक दडपण देतील त्याचप्रमाणे आरोग्याच्या तक्रारी सुद्धा वाढतील.एखादे जुने दुखणे डोके वर काढणार आहे त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे अनिवार्य ठरते.त्यामुळे रोजच्या जीवनात योगासन आणि कपालभाती किवा भ्रसिका प्राणायामाची जोड राहिली तर आरोग्य संतुलित ठेवण्यास मदत होईल.

कन्या

राशीच्या भाग्यात शुक्र वक्री होत असुन पंचमात शनि गुरु वक्री होत आहेत.शुक्र भाग्यात वक्री झाल्यामुळे भाग्यकारक घटनांचा ओघ काही काळासाठी थांबणार आहे.अध्यात्मिक प्रगतीत सुद्धा अडथळे निर्माण होतील चित्त थाऱ्यावर राहणार नाही.ध्यान धारणा प्रगतीसाठी अनुलोम विलोम प्राणायाम करणे गरजेचे राहील.पंचमातील शनि गुरु अध्ययनात अस्थिरता निर्माण करतील एकाग्राता आणि ध्येया कडे वाटचाल साध्य होणार नाही.शैक्षणिक दिशेच्या वाटचालीसाठी नियम आखावे लागतील.

आरोग्याच्या बाबतीत पोटाचे आणि पाठीचे विकार उद्भवतील.योग्य ती काळजी घेणे गरजेचे राहील.सध्या असलेल्या आर्थिक भांडवला मध्ये योग्य ते नियोजन करावे अर्थाचा नव्याने ओघ सुरु व्हायला विलंब लागणार आहे.योग्य वेळेत परतफेड करणे शक्य असल्यासच कर्ज घ्यावे.

तुळ 

राशीच्या चतुर्थात शनि गुरु युती होत असुन अष्टमात शुक्र वक्री होत आहे.तुळ राशीच्या जातकांसाठी अष्टमातला शुक्र आरोग्याची चिंता वाढविणारा राहणार असुन एखादा जुना व्याधी डोके वर काढण्याची शक्यता आहे त्यामुळे आरोग्याबाबतीत सजग राहणे योग्य राहावे आणि प्रकृती कडे पूर्ण लक्ष असु द्यावे.उत्तम आरोग्य आणि मन:शांती साठी  सूर्यनमस्कार योगा आणि प्राणायम जसे कि शितली आणि अनुलोम विलोम इत्यादी आत्मसात करून घ्यावे.

आर्थिक नियोजन कोसळुन पडेल.स्थावर मालमत्ते चे व्यवहार अडचणीत पडतील.गृह सौख्यात क्लेश संभवतो.कौटुंबिक वदना सामोरे जावे लागेल.वास्तु-वाहन खरेदीबाबत निर्णय पुढे ढकलावे लागतील.कुठल्याही प्रकारचे कर्ज घेणे टाळावे आत्यंतिक गरज किवा निकड भासल्यास योग्य तो व्यवहार करून कर्ज घ्यावे.कुठलाही साहसी निर्णय घेऊ नये.जेवढे झेपेल तेवढेच करावे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या सप्तमात शुक्र वक्री होत आहे,गुरु शनि हे तृतीयेत वक्री होत आहेत.सप्तमातला वक्री शुक्र वैवाहिक अडी-अडचणी निर्माण होतील जुन्या विषयावर पती पत्नीत वाद होतील प्रपंचात संशय कल्लोळ माजु शकतो जोडीदाराला खुश करण्यासाठी वाढीव प्रयत्न करावे लागतील.भावंडा संबंधी सुद्धा काही प्रतिकुल गोष्टी पाहायला मिळतील त्यामुळे त्यांच्याशी मिळते जुळते घ्यावे आपापसातले वाद संपवावे.

मनोविकारांवर नियंत्रण ठेवावे.मन: शांती साठी  आणि उत्तम आरोग्या साठी योगासने प्राणायाम यांची सांगड घालून त्यांना आत्मसात केल्यास शारिरीक आणि मानसिक सामर्थ्य प्राप्त होऊ शकते.भुजंगासन,नौकासन कपालभाती प्राणायाम इत्यादी त्यांनी आत्मसात करावे.

तृतीयातला गुरु-शनि अस्थिर मनोवृत्ती निर्माण करेल.आर्थिक बाबतीत नको ते साहस अंगावर घेऊ नये.जे आहे त्यात तडजोड करावी आणि सामोपचाराने पुढे पुढे जाव.कर्जाच्या बाबतीत कानाला खडा लावावा.उपलब्ध धनाचे योग्य नियोजन करून असलेल्या परिस्थितीला हाताळावे.

धनु 

धनु राशीच्या षष्टात शुक्रात वक्री होत आहेत आणि द्वितीयेत गुरु आणि शनि वक्री होत आहेत.विशेष म्हणजे ह्या राशीचे जातक साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात असुन त्यातुन तीन ग्रहांचे वक्री होणे म्हणजे यांची अग्नी परीक्षा घेणारा हा कालखंड आहे.आणि त्यामुळे या अग्नीच्या प्रज्वलित ज्वाळा प्रमाणे या वक्री ग्रहांचा दह यांना जाणवणार आहे.

आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.गुडघे ,पोटऱ्या,तळपाय आदी भागांची विशेष काळजी घ्यावी लागेल.मानसिक तसेच शारिरीक शांततेसाठी ध्यान धारणा सुर्य नमस्कार आणि प्राणायाम आत्मसात करावे जेणेकरून मानसिक आणि शारिरीक स्थेर्य लाभेल.विशेषत: भ्रमरी प्राणायमा वर भर द्यावा.

द्वितीयातला गुरु शनि आर्थिक –अस्थिरता आणि मानसिक तणावाला निमंत्रण देत आहेत.परंतु काटकसर,तडजोड,आणि योग्य सुनियोजन केल्यास हा काळ सुद्धा सहज निघून जाईल .जे काही अनावश्यक आहे ती सगळी प्रलोभने दूर ठेवावी.कर्ज घेउन्नाये अशी स्पष्ट सुचना आहे आणि जरी प्रयत्न केला असता नकार आणि पश्चाताप शिवाय काहीही मिळणार नाही.

मकर

गुरु -शनि मकरेत च वक्री झाले आहेत आणि शुक्र पंचमात वक्री झाले आहेत.साडे सातीच्या मध्य टप्प्यात गुरु शनि वक्री होणे म्हणजे धोक्याची घंटा आहे.दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार संपला आत्मनिर्भर व्हावे लागेल, अशी अवस्था सध्या मकर राशीच्या जातकांची आहे.आळस झटकुन कामाला लागावे स्वतःची कामे स्व:ता करावी.

आर्थिक बाबतीत अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल त्यामुळे जे आहे त्यात भागवावे लागेल.आर्थिक बाबतीत जर काही येणे असेल तर ते दुर्मिळ होईल आणि आर्थिक चक्र कोलमडेल.कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होईल पण अतीव प्रयत्नाने कर्जाचे साहस टाळावे.

पंचमातला शुक्र संततीच्या बाबतीत शैक्षणिक वाटचाली मध्ये चिंता निर्माण करेल.परंतु येणाऱ्या काळाप्रमाणे योग्य सुनियोजन केल्यास चिंतेचे कारण राहणार नाही.मानसिक ताणताणाव साठी अध्यात्मिक प्रगती साध्य करावी लागेल आणि त्याचप्रमाणे योगासनाची आणि प्राणायामांची सांगड घालावी लागेल जसे कि भुजंगासन ,ताडासन तसेच उज्जयनी आणि कपालभाती प्राणायाम आत्मसात करावे.

कुंभ 

कुंभ राशीच्या व्येयात गुरु शनि वक्री होत असुन शुक्र चतुर्थात वक्री होत आहे. या राशीच्या जातकांना साडेसातीच्या सुरवातीला या तीन ग्रहांचे वक्री होणे किंचित दबाव देईल.सर्वांगीण नियोजित नियोजन ढासळून पडेल.कामात विलंब,अडथळे आणि त्यामुळे चिडचिड आणि ताणतणावाला सामोरे जावे लागेल.त्यामुळे मनाच्या नकारात्मकतेला आणि अस्थिरतेला सामोरे जावे लागेल.त्यामुळे निर्णय चुकतील आणि जे काही ठरवलं ते काळजी पूर्वक करावे.

शुक्र सुखस्थानात वक्री आहे त्यामुळे सुखाचा अभाव निर्माण होईल.कुटुंबात कलह-वाद होतील.जुने कर्ज डोके वर काढेल.आरोग्या बाबतीत जास्त सतर्क राहावे लागेल कारण काही जुने आजार उफाळुन येतील ऋतु बदलामुळे प्रतिकार क्षमता वाढवावी लागेल.डावा डोळा ,पोटऱ्या,तळपाय यांची विशेष काळजी घ्यावी लागेल.औषध घेताना दक्षता घ्यावी.जुणे देणेकरी त्रस्त करतील,आर्थिक चिंता भेडसावेल नवीन कर्ज मिळणे दुरापास्त होईल.

मानसिक व शारीरक मनशांती साठी विशेष करून सुर्यनमस्कार,शीर्षासन किवा कपालभाती ,अनुलोम विलोम प्राणायाम यासारख्या योगिक कार्यायामध्ये मन गुंतवावे.अध्यात्मिक प्रगती साधावी.

मीन

मीन राशीच्या लाभ स्थानात शनि गुरु वक्री होतील आणि शुक्र तृतीय स्थानात वक्री होईल.तृतीय स्थानातल्या वक्री शुक्रामुळे प्रलोभन निर्माण होतील आणि त्यांना बळी पडल्यास अस्थिरतेला सामोरे जावे लागेल.भावंडांशी जुळवुन घ्यावे जुने वाद विवाद सामोपचाराने मिटवावे.शक्यतो कुणाला ही दुखवु नये.

आर्थिक हानी आणि विवंचने बाबत दक्ष राहण्याची सुचना ग्रह देत आहेत.नियोजन ढासळल्यामुळे वाढीव तणावाला सामोरे जावे लागेल परंतु विचलित न होता नित्य कर्माला सामोरे जावे लागेल.कर्माचे फळ उशिरा प्राप्त होईल परंतु प्रयत्न सुरु ठेवावे.मोठे खर्च पुढे ढकलावेत.आणि तसेच कर्ज वैगरे सुद्धा पुढेच ढकलावेत.देनेकऱ्याना थोपवावे.उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत.

आरोग्याच्या बाबतीत शारिरीक क्षमता वाढवावी.दुखणे अंगावर काढू नये.श्वसन संस्था आणि तळपायाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी.शारिरीक लाभासाठी व्यायाम करावेत पायाचे गुडघ्याचे किवा चालणे जरी केले तर उत्तम ठरेल.भुजंगासन ताडासन सारखी आसने आणि भ्रसिरिका,अनुलोम-विलोम सारखे प्राणायाम करावेत.

वक्री ग्रहांचे येणाऱ्या कळत होणारे भ्रमण आणि सद्य स्थितीचा विचार करता या कालप्रवाहात समयसुचक असे प्रखर बदल होतील.वक्री शनि शक्यतो नवीन बदलासाठी अडथळे आणतो मात्र काळाची गरज पाहत बदल हा गरजेचा राहील.

जुनाट रूढीबद्ध चाकोरीबद्ध बाबींना डावलुन नवीन पद्धती,नवीन विचार यांना जोपासावे लागेल.नैराश्य,आळस ,शिथिलता झटकुन प्रचंड उर्जेने आणि सकारात्मकतेने ओजास्वीपणे कर्म करावे लागतील.

वक्री गुरु सामाजिक आणि शैक्षणिक संदर्भामध्ये नवीन बदल वेगळी दिशा या बाबतीत विचार करण्यास भाग पाडेल.सामाजिक रचनेत नवीन पायंडे पडतील.

वक्री शुक्र नात्यांमध्ये ताण-तणाव व अस्थिरता निर्माण करतो तसेच मायेच्या मृग जळामागे धावायला लावतो.मोहमाया त्यागून सत्य परिस्थितीला सामोरे जाणे हाच पर्याय पुढील काळासाठी प्रेरक राहील.

आर्थिक स्वावलंबन,सुनियोजन या गुरुकिल्लीमुळे पुन्हा एकदा समृद्धी कडे वाटचाल निर्माण करता येईल.

!!  शुभम भवतु  !!