जुलै महिन्याचे भविष्य

जुलै  हा इंग्रजी महिना ज्येष्ठ आणि आषाढ या मराठी महिन्यात विभागला गेला आहे.आषाढी एकादशी ,गुरुपौर्णिमा अशा दोन महत्त्वपुर्ण तिथी या महिन्यात असुन या महिन्यात महिन्याच्या मध्या पर्यंत रवी मिथुनेत आणि महिन्याच्या मध्या नंतर कर्क राशीत रविचे भ्रमण राहणार आहे.मंगळ तब्बल एक महीना कर्क राशीत असणार असुन बुध सुद्धा अनुक्रमे मंगळा सोबत कार्केतच असणार आहे.गुरु वृश्चिकेत वास्तव्य करून आहे.शुक्र महिन्याच्या अखेरपर्यंत मिथुनेत असणार असुन शनी चे वास्तव्य धनु राशीत असणार आहे.राहु आणि केतु अनुक्रमे मिथुन आणि धनु राशीत आहेत.गुरु पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण आहे. 

मेष

ग्रहांची स्थिती : रवी या महिन्यात तृतीय आणि चतुर्थ स्थानात भ्रमण करणार असुन महिन्याचा पहिला पंधरवडा तुमच्या साठी रवी चे भ्रमण अनुकुल राहील.तृतीयात शुक्राचे भ्रमण आहे आणि महिन्याच्या अखेरीस शुक्र चतुर्थात जाईल ,चतुर्थात मंगळ आणि बुध यांचे भ्रमण असुन मंगळ काहीसा ताणतणाव वाढवणारा राहील.गुरु अष्टमात भ्रमण करेल केतु आणि शनी युती होत आहे .अशा प्रकारे हा महिना सुरवातीच्या पंधरवड्यात चांगला राहील आणि नंतरचा काळ थोडा अवघड राहील.

आरोग्य : आरोग्य बाबत हा महीना लाभदायक राहील पुर्वीचे काही आजारातुन विश्रांती घेतल्यास  पुर्णपणे बरे व्हाल.घरातील ज्येष्ठ मंडळींची विशेष काळजी घ्यावी.एखादी मोठी शस्त्रक्रिया करावयची असल्यास व्यैक्तिक ग्रहबळ तपासुन पुढील पावले उचलावीत.

आर्थिक : आर्थिक बाबतीत हा महिना उत्तम राहील.महिन्याच्या सुरवातीपासुन आर्थिक आवक चांगली राहील आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एखादी आर्थिक फटका किवा मोठ्या रक्कमेचा व्यवहार करावा लागेल.एखादा महत्त्वाचा आर्थिक निर्णय घेताना कागदपत्र योग्य पद्धतीने वाचुन मगच सह्या कराव्यात.सावधानता बाळगली तर जास्त उत्तम राहील.

नौकरी : एकंदरीत सर्वसाधारण असे वातावरण ह्या महिनाभर राहील.आपल्या कामांना प्राधान्य देऊन वेळेत पुर्ण करायचा पुरेपुर प्रयत्न केल्यास जास्त उत्तम राहील.कामाच्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कामात लक्ष न दिल्यास उत्तम वरिष्ठांनी  दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी लागेल.एखादी अनपेक्षित घटना अचानक घडु शकते त्यासाठी मानसिक तयारी ठेवावी लागेल.

व्यवसाय : ह्या बाबतीत ह्या महिन्यात का ही संधी उपलब्ध होतील आणि त्या संधीचा यथा योग्य लाभ घेतल्यास योग्य ते काम मिळुन काम करता येतील.येणाऱ्या काळात कामाचा व्याप वाढवायचा असेल तर सध्या हातात असलेले काम यथायोग्य पद्धतीने पूर्ण करावे लागेल.इथुन पुढचा काळ तुमच्या मेहनतीची परीक्षा पाहणारा काळ असणार आहे.

नाते संबंध : कुटुंबातील व्यक्तींसोबत उत्तम संबंध जोपासता येतील घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.जोडीदारा सोबत नाते संबंध सुधारित राहतील आणि घरातील मुलांसोबत नाते सुद्धा उत्तम राहील.योग्य वेळ आणि संवाद साधल्यास नाते संबंध समृद्ध होईल

विद्यार्थी : महिना एकंदरीत समाधान कारक राहील प्रगती साधण्यासाठी उत्तम काळ आहे.आपल्या मेहनतीचे फळ मिळणारा आणि काही नवीन संधी उपलब्ध करून देणारा राहील.

वृषभ

ग्रहांची स्थिती : रविचे भ्रमण द्वितीय आणि तृतीय स्थानातुन भ्रमण करणार असुन,राहुचे वास्तव्य द्वितीयात आहे आणि त्याच प्रमाणे शुक्र सुद्धा द्वितीय आणि तृतीयातुन भ्रमण करणार आहे.मंगळ तृतीयात असुन आणि बुधाचे सुद्धा भ्रमण तृतीयात च घडत आहे.सप्तमात गुरुचे भ्रमण आणि अष्टमात शनी केतु चे भ्रमण घडत आहे.एकंदरीत महिन्याच्या मध्या नंतर ग्रहमान चांगले राहणार असुन नवीन संधी चा फायदा तुम्हाला घेता येईल.

आरोग्य : एकंदर ग्रहस्थिती पाहतातब्येत उत्तम राहील परंतु पावसाळी संसर्गा पासुन स्वतःला जपा स्वतःची काळजी घेऊन स्वतःची तब्येत जपल्यास घरातील मंडळीच्या तब्येतीकडे लक्ष देता येईल.घरातील वडिलधाऱ्या मंडळींच्या तब्येतीस जपावे.

आर्थिक : या बाबतीत एकंदरीत परिस्थिती उत्तम राहणार असुन या पातळीवर ग्रहमान तुमची निराशा  करणार नसुन तुमच्या साठी आर्थिक समाधान देणारा हा महीना राहणार आहे.एखादे कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर कागद पत्रांची पूर्तता केल्यास एखादे कर्ज मंजुर सुद्धा होऊ शकते.

नौकरी : कामाच्या निमित्ताने प्रवास घडू शकतो त्यामुळे मिळेल ती जबाबदारी अंगावर घेऊन काम करणे आत्यंतिक गरजेचे राहील.कामाचा काही विशेष ताण राहणार नाही.नवीन संधी मिळाल्यास त्याच्या लाभ घेतल्यास प्रगतीची दार उघडी होतील.

व्यवसाय : उत्तम प्रगती साधुन देईल असे ग्रहमान आहे त्यामुळे गुंतवणुक करताना योग्य ठिकाणी विचारपूर्वक गुंतवणुक केल्यास त्याचे फळ पण योग्य भेटेल.आणि अवांतर खर्च कमी करावे लागतील.एकंदरीत आनंदाने व्यवसाय करायचा हा काळ आहे.आणि व्यवसायात भरभराटीचा सुद्धा हा काळ आहे.मिळालेल्या संधीचा योग्य फायदा घ्यावा.

नाते संबंध : कुटुंबातील वातावरण एकंदरीत कमी अधिक प्रमाणात राहण्याची शक्यता आहे म्हणजेच संमिश्र असे वातावरण राहील.काही बाबतीत घरातल्यांच एकून घ्याव लागेल.एकंदरीत वाद होत असल्यास शांततेची भुमिका घ्यावी म्हणजे वाद वाढण्या एवजी शांत होऊन संपुन जातील.जोडीदाराला योग्य ती साथ दिल्यास तुमच्या नात्या साठी प्रगतीकारक असा महिना राहील.

विद्यार्थी : पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष पुरवावे त्यांच्या मानसिक परिस्थिती ला समजून घेतल्यास उत्तम पद्धतीने समजून घ्यावे लागेल.अभ्यासात उत्तम प्रगती साधुन देणारा हा महीना राहील.

मिथुन

ग्रहांची स्थिती : रविचे भ्रमण प्रथम आणि द्वितीय स्थानातून असणार असुन राहु चा मुक्काम राशीतच असुन त्याच बरोबर शुक्र सुद्धा हा महिना तुमच्या राशीत भ्रमण करत आहे द्वितीयात मंगळ आणि बुध यांचे भ्रमण आहे.षष्टात गुरु आणि सप्तमात शनी आणि केतु चे भ्रमण राहणार असुन एकंदरीत महिना हा सर्वसमावेशक राहील काही बाबी मना सारख्या तर काही मनाविरुद्ध घडतील महत्त्वाचे निर्णय याच कळत मार्गी लावले तर उत्तम राहील.

आरोग्य : या बातीत काही विशेष त्रास नक्कीच नाहीये  परंतु  पावसाळी वातावरण आणि संसर्गा पासुन स्वतः चे रक्षण करणे गरजेचे राहील.परंतु घरातील ज्येष्ठ मंडळींच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे.महिन्याच्या मध्या नंतर तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल.

आर्थिक : आर्थिक प्रगती उत्तम असणार असुन या महिन्यात अर्थार्जन उत्तम होईल त्यामुळे या आघाडीवर चिंता नसावी.आणि या अर्थाजनाचा उत्तम लाभ करून घेतला असता योग्य ठिकाणी गुंतवणुक केल्यास आर्थिक नियोजन उत्तम होईल.आर्थिक निर्णय घेताना व्यवहारिक पातळीवर त्याची योग्य ती पडताळणी करून घेणे गरजेचे ठरेल.

नौकरी : कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील आणि ही आव्हाने योग्य पद्धतीने हाताळल्यास त्यातुन तुमच्या प्रगतीची दार खुली होतील.जबाबदारी स्वीकारल्यामुळे वरिष्ठ खुश होतील.नियोजन बद्ध कामे केल्यास त्याचे फलित उत्तम राहील.

व्यवसाय :  एकंदरीत थोडासा संमिश्र असा महिना राहील मिळालेले प्रत्येक काम वेळेत पूर्ण करण्याच प्रयत्न करावा ,एखाद्या गोष्टीतुन अचानकपणे आव्हान निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे संधी म्हणून बघितल्यास व्यवसायाच्या दृष्टीने ते जास्त उत्तम राहील आणि प्रगतीकारक राहील.

नाते संबंध : या बाबतीत महीना काहीसा खडतर असणार असुन संवाद साधताना सुद्धा खबरदारी घ्यावी लागेल जेणेकरून वाद किवा विवाद होणार नाहीत.आणि काही अंशी वाद झाले तरी आपण तुम्हाला गोष्टी अत्यंत खुबीने हाताळाव्या लागतील आणि यात तुम्हाला यश मिळवावच लागेल जेणेकरून नाती टिकुन राहतील.तुमच्या संयमाची परीक्षा घेणार हा महीना असणार आहे.जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

विद्यार्थी : काही गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत म्हणून दुखी किवा निराश न होता पुढे जात राहावे जेणेकरून प्रयत्न वाढवल्यास आपल्या मनासारखे यश मिळवण्यासाठी मदत होईल.सातत्याने प्रयत्न करण्या व्यतिरिक्त कुठलाही मार्ग आपल्याजवळ नसल्याने प्रयत्नांती परमेश्वर हाच मंत्र जपावा लागेल.

कर्क

ग्रहांची स्थिती : रविचे भ्रमण व्येय स्थानातून प्रथम स्थानात राहील या महिन्यात मंगळ बुध यांची युती राशीत होत असुन पंचमात गुरु चे भ्रमण  आणि षष्टात शनी आणि केतु यांची युती होत आहे.आणि व्येय स्थानात अनुकुलातेची बीज या महिन्यात मिळणार असुन मिळालेल्या संधीचा उत्तम लाभ घेतल्यास यश तुमचेच आहे.

आरोग्य : लहान सहन दुखाण्यानी हा महिना वेढलेला असेल.त्यामुळे आरोग्याला जपावे जेणेकरून आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.एकंदरीत महिना आरोग्याच्या बाबतीत संमिश्र असा राहणार आहे.कुटुंबातील मंडळींच्या तब्येतीला सुद्धा जपावे.

आर्थिक : अर्थार्जन उत्तम साधुन देणारा महिना आहे.एखाद्या जुन्या प्रकरणातून सुद्धा देणी मिळु शकतात.महिन्याचा काही काळ कात्कासारीत जाणार असला तरी खुप विषम स्थिती उत्पन्न होईल असे काही नाही.परंतु एखाद्या आर्थिक व्यवहार करताना सावधगिरीने केल्यास

नौकरी : नौकरीत लाभदायक असा महिना आहे.तुमचे प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये लाभदायक ठरतील.जबादारी अंगावर पडल्याने धावपळ होऊ शकते त्यामुळे जरा जपुन कामगिरी हाताळल्यास यश तुमचेच आहे.

व्यवसाय : व्यवसायासाठी हा काळ थोडासा अवघड वाटचालीचा आहे.परंतु आपल्या ला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेले जेणेकरून आपल्या कामाची दखल घेतल्या जाईल.आणि आपली मेहनत सुद्धा फळाला येईल.

नाते संबंध : काहीश्या तक्रारी नाते संबंधात सुरु राहतील त्यामुळे त्यांचा ताण न घेता शांततेने घेतल्यास तुम्हाला त्याचा लाभ होईल आणि नाती सुद्धा टिकुन राहतील.जोडीदाराच्या बाबतीत हा महीना काहीसा तक्रारीचा सुर ठेवणारा राहील.

विद्यार्थी :  या महिन्यात जराशी मेहनत अधिक घ्यावी लागेल तसा महीना संमिश्र फलदायी असल्याने आपल्याला मिळणाऱ्या गोष्टी कमी अधिक प्रमणात आपल्याला मिळूनच राहतील.

सिंह

ग्रहांची स्थिती : रविचे भ्रमण लाभ स्थानातून व्येय स्थानात होत असुन गुरु  चतुर्थात वास्तव्य करून आहे.पंचमात शनी आणि केतु यांची युती होत आहे.लाभत शुक्र आणि राहु यांचे भ्रमण होत असुन व्येय स्थानात मंगळ आणि बुध यांचे वास्तव्य आहे.एकंदरीत महीना काहीसा तणाव पूर्वक राहणार असुन सर्व बाबींकडे यथा योग्य लक्ष दिले असता हा महीना निभावुन जाता येईल.

आरोग्य : तशी काही विशेष तक्रार राहणार नाही पण तरी मानसिक  आरोग्याच्या काही तक्रारी राहतील एकंदरीत शारिरीक आरोग्य वर मानसिक अशांततेचा प्रभाव पडणार असुन ध्यान योगा आणि प्राणायाम केले असता मानसिक स्वास्थ्य सुद्धा उत्तम लाभेल.घरातील ज्येष्ठ मंडळी आणि लहान मुलांच्या तब्येतीला जपावे.असे ग्रह संकेत देत आहेत.

आर्थिक : आर्थिक बाबतीत चिंता करावयाचे काही कारण नाही आर्थिक ओघ चांगला राहणार असुन त्याबाबत काळजी नसावी.एखादा आकस्मित खर्च उद्भवू शकतो तर त्याची तयारी ठेवावी.सगळे व्यवहार योग्य वेळी केल्यास उत्तम राहतील जेणेकरून नंतर त्या गोष्टींचा ताण येणार नाही.

नौकरी : एकंदरीत समाधानकारक असा महिना असणार आहे त्यामुळे विशेष काही काळजीचे कारण नाही.कामाच्या ठिकाणी कोणामुळेही काही त्रास जाणवणार नाही.त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पडल्या असता वरिष्ठांच्या प्रशंसेचे पत्र ठराल.

व्यवसाय : व्यवसाय करताना हा महिना यश आणि अपयश दोन्ही समान मापाने घेऊन आलाय.आपल्या कामातुन पेशाचा ओघ वाढेल आपल्या  चांगल्या  कामामुळे आपल्याला अजुन कामे मिळतील.जी काही आर्थिक देणी असतील ती देता येतील.त्यामुळे व्यवसयीकाना काही विशेष काळजीचे कारण नाही.

नाते संबंध : कौटुंबिक पातळीवर काहीश्या तक्रारी जाणवतील कुटुंबात वाद विवाद होऊ शकतो.एखादी गोष्टी मनासारखी घडणार नाही आणि त्यामुळे गोष्टी मनाला लावुन घेऊ नये.जोडीदारा सोबत सुद्धा अचानक पाने काही वाद उद्भवू शकतात जरा सामंजस्य पणाने सगळ हाताळल्यास चांगले राहील.

विद्यार्थी : प्रगतीचा आलेख वाढवण्यासाठी हा उत्तम असा काळ आहे.आपल्या प्रगतीमुळे पालकांना सुद्धा आनंद मिळेल.अशाच प्रकारे एकाग्रता आणि सातत्य ठेवल्यास उत्तर उत्तर प्रगती करता येईल.

कन्या

ग्रहांची स्थिती : रविचे भ्रमण दशम आणि लाभ स्थानातून होत असुन तृतीयात गुरुचे भ्रमण होत आहे.चतुर्थात केतु आणि शनी यांचे वास्तव्य आहे.शुक्र आणि राहु दशमात ठाण मांडुन बसलेले आहे.तर लाभात बुध आणि मंगळ यांची युती होत आहे.या महिन्याचे ग्रहमान पाहता काही बाबतीत हा महीना अत्यंत सकारात्मक आणि महिन्या अखेरीसचा काही काळ काहीसा खडतर असणार आहे.

आरोग्य : अगदी उत्तम अशी तब्येत या महिन्यात असल्याने तब्येतीची काळजी करण्याचे काही कारण नाही.आणि घरातील इतर मंडळींच्या तब्येतीची सुद्धा काही तक्रार राहणार नाही त्यामुळे तब्येतीच्या आघाडीवर चिंता न करायला लावणारा हा महिना आहे.परंतु महीना अखेरीस थोडक्या साठी छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आर्थिक : आर्थिक बाबतीत महिना समाधानकारक आहे त्यामुळे चिंता नसावी.एखादी आर्थिक मदत अचानकपणे मिळण्याचे सुद्धा योग आहेत.खर्चाचा जास्त ताण नसल्यामुळे योग्य ते आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे लागतील आणि त्यावर टिकुन रहाव लागेल.

नौकरी : कामाच्या ठिकाणी सहजपणा जाणवेल तुम्हाला अन्दाने काम करता येईल कुठलेही राजकारण नसल्याने जास्त काही त्रास होणार नाही.जी काही जबाबदारी सोपवली जाईल तिला यथा योग्य पणाने पूर्ण केल्यास उत्तम राहील.त्यामुळे वरिष्ठांची तुमच्या कडून काही तक्रार राहणार नाही.

व्यवसाय : कामाच्या जोमाने या महिन्याची सुरवात होईल,योग्य वेळी पूर्ण केलेल्या कामामुळे तुमची प्रशंसा सुद्धा होईल त्यामुळे एकंदरीत महिना हा उत्तम असल्याने काळजीचे कारण नसावे.व्यवसाय वृद्धी साठी योग्य ते निर्णय घेण्याची हीच काय ती योग्य वेळ असणार आहे.

नाते संबंध : कौटुंबिक आघाडीवर हा महीना अत्यंत सुखकारक असणार असुन समस्या काही प्रमाणात कमी होतील.महिना आनंददायी असला तरी महिन्याच्या अखेरीस चा काही काळ थोडासा त्रासदायक असणार आहे.जोडीदारा सोबत पण नाते अत्यंत सुरळीत राहील काही कुरबुरी असल्यास समजुन घेण्याची भूमिका ठेवावी लागेल.

विद्यार्थी : ग्रहमान पाहता विद्यार्थी वर्गांचा अत्मिश्वास  वाढेल आणि वाढलेल्या आत्मविश्वासामुळे उत्तम प्रगती साध्य करून हव ते ध्येय सहज पणे गाठता येईल.जरा जपुन वाटचाल करावी आपल्यामुळे कुणी दुखावु  नये याची काळजी घ्यावी.

तुळ

ग्रहांची स्थिती : रविचे भ्रमण नवमातुन दशमात होत असुन गुरु द्वितीय असुन शनी आणि केतु अनुक्रमे तृतीयात स्थानी असुन नवम स्थानात शुक्र आणि राहु याचे वास्तव्य सुरु आहे.बुध आणि मंगळ यांची युती दशमात होत असुन एकंदरीत ग्रहमान पाहता महिन्याची सुरवात थोडी कठीण नक्कीच आहे पण महिन्याच्या मध्या नंतर किंवा अखेरीस तुमच्या साठी अनुकुल काळ राहील.

आरोग्य : या महिन्यात तुम्हाला तुमच्या तब्येतीला जपावे लागेल दुखणी अंगावर काढुन चालणार नाही.छोट्या छोट्या गोष्टी मोठे रूप धरण करू शकतात त्यामुळे त्वरित उपचार केल्यास त्त्वरीत बरे होता येईल.घरातील मंडळींच्या तब्येतीकडे ही लक्ष पुरवाव लागेल.कमी अधिक  प्रमाणात आरोग्यावर खर्च होऊ शकतो.

आर्थिक : आर्थिक आलेख वाढता राहणार आहे परंतु त्याच प्रमाणे खर्चाचा आलेख ही वाढता राहणार आहे.परंतु खर्च आवश्यक गोष्टींवर होणार असल्यामुळे त्याची विशेष चिंता नसावी.एखादे कर्ज महिना अखेरीस मंजुर होण्याची शक्यात आहे.त्यामुळे चिंता नसावी.

नौकरी : एकंदरीत महिना थोडासा अवघड असणार आहे पण काळजीच काही कारण नाही हा काळ जास्त काळ टिकणार नाही तुमचे प्रयत्न तुम्हाला यातुन तरुन  नेतील तुमची मेहनत सुफळ संपूर्ण होऊन तुमच्या कष्टाचे चीज होईल.त्यामुळे काळजी नसावी.

व्यवसाय :   एकंदरीत महिना तणावपुर्वक असणार आहे.कामाच्या तणाव खाली तुम्हाला काही सुचणार नाही आणि त्यामुळे कामे पुर्ण करताना थोडीशी ओढा-ताण होईल.आपल्या अथक प्रयत्नाचे चीज होईल कारण तुमच्या कामामुळे तुमची प्रशंसा सुद्धा केली जाईल.

नाते संबंध : महिन्याची सुरवात थोड्या फार कुरबुरी नी सुरु होईल.परंतु योग्य वेळ आणि योग्य संवाद साधणे आत्यंतिक गरजेचे राहील.कारण संवाद अभावी नात्या मध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो याची दखल घ्यावी.जोडीदारा बरोबर सुद्धा काहीसा ताण जाणवु शकतो आहे.सगळी नाती अत्यंत खुबीने आणि हुशारीने हाताळावी लागेल.

विद्यार्थी : प्रयत्न केल्यास यश तुमचे अशी स्थिती आहे त्यामुळे आपल्याला यश मिळेल कि नाही या पेक्श आपण प्रयत्नां मध्ये कमी पडु नये याची विशेष काळजी घेतली तर जास्त उत्तम राहील.तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल.

वृश्चिक

ग्रहांची स्थिती : रवीचे भ्रमण अष्टमातून नवमात होत आहे.गुरु  तुमच्या राशीत वक्री आहे.द्वितीयात केतु आणि शनी यांचे वास्तव्य असुन अष्टमात शुक्र आणि राहु यांचे वास्तव्य आहे.नवमात बुध आणि मंगळ यांचे यांची युती होत आहे.हे सर्व भ्रमण पाहता  ग्रहमान आपल्या प्रगतीसाठी सकारात्मक आणि पुरक आहे.आगामी काळासाठी काही योजना राबवता आल्या असता उत्तम राहील.

आरोग्य : योग्य आहार योग्य विहार आणि पुरेपुर विश्रांती हा मंत्र तुम्हाला अवलंबावावा लागेल.आरोग्य हे आपले सर्वप्रथम धन असल्याने त्याचा पहिले विचार करावा आणि मग इतर बाबींना स्थान द्याव लागेल.आणि आपल्या सोबतच घरातील मंडळींच्या आरोग्य बद्दल सजग राहावे लागेल.

आर्थिक : आर्थिक प्रगती महिन्याच्या सुरवातीला उत्तम राहील त्यामुळे चिंतेचे काही कारण नसावे परंतु कुणाकडून ही देणे घेणे टाळावे.गुंतवणुक केल्यास उत्तम राहील कुठलाही व्यवहार करताना कागदपत्रे योग्य तपासुन व्यवहार करावा.एखाद अनपेक्षित खर्च उद्भवू शकतो त्यामुळे सावध असावे.

नौकरी : नौकरीच्या ठिकाणी काम ठीकठाक आणि सुरळीत राहील.कार्यालयीन राजकारणा पासुन सावधगिरी बाळगल्यास उत्तम राहील तुमच्या विरोधात काही कृती होऊ शकतात.त्यामुळे जरा जपुन व्यवहार करा.

व्यवसाय : असेल त्या परिस्थितीला सामोरे जाऊन त्यातून काहीतरी उत्तम निष्पन्न करण्याची हीच ती योग्य वेळ आहे.आपल्या कामाचे आपल्या वेळेचे आणि आपल्या भांडवलाचे  योग्य नियोजन करणे उत्तम राहील.एकंदरीत हा आणि आगामी काही काळ तुमच्यासाठी खडतर असणार आहे.

नाते संबंध : सुखकारक आणि आनंददायी असा महिना राहील.घरातील वातावरण एकंदरीत आनंदाचे आणि खेळीमेळीचे राहील.जोडीदारा बरोबर आणि मुलांबरोबर आनंदाने काळ घालवता येईल.आपली नाती सुदृढ करण्यासाठी या काळाचा वापर केला तर उत्तम राहील.जोडीदाराबरोबर सुद्धा उत्तम जमेल चिंता नसावी.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा अत्यंत अनुकुल असा काळ राहणार असुन मनासारखे घडेल सारे.निर्णय घेताना जास्त दिरंगाईने निर्णय घेऊन चालणार नाही.योग्य निर्णय त्वरित घेणे अनिवार्य ठरेल.

धनु  

ग्रहांची स्थिती : रवी चे भ्रमण सप्तमातून अष्टमात होत आहे.केतु आणि शनी चे वास्तव्य राशीतच असणार आहे.शुक्र आणि राहुचे भ्रमण सप्तम स्थानात होत आहे.मंगळ आणि बुध हे अष्टमात असुन व्येय स्थानी गुरुचे भ्रमण आहे.एकंदरीत ग्रहमान पाहता हा महीना काहीस अनिराहादायी महीना असुन कुठल्याही प्रकारची

आरोग्य : एकंदरीत ग्रहमान पाहता आरोग्य बाबतीत हा महिना प्रतीकुलातेकडे झुकलेला आहे त्यामुळे आपल्याला आरोग्यला जपावे लागेल आणि जे काही व्याधी आहेत त्यांच्या कडे लक्ष पुरवून योग्य उपचार करून घ्यावेत.मानसिक आरोग्य हि जपावे लागेल घरातील मंडळींच्या तब्येतीला सुद्धा जपावे.

आर्थिक :  आर्थिक बाबतीत जरा घसरणीचा महीना राहणार आहे.काही आकस्मित खर्च अचानक  पणे  उद्भवतील त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढलेले राहील.एखादा वेद्यकीय खर्च सुद्धा अचानक पणे दत्त म्हणून उभा राहु शकतो.काळ अवघड आहे पण कोण कडूनही उधारी घेणे टाळा.

नौकरी :  कामाच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे इतरांना नक्की मदत होईल किवा ती तुम्हाला करावी लागेल असे संकेत आहेत.चिंतेचे काही कारण नाहीये  ताण निवळलेला असेल तुअमुळे मानसिक दडपण नसेल.कामच्या ठिकाणी काहीसे उदास वातावरण असु शकते परंतु त्याचा स्वतः वर काही परिणाम होऊ देऊ नका.

व्यवसाय : काही समस्या अचानकपणे उद्भवतील आणि वेळेत काम करण्याचे बंधन राहील त्यामुळे थोडा ताण तणाव जाणवु शकतो आहे.कामासाठी योग्य वेळेचे नियोजन केल्यास जास्त उत्तम राहील जेणेकरून तुमच्या ग्राहकाचा आणि तुमचा हिरमोड होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

नाते संबंध : आपले कोणीही एकात नाहीये असे वाटेल घरात काही ताण तणाव निर्माण होऊ शकतील त्यामुळे वाद विवाद वाढेल आणि गैरसमज सुद्धा वाढेल परंतु आपण कोण सोबतही वाद न होऊ देता शांतता आणि संयमाचे धोरण स्वीकारावे.जोडीदराबरोबर सुद्धा नाते जरा तणाव पूर्वक राहील.

विद्यार्थी: कठीण आणि कठोर परिश्रमाचा हा काळ असणार असुन परिस्थिती काहीशी निराशाजनक असणार आहे त्यामुळे चिंतातूर होण्याचे कारण नाही आपण आपल्या प्रयत्नांमध्ये कमी पडु नये आपल्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल.

मकर

ग्रहांची स्थिती : रविचे भ्रमण सप्तमातून षष्ट स्थानातून होत आहे.षष्टत राहु आणि शुक्राचे भ्रमण होत असुन सप्तमात बुध आणि मंगळ यांचे भ्रमण होत असुन लाभत गुरु तसेच व्येयात केतु आणि शनी यांचे वास्तव्य आहे.एकंदरीत ग्रहमान पाहता एकंदरीत आयुष्याची घडी योग्य बसवावी लागेल सगळ्याच पातळींवर आपल्याला मेहनतीने काम कराव लागेल.

आरोग्य : तब्येत उत्तम असणार आहे त्यामुळे चिंता नसावी काही जुजबी तक्रारी असल्यास त्याची योग्य ती काळजी घ्यावी.आपली तब्येत जरी उत्तम असली तरी घरातील ज्येष्ठ मंडळींच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.आणि जोडीदाराच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे.

आर्थिक : आर्थिक परिस्थिती उत्तम असणार असुन काळजीच काही कारण नाही काही खर्च वाढू शकतात परंतु खर्च जरी वाढले तरी त्यासाठी पुरेस आर्थिक पाठबळ सुद्धा तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे त्यामुळे चिंता नसावी.महिन्या अखेरीस एखादे कर्ज मंजुर होण्याची शक्यता आहे.

नौकरी : कामाच्या ठिकाणी सावधानतेने काम करण्याचा इशारा एकंदरीत ग्रहमान देत आहे.सातत्याने प्रयत्न करावेत परंतु  वरिष्ठाशी वाद न घालता कारण एखाद्या कामच्या अपयशाचे खापर तुमच्यावर फोडले जाऊ शकते त्यामुळे निराश न होता शांततेने परिस्थितीला हाताळल्यास कामाच्या ठीकाबी योग्य राहील.

व्यवसाय : एकंदरीत कामच तणाव वाढलेला असेल त्यामुळे आपल्या कामाशी काम ठेवल्यास जास्त उत्तम राहील.आपल्या विरोधात काही घटना घडतील परंतु एकंदरीत ग्रहमान पाहता तुम्हाला तुमच्या कामामुळे पाठबळ मिळु शकते त्यामुळे आपल्या कामात कमी पडु नका.

नाते संबंध :  काही काळ जर शांततेचे धोरण बाळगल्यास उत्तम राहील कारण एकंदरीत ग्रहमान साथ देत नसल्यामुळे घरातील  मंडळींशी   वाद विवाद होऊ शकतो.जोडीदारा सोबत काही समस्या निर्माण होऊ शकतात पण योग्य संवादाने या समस्या सोडवल्या जाऊ शकतात त्यामुळे चिंता नसावी.

विद्यार्थी :  हा महीना सगळ काही म्हणजेच यश आणि अपयश दोन्ही देणारा असणार आहे.त्यामुळे जराश्या अपयशामुळे खचुन जाऊ नये आणि यशामुळे हुरळुन जाऊ नये.आपले प्रयत्न सातत्याने आणि प्रामाणिकपणे चालु ठेवावे.

कुंभ

ग्रहांची स्थिती : रविचे भ्रमण षष्टातुन पंचमात भ्रमण होत आहे.शुक्र आणि राहु यांचे पंचमात वास्तव्य आहे.षष्टात बुध आणि मंगळ यांचे भ्रमण चालु आहे.दशमात केतु आणि लाभत केतु आणि शनी यांचे महिनाभर वास्तव्य आहे.महिन्याच्या सुरवातीचा काळ काहीसा खडतर असला तरी हरकत नाही कारण महिन्याच्या मध्या नंतर आर्थिक प्रगती होईल आणि पुढील काही काळ प्रगती अशीच सुरु राहील.

आरोग्य : आपले ग्रहमान उत्तम तब्येतीचे संकेत तुम्हाला देत आहेत त्यामुळे आरोग्य च्या पातळीवर विशेष चिंता नसावी.मानसिक ताण तणाव नसल्याने मानसिक स्वास्थ्य सुद्धा उत्तम लाभेल.घरातील इतर मंडळांच्या तब्येतीची सुद्धा काळजी नसावी सगळ्यांची तब्येत उत्तम आणि ठणठणीत राहील.

आर्थिक : आर्थिक पातळीवर हळुहळु प्रगतीचा आलेख वाढेल जेणेकरून चिंतेचे काही कारण नाही.एखादी मोठी गुंतवणुक करायच्या विचारात असाल तर काहीच हरकत नाही परंतु योग्य ठिकाणी गुंतवणुक करणे गरजेचे राहील.आर्थिक आवक या महिन्यात उत्तम राहील त्यामुळे चिंता नसावी.

नौकरी : कामाच्या ठिकाणी वातावरण उत्तम राहील कामाचा खी विशेष ताण जाणवणार नाही त्यामुळे मनातून जरासे हलके वाटेल.कमचे योग्य वेळेत योग्य नियोजन केल्यास तुमच्या प्रगतीची दारे खुली होतील.वरिष्ठ तुमच्या कामा मुळे खुश होतील.या बाबतीत हा महिना सकारात्मक राहील त्यामुळे चिंता नसावी.

व्यवसाय : आपल्या कामामुळे हा महिना तुम्मचा प्रगतीचा आलेख उंचावणारा राहील.आपल्या कामा मुळे आपल्या कडे पेशाचा ओघ वाढता राहील त्याची चिंता नसावी आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारा महिना राहील.कुठलाही व्यवहार करताना सतर्क राहिल्यास जास्त उत्तम राहील.

नाते संबंध : कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील त्यामुळे चिंतेचे काही कारण नसावे प्रसन्न चित्ताने घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवल्यास नाते अजुन सुदृढ आणि सक्षम बनेल.जोडीदारा सोबत सुद्धा नाते सुखवाहक राहील.एकमेकाना  भावना बोलून दाखवल्यास नाते अजुन सुदृढ होईल एकंदरीत उत्तम सुखकारक महिना राहील.

विद्यार्थी : या महिन्यातील ग्रहमान पाहता एकंदरीत प्रगतीकारक महिना आहे.नवीन त्याचप्रमाणे मनाजोगते महाविद्यालय मिळाल्यामुळे उत्साहवर्धक असा महिना राहील.मनाजोगती प्रगती करण्याचा हा महिना आहे.

मीन

ग्रहांची स्थिती : रविचे भ्रमण पंचमातून चतुर्थात होत असुन चतुर्थात राहु आणि शुक्राचे भ्रमण पंचमात अनुक्रमे बुध आणि मंगळाचे भ्रमण गुरु चे नवव्या स्थानात भ्रमण होत आहे शनी व केतु दशमात वास्तव्य करून आहेत. महीना सुरु होताच थोडस तणावाचसोबत घेऊन येत असला तरी महिन्याच्या शेवटी यशदायी होण्यासाठी हि परिस्थिती निर्माण होत आहे.

आरोग्य : महिन्याच्या सुरवातीला काही जुजबी तक्रारींनी सुरवात होईल परंतु योग्य तो उपचार आणि वेद्यकीय सल्ला घेतल्यास यातुन लवकर बरे होता येईल.कुठलीही दुखणी अंगावर न काढता योग्य ते औषध उपचार केल्यास तब्येतीसाठी उत्तम राहील.महिन्याच्या शेती सर्व ताक्राई दूर होऊन अगदी ठणठणीत बरे व्हाल चिंता नसावी.

आर्थिक :  आर्थिक दृष्ट्या हा महिना एकंदरीत खर्चिक असणार आहे त्यामुळे चिंतेचे कारण नसावे कारण आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारा असा महिना राहील.तुमच्या खर्चा मुळे तुम्हाला समाधान वाटेल त्यामुळे काही मनस्ताप होणार नाही.फक्त बाचातीला थोडा आळा बसेल

नौकरी : नौकरीच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल त्यामुळे तुम्हाला प्रचंड कामाची तयारी ठेवावी लागेल.एकंदरीत या महिन्याच्या वाटचाल अथक परिश्रम आणि खडतर वाटचालीची राहील.परंतु तुमच्या कामातुन  तुम्हाला  यश नक्की मिळेल आणि थोडस सुखकारक सुद्धा राहील.त्यामुळे महिन्या च्या शेवटी समाधानकारक वाटेल.

व्यवसाय : प्रचंड काम असल्यामुळे त्याचा ताण जाणवेल वेळच्या वेळी कामे पूर्ण करावी लागतील त्याचा काहीसा ताण जाणवेल पण हा ताण सचोटीने हाताळल्यास तुमच्या कामामुळे तुम्ही साम्रोच्या वर प्रभाव पडु शकता.आपल्या अथक परिश्रमामुळे तुमचे कामच तुमच्या बाजूने बोलेल.

नाते संबंध : महिन्याची सुरवात जरी कमी अधिक वादाने झाली असली तरी हे सगळे वाद लवकरात लवकर संपुष्टात येणारे आहे त्यामुळे आपण शांततेने घेतल्यास उत्तम राहील कारण नात्यांमध्ये सामजस्य पण दाखवल्यास नाते अजुन समृद्ध होईल.उत्तम संवाद साधण्याचा प्रयत्न करावा.जेणेकरून गैरसमज होणार नाही.जोडीदारा सोबत चे सबंध सुद्धा चांगले राहतील.

विद्यार्थी : एकंदरीत महिना संमिश्र म्हणजे थोडा खडतर असेल पण पीछेहाट न करता सातत्याने प्रयत्न केले तर आगामी काळातील संधीचा तुम्हाला फायदा  घेता येईल.प्रतिकुलतेतून प्रगतीचा यशदायी मार्ग निर्माण होईल.

 

शुभम भवतु