जुन  महिन्याचे राशी भविष्य

जुन हा इंग्रजी महिना ज्येष्ठ या मराठी महिन्यात विभागला गेला आहे. ह्या महिन्यातले ग्रहमान पुढील प्रमाणे राहील.रवीचे भ्रमण मेष आणि मिथुन राशीत राहणार असुन मंगळ महिन्याच्या शेवट पर्यंत मिथुन राशीत आणि शेवटच्या आठवड्यात कर्क राशीत प्रवेश करणार आहे.बुध महिन्याच्या सुरवातीला मिथुन राशीत आणि २० जुन ला कर्क राशीत प्रवेश करणार आहे.गुरु वृश्चिक राशीतच असणार आहे.शुक्र महिन्याच्या सुरवातीला वृषभ राशीत आणि महिन्याच्या शेवटी मिथुन राशीत जाणार आहे.शनी धनु राशीत भ्रमण करणार आहे राहु आणि केतु अनुक्रमे मिथुन आणि धनु राशीतच महिनाभर राहणार आहे.

मेष

रवीचे भ्रमण द्वितीयातुन तृतीयात राहणार असुन शुक्र सुद्धा द्वितीयातुन तृतीयात भ्रमण करणार आहे.बुध महिन्याच्या सुरवातीला तृतीयात राहणार असुन महिन्याच्या मध्यानंतर बुध चतुर्थात जात आहे.महिन्याच्या शेवटी मंगळ आणि बुध यांची युती होत आहे.शुक्राचे अष्टमात भ्रमण होत असुन शनी आणि केतु नवमात भ्रमण करत आहे.एकंदरीत महीना उत्तम प्रगतीचा राहील.प्रगतीसाठी नवी दारे उघडी होतील.महिना अखेरीस तुम्हाला परिस्थितीवर नियंत्रण मिळवुन तुमच्या मनासारखे काम करता येईल.तुम्हाला प्रचंड कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. महिन्याच्या उत्तरार्धाचा काळ अनुकुल राहील.

आरोग्य : आरोग्याबाबतीत हलगर्जी पण करून चालणार नाही.योग्य व्यायाम आणि स्वास्थपुर्वक आरोग्यशैली नित्य नियमाने पाळली पाहीजे.संपत असलेल्या उन्हाळ्या मुळे शेवटी उन्हाचा तडाखा जास्त जाणवेल.महिन्याच्या मध्या नंतर जी काही दुखणी असतील त्यांना आराम मिळेल.आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

आर्थिक : आर्थिक पातळीवर हा महिना काहीसा संमिश्र राहील काही प्रमाणात खर्च काही प्रमाणात स्थिरता काही प्रमाणात देणी.अशा प्रकारे हा महिना आर्थिक स्तरावर विभागलेला राहील.महिन्याच्या सुरवातीला काही अनावश्यक खर्च समोर उभे राहतील ,कर्ज किवा इतरांची  देणी द्यावी लागतील त्यानंतर काही काळ आर्थिक स्थिरता लाभेल.गुंतवणुकीचे नवीन पर्याय शोधावे आणि योग्य ठिकाणी गुंतवणुक करावी.

नौकरी : कामाच्या ठिकाणी कष्ट करून दिलेले कार्य पुर्णत्वास न्यावे लागेल.कामाच्या ठिकाणी परीक्षेचा काळ राहील.आपल्या अविरत परिश्रमाने तुम्ही वरिष्ठाची मन जिंकु शकता जेणेकरून पुढील वाटचालीसाठी आपल्याला त्याची मदत होऊ शकते.तुमच्या प्रगती साठी उत्तम असा काळ आहे.आपल्या  प्रगती साठी उत्तम असा काळ आहे.

व्यवसाय : व्यवसायात उत्तम प्रगतीचे योग संभवत आहेत.उतर्रार्धात व्यवसायात चांगले प्रदर्शन करण्याची उत्तम संधी लाभत आहे.भागीदारासोबत व्यवसायात अर्थार्जना साठी नवीन मार्ग शोधाल आणि त्यात यशस्वी व्हाल.तुमचे सकारात्मक विचार आणि सकारत्मक पद्धतीने राबविलेल्या योजना तुमच्या यशाचे रहस्य असणार आहे.

नाते संबंध : नात्यांबाबतीत हा महीना सुरवातीला काही काळ थोडा त्रासदायक राहील. घरातील ज्येष्ठ्य मंडळी सोबत काही वाद होण्याची शक्यता आहे.भावंडासोबत एखाद्या गोष्टी मुळे वैचारिक मतभेद होऊ शकतात.त्यामुळे जर एखादे धार्मिक कार्य आयोजिले असता सगळ्यांना एकत्र येण्याची संधी प्राप्त होऊन नातेसंबंध सुधारतील.

विद्यार्थी : हा महीना तुमच्या प्रगतीसाठी पूरक असा काळ आहे महिन्याच्या मध्या नंतर सुरु झालेली महाविद्यालये आणि त्याच प्रमाणे नवीन अभ्यासक्रम यांचा आनंद राहीला आणि उत्साहाने कामाला लागल्यास अभ्यासाची गोडी सुद्धा निर्माण होईल.

वृषभ

रवी प्रथम स्थानातुन महिन्याच्या मध्या नंतर द्वितीयात जात आहे.शुक्राचे राशीत प्रवेश होत असुन मंगळ आणि बुध अनुक्रमे द्वितीयातुन तृतीयात भ्रमण करतील.राहु द्वितीयात भ्रमण करत आहे.सप्तमात गुरु चे वास्तव्य आहे.अष्टमात शनी आणि केतु एकत्र आहेत.एकंदरीत ग्रहमान आनंदी आणि सुखकारक राहील.धनस्थानात असलेल्या ग्रहांच्या हालचालींमुळे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

आरोग्य : प्रतिकार शक्ती कमी पडल्यामुळे आरोग्याच्या काही किरकोळ तक्रारी वगळता तब्येत उत्तम राहील.उष्णतेमुळे थोडेसे काही त्रास संभवतील  पण योग्य उपाय योजल्यास लवकर बरे व्हाल.घरातील ज्येष्ठ मंडळींना जपावे लागेल त्यांच्या आरोग्याच्या एखाद्या तक्रारी संभवु शकतात.एखादी शस्त्रक्रिया करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते.

आर्थिक : या बाबतीत खर्चिक महिना असणार आहे.आरोग्यावर खर्च होईल जर आर्थिक मदतीची गरज पडल्यास,एखादे कर्ज सुद्धा मंजुर होईल.गुंतवणुकीचे यथा योग्य मार्ग सापडतील.एखादी जुनी ठेव मोडावी लागेल आणि त्यातुन एखादा मोठा खर्च भागवावा  लागेल.

नौकरी : संयम पुर्वक प्रयत्नात्मक कृती केल्यास यश तुमचेच आहे.सगळ्यांसोबत योग्य तो  व्यवहार केल्यास आणि आपल्या प्रयत्नांवर लक्ष ठेवल्यास तुमच्यासाठी योग्यच असणार आहे.तुमच्या कामाबाबत खबरदारी म्हणजेच सावधान राहिल्यास कार्यालयीन राजकरणाचा  तुम्हाला त्रास होणार नाही.

व्यवसाय : व्यवसायात उत्तम प्रगती राहील.व्यवसायात जर कोणी भागीदार असेल तर त्याच्या मदतीने उत्तम प्रगती साधण्याचे योग आहेत.एखादा नवीन कल्पना सुचेल आणि मार्ग मिळेल पुढील मार्गक्रमण सुलभ होईल.एकटे व्यवसाय करणाऱ्यांना खुप मेहनत घ्यावी लागेल.काम हाती मिळाल्यामुळे उत्साहाने काम करता येईल.

नाते संबंध : कौटुंबिक सौख्या साठी अनुकुल असा काळ असुन घरात एकंदरीत आनंदी वातावरण राहील.जोडीदारा सोबत उत्तम संबंध राहतील.कौटुंबिक सुखाच्या बाबतीत या महिन्यात आनंदी आनंद असे वातावरण आहे.सगळ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल त्यामुळे उत्तम मासिक समाधान मिळेल.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख चढता राहील.नवीन अभ्यासक्रमाच्या गोष्टी शिकायला मिळतील नवीन गोष्टींमुळे गोंधळुन न जाता त्या समजून घेतल्यास प्रगतीसाठी अत्यंत पुरक असे वातावरण राहील.

मिथुन 

रवी महिन्याच्या मध्या नंतर राशीत येत आहे.राशीत या वेळी अनेक ग्रहांचे भ्रमण आणि वास्तव्य असणार आहे.मंगळ आणि बुध प्रथम स्थानातून द्वितीयात भ्रमण करतील.षष्ट स्थानात गुरु चे भ्रमण असुन सप्तम स्थानात शनी आणि केतु यांचे भ्रमण आहे.आणि व्येय स्थानात शुक्राचे भ्रमण राहील त्यामुळे एकंदरीत हा महिना काहीसा ताण वाढवणारा राहील. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला इच्छा नसताना सामोरे जावे लागेल.

आरोग्य : प्रकृती उत्तम राहील.महिनाभर उत्तम आरोग्याची तुम्हाला साथ लाभणार आहे.त्यामुळे आरोग्या बाबतीत निर्धास्त रहावे आणि बदलत्या वातावरणाचा जास्त काही फरक पडणार नाही.उत्तम आरोग्याच्या साथीने उत्तम प्रगती साध्य करता येईल.घरातील वडिलधाऱ्या मंडळींच्या तब्येतीला जपावे,जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे.

आर्थिक : आर्थिक बाबतीत काहिसा समाधानकारक महिना राहील नवीन गुंतवणुकीचे पर्याय शोधावेत.आर्थिक गुंतवणुकीचे पर्याय शोधल्यास आगामी काळासाठी त्याची तजवीज करून ठेवली असल्यामुळे तुमची बचत तुमच्याच कमी येईल.

नौकरी : नौकरीत वरिष्ठा कडून कौतुक होईल.नौकरीत वरिष्ठा कडुन कौतुक झाल्यामुळे हुरुळून न जाता नवीन जोमाने कामाला लागाव लागेल.बढती साठी अजुन प्रयत्न करावे लागतील.

व्यवसाय : व्यवसाय करताना सगळ्यांचा सर्वांगीण विचार करून सगळ्यांना समजुन घेतल्यास प्रगती करण्यासाठी सोपे जाईल .आपल्या महत्त्वकांक्षा जपा परंतु आपल्या सहकार्यांचा सुद्धा विचार करा.प्रत्येक काम प्रयत्नांची पराकाष्ठा करून पूर्ण करावे लागेल.

नाते संबंध : कुटुंबातील मंडळीना योग्य तो वेळ दिला असता आपले संबंध सुधारण्यास मदत होईल.घरातील लहान मंडळी आणि सगळ्यांना त्यांच्या परीने समजुन घेण्याचा प्रयत्न केला असता नात्यातील दृढता वाढीस लागेल.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांना शेक्षणिक प्रगती साठी जोमाने अभ्यासाला लागाव लागेल.प्रत्येक स्पर्धेसाठी तयार असावे.स्वतः वर अति विश्वास न ठेवता आपल्या क्षमता जाणुन परिक्षेला सामोरे जावे.

कर्क

रवी लाभातून व्येयात भ्रमण करणार आहे.महिन्याच्या मध्याला बुध आणि मंगळ यांचा व्येय स्थानातुन राशीत प्रवेश होणार आहे.पंचमात गुरु आणि षष्टात शनी आणि केतु यांचे भ्रमण व लाभ स्थाना त शुक्राचे भ्रमण एकंदरीत महिन्याचा उत्तरार्धात चांगला राहील.जेवढ झेपेल तेवढच जबाबदाऱ्या घ्याव्यात जास्त त्रास करून घेऊ नये.

आरोग्य : आरोग्य उत्तम राहील.ताण तणाव दुर करण्यासाठी मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यान धारणा करावी लागेल.लहान-सहान तक्रारी वगळता आरोग्याच्या काही विशेष तक्रारी जाणवणार नाही.

आर्थिक : आर्थिक व्यवहार करताना जरा जपुन व्यवहार करावा.एखादे कर्ज मंजुर होण्याची शक्यता आहे.पैसा मिळेल पैशाचे यथायोग्य नियोजन केल्यास खर्चाचा ताळमेळ बसेल योग्य ठिकाणी विचारपुर्वक पैसे खर्च केल्यास जास्त उत्तम राहील.

नौकरी : नौकरीच्या ठिकाणी जुळवून घेतल्यास उत्तम राहील.कामाच्या ठिकाणी आपली महत्त्वाची कामे योग्य वेळेत पूर्ण करा.आपल्या क्षमते पेक्षा जास्तीच कुठलच काम या कळत घेऊ नका.विचारपुर्वक आणि मेहनतीने वेळेत कामे पूर्ण करा.

व्यवसाय : तुमच्या कामामुळे विरोधकांना आश्चर्य चकित करता येईल.आपल्या कामातील चपळाई बघता काम उत्तमरीत्या पार पडल्यास आपल्याला एखादे नवीन काम मिळण्याची सुद्धा संधी आहे.तर कुठेही हलगर्जी पणा न करता योग्य पद्धतीने काम केल्यास यश तुमचेच आहे.

नातेसंबंध : घरामध्ये एखादे धार्मिक कार्य घडुन येईल.धार्मिक कार्य घडल्यामुळे नातेवाईकांसोबत गाठी भेटी होतील त्यामुळे सगळ्यांसोबत सुसंवाद होईल आणि नाते अजुन दृढ होण्यासाठी मदत होईल.

विद्यार्थी : अभ्यासाची सुरवात जोमाने आणि आनंदाने होईल.उन्हाळ्यातील जपलेले छद काही काळ बाजुला सारावे जेणेकरून अभ्यासावर लक्ष देऊन नवीन गोष्टी समजून घेता येतील.

सिंह

रवी चे दशमातून लाभत भ्रमण होत असुन चतुर्थात गुरु पंचमात शनी केतु ची युती दशमात शुक्र लाभत राहु त्याचप्रमाणे मंगळ आणि बुध यांचे लाभातून व्येयात भ्रमण होत आहे.एकंदरीत ग्रहमान पाहता तुमच्या नैसर्गिक गुणांना जसे कि तुमचा आत्मविश्वास आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक समस्येला आपल्या आत्मविश्वासाने सामोरे जावे.

आरोग्य :उत्तम आरोग्य लाभल्यामुळे आरोग्याच्या काही तक्रारी जाणवणार नाहीत.उत्तम आरोग्य लाभल्यामुळे त्याचा लाभ घेऊन योग्य ती कामगिरी करावी.ज्येष्ठ मंडळींच्या तब्येतीला जपावे.

आर्थिक : आर्थिक व्यवहार जरा जपुन करावेत कुठलीही गुंतवणुक करताना योग्य चौकशी आणि शहानिशा करून गुंतवणुक करावी.

नौकरी : नौकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे आदेशाचे यथायोग्य पालन करावे आणि आपली नियोजित कामे वेळेत पूर्ण करावी.आपल्या कामाला वरिष्ठांकडून कौतुक मिळाले नाही तरी चालेले पण तुम्ही आपल्या कामाशी प्रामाणिक राहुन आत्मविश्वासाने सातत्याने पुढे वाटचाल करत राहिली तर तुमच्यासाठी अनुकुल अशी फळे तुम्हाला मिळतील.

व्यवसाय : या बाबतीत एकंदरीत ग्रहमान असे सांगते की,आपण जी वाट आपल्यासाठी निवडली आहे त्या वाटेवर परिश्रम पूर्वक सामोरे जावे लागेल.कितीही अडचणी आल्या तरी त्या वाटेवरून बधु नये.आज नसेल तरी तुमच्या परिश्रमाचे फळ तुम्हाला नक्की मिळणार.

नातेसंबंध : नातेवाईकांसोबत गाठी भेटी होऊन आणि आनंददायी आणि उल्हासित वातावरण राहील.

विद्यार्थी : नवीन वर्षासाठी नव्या जोमाने अभ्यासाला लागावे लागेल.अभ्यासाच्या प्रगती साठी आपल्या आकलन शक्तीच्या कक्षा वाढवाव्या लागतील. यश मिळवण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करण गरजेचे ठरणार आहे.

कन्या

रविचे भ्रमण नवमातुन दशमात होत असुन तृतीयात गुरुचे भ्रमण आहे चतुर्थात शनी आणि केतु यांचे भ्रमण नवमात शुक्राचे भ्रमण आहे राहु दशम स्थानी असुन मंगळ आणि बुध अनुक्रमे दशमातून लाभत जात आहे.कोणताही निर्णय घेताना काळजीपुर्वक घेतला तर तुम्हाला लाभच होईल. ग्रहांचे भ्रमण आणि तुमचे प्रयत्न यांची योग्य सांगड घातल्यास प्रगतीची दारे खुली होतील.

आरोग्य : कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहील.घरातील लहान मंडळींना जपावे उन्ह पावसामुळे त्यांना एखादा संसर्ग रोग होऊ शकतो काळजी घ्यावी.

आर्थिक : महिन्याच्या उतरार्धात काही खर्च करावे लागतील.आर्थिक बाबतीत काटकसर करावी लागेल.योग्य ठिकाणी गुंतवणुक केल्यास काही लाभ होईल.गुंतवणुक करताना योग्य सल्ला घेऊन गुंतवणुक करावी.

नौकरी : स्वतः ला आपल्या कामा मध्ये गुंतवून घ्या जेणेकरून इतर गोष्टीकडे आपल लक्ष जाणार नाही आपण आणि आपल काम असे समीकरण ठेवावे ज्याचा तुम्हाला फायदा होईल.

व्यवसाय : व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील.आपण एखादे कौशल्य विकसित केल्यास त्याचा आपल्या व्यवसायासाठी नक्कीच वापर होईल आणि जेणेकरून आपले वेगळेपण सिद्ध होईल.

नातेसंबंध : घरात नातेवाईकांची गाठभेट होईल.खूप दिवसांनी भेटल्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांनी स्वतःच्या ध्येय पूर्तीसाठी झपाटून अभ्यासाला लागलच पाहीजे.नवीन शेक्षणिक वर्षात आपल्याला आपल्या प्रगतीचा आलेख वाढवावा लागेल.स्पर्धेत टिकायचं असेल तर मेहनत हि घ्यावीच लागेल.

तुळ 

रवीचे भ्रमण अष्टमातून नवमात असणार आहे.द्वितीयात गुरु आणि तृतीयात शनी आणि केतु यांचे भ्रमण असणार आहे.अष्टमात रवी बरोबर शुक्राचे सुद्धा भ्रमण असणार आहे.नवमात राहु आणि त्याच बरोबर मंगळ सुद्धा त्यांच्या सोबतीला बुध सुद्धा आहे.मंगळ आणि बुध अनुक्रमे नवमातुन दशमात भ्रमण करणार आहेत.एकंदरीत महिना चांगला जाईल.आपल्या चांगल्या कामांमध्ये सुद्धा कुणाला दुखवू नका.

आरोग्य : घरातील महिलांना सर्दी किंवा संसर्ग जन्य रोगांपासून जपावे.सकाळ ची प्रसन्न हवा आपल्याला एका प्रकरचे उत्तम आरोग्य प्रदान करते त्यामुळे सकाळी उठून मोकळ्या हवेत विहार केल्यास उत्तम आरोग्य लाभेल.

आर्थिक : या महिन्यात आर्थिक परिस्थिती सुधारलेली असेल आणि त्यामुळे काही खर्च पण वाढतील.

नौकरी : वरिष्ठांची मर्जी राखल्यास म्हणजेच वरिष्ठ च्या मार्गदर्शना खाली काम केल्यास उत्तम राहील.आपल्या कामात काही चूक होणार नाही याची काळजी घ्या स्वतःच्या कामा बाबत दक्ष रहा.

व्यवसाय : एखाद्या  कामासाठी एखादे कर्ज घेण्याची सुद्धा वेळ येऊ शकते.तर काम यथा योग्य पुर्ण केल्यास तुम्हाला अजुन काम मिळण्याची पण दाट शक्यता आहे.

कुटुंब : घरातील वातावरण आनंदी राहील.त्यामुळे मानसिक सौख्य लाभेल.कोनही कसे जरी वागले तरी तुम्ही स्वतः वर संयम ठेवल्यास शांततेने गोष्टी सोडवल्या जाऊ शकतात.

विद्यार्थी : विद्यार्थीनां मनासारखे यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल.विद्यार्थ्यांना नवीन अभ्यास्क्रमची जोरदार तयारी सुरु करावी लागेल.

वृश्चिक 

रविचे भ्रमण सप्तमातून अष्टमात असणार आहे.गुरु महिनाभर राशीतच असणार आहे.शनी व केतु द्वितीयात असणार असुन सप्तमात शुक्र असणार आहे.अष्टमात बुध आणि राहु व मंगळ असणार आहे.त्याच बरोबर मंगळ आणि बुध अष्टमातून नवमात भ्रमण करणार आहे.आपल्या अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्याचे यथा योग्य पालन केल्यास कर्तव्य दक्ष म्हणुन सगळ्यांसमोर आपली उत्तम प्रतिमा तयार होईल.

आरोग्य : संपत जाणारा उन्हाळा आणि पावसाची लागलेली चाहुल त्यामुळे वातावरणात काहीसा बदल होईल त्यामुळे तब्येतीला जपावे.वाहन चालवताना स्वतः ला जपावे.

आर्थिक : आर्थिक बाबतीत समाधानकारक महिना राहील.योग्य ठिकाणी गुंतवणुक करून ठेवण्यास काही हरकत नाही गुंतवणुक करताना योग्य ती काळजी घेऊन सगळ्या नियम आणि अटींची पुर्तता करावी.

नौकरी : नौकरीच्या ठिकाणी आपण आणि आपले काम असे धोरण ठेवल्यास उत्तम राहील.कार्यलयीन कामकाज योग्य वेळेत पुर्ण केल्यास वरिष्ठांचे धोरण तुमच्या प्रती बदलेल.कुठल्याही प्रकारचे वाद टाळावेत जेणेकरून तुम्ही कुठल्याही वादात अडकणार नाही याची दखल घ्यावी.

व्यवसाय : व्यवसायात उत्तम प्रगती साधता येईल.कुठलाही व्यवहार करताना जरा जपुन करावा कुठल्याही प्रकारच्या व्यवहारात लेखी तजवीज करणे अत्यंत महत्त्वाचे असते.हलगर्जी पणा न करता योग्य व्यवहार केल्यास आपल्याला आगामी कळत त्याचा उपयोग होईल.

नाते संबंध  : कुटुंबातील समस्या संपुन जातील.वेवाहिक संबंधात सौख्य कारक महिना राहील.जी काही उणी दुणी असतील ती बसुन बोलले असता सहज सोडवल्या जाऊ शकतात त्यामुळे कुटुंबाला योग्य तो वेळ दिल्यास त्यांच्या प्रती असलेली आपली काळजी त्यांना दिसुन येईल.सकारात्मक आणि उत्तम संवाद या दोन महत्त्वाच्या बाबीने नाते टिकवुन ठेवता येईल.

विद्यार्थी : शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्यामुळे आपल्या ला झेपेल तेच अभ्यासक्रम आपल्यासाठी निवडावे प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश तुमचेच आहे.

धनु 

रवी चे भ्रमण षष्टातुन सप्तमात असणार असुन शनी आणि केतु यांचे वास्तव्य राशीतच असणार आहे.षष्टात शुक्र आणि सप्तमात राहु त्याच बरोबर मंगळ आणि बुध परंतु बुध आणि मंगळ महिन्याच्या मध्यानंतर अष्टमात भ्रमण करणार असुन व्येय स्थानी गुरु चे भ्रमण आहे.एकंदरीत ग्रहमान पाहता कुठलाही निर्णय घेताना आगामी काळाचा अंदाज घेऊन सावधगिरीने निर्णय घ्या.

आरोग्य : स्वत: सोबत इतरांच्या तब्येतीला पण जपावे.एकंदरीत महिना पाहता आपल्याबरोबर इतरांची काळजी करायला लावणारा महिना आहे.मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान धारणा करावी जेणेकरून मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल.

आर्थिक : आर्थिक लाभ होतील आणि समाधानकारक महिना राहील.आर्थिक प्रश्न मार्गी लागतील एकंदरीत गरजे  पुरती आर्थिक तजवीज या महिन्यात होईल.जेणेकरून आर्थिक कमतरता जाणवणार नाही.

नौकरी : कामाच्या ठिकाणी नवीन नवीन आव्हाने समोर येतील त्यामुळे कुठलेही आव्हान स्वीकारताना जरा जपुन त्याचा स्वीकार करा जेणेकरून घेतलेली जबाबदारी कर्तव्य दक्षतेने आपणास पाळता येईल.कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतल्यास त्याचा तुम्हाला आगामी काळात फायदा होईल.

नाते संबंध : घरात एखादे सगळ्यांच्या गाठी भेटीचे कार्यक्रम होतील सगळ्यांसोबत सहभागी झाल्यास आनंद द्विगुणीत होईल.घरातील वडिलधाऱ्या मंडळींचा यथोचित सन्मान आणि आदर केला असता सगळ्यांच्या कौतुकाचे तुम्ही धनी व्हाल.वेवाहिक जीवनात जोडीदाराचे मन राखता आले तर उत्तमच.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांना अभ्यासाची जोमाने सुरवात करावी लागेल.नवीन अभ्यासक्रमाला नीट समजून घेतले असता सुरवात जरी अवघड वाटली तरी प्रयत्न केल्यास यश तुमचेच आहे.

मकर

रवी चे भ्रमण षष्टातुन पंचमात असणार आहे.शुक्र पंचम स्थानी भ्रमण करत आहे तर षष्ट स्थानी राहु मंगळ आणि बुध यांचे भ्रमण असुन महिन्याच्या मध्यानंतर मंगळ आणि बुध सप्तमात भ्रमण करत आहेत.लाभत गुरु आणि व्येयात शनी आणि केतु यांचे भ्रमण होत आहे.जो काही निर्णय घ्याल त्या दिशेने काम सुरु केल्यास यश लाभेल असे एकंदरीत ग्रहमान सांगत आहे.त्यासाठी मानसिक स्थिरता जपावी लागेल.

आरोग्य  : मानसिक आरोग्य शांत राहण्यासाठी ध्यान धारणा अथवा योगा अवलंबिल्यास मानसिक धैर्य वाढेल.घरातील ज्येष्ठ मंडळींच्या तब्येतीला जपावे त्यांचे एखादे जुने दुखणे डोके वर काढण्याची दाट शक्यता आहे.

आर्थिक : महिन्याची सुरवात चांगली राहील आणि महिन्याच्या मध्यापर्यंत सगळ काही सुरळीत राहील महिन्याच्या शेवटी काही आकस्मिक खर्च समोर उभे राहतील त्यामुळे महिन्याचा शेवट खर्चिक असणार आहे.

नौकरी : नौकरीच्या ठिकाणी आनंददायी वातावरण राहील.नौकरीत मेहनतीशिवाय पर्याय नसणार आहे त्यामुळे आपल्या  कामालाच देव मानुन पुढे जात रहाव लागेल.आपल्या कामामुळे खुश होऊन वरिष्ठांची मर्जी संपादन करून बढती मिळवता येईल.कामाच्या ठिकाणी बदलणाऱ्या नियमांचे काटेकोर पालन केले असता उत्तम राहील.नियमांशी तडजोड करू नये.

व्यवसाय : व्यवसायात काही बदल करावे लागतील जेणेकरून अर्थार्जनासाठी नवीन पर्याय शोधुन विस्तार करता आला तर उत्तम राहील.भागिदारीच्या व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणुक केल्यास नफा निश्चित मिळेल.एखादे कर्ज घ्यावे लागेल.

नातेसंबंध : कुटुंबात सगळ्यांशी जुळवून घ्यावे लागेल.जोडीदारासोबत पण समजुतीने घ्यावे लागेल अथवा ताणल्याने तुटेल अशी स्थिती दिसत आहे.नातेसंबंध जपावे लागेल.

विद्यार्थी : नवीन सुरु झालेल्या अभ्यासक्रमाला सामोरे जावे लागेल.नवीन  उत्साहाने सामोरे जावे लागेल.

कुंभ 

रविचे भ्रमण पंचामातुन चतुर्थात होत असुन शुक्र चतुर्थ स्थानी आहे.पंचमात राहु त्याच प्रमाणे मंगळ आणि बुध यांचे वास्तवूय आहे मंगळ आणि बुध हे षष्टात भ्रमण करणार आहे.दशम स्थानी गुरु आणि लाभत शनी केतु युती होत आहे.बदल हा शाश्वत असतो आणि त्याला आयुष्यात सामोरे जावे लागतेच बदलत्या काळानुसार बदललात तर आयुष्याची वाटचाल सुरळीत होते.

आरोग्य: आरोग्य उत्तम राहील.कुटुंबातील सर्व मंडळींचे सुद्धा आरोग्य उत्तम राहील.स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी नित्य नेमाने योगा आणि प्राणायाम केल्यास आरोग्यात बळकटी संभवेल.

आर्थिक : आर्थिक आवक चांगली राहील.शांततेने विचारपुर्वक व योग्य आढावा घेऊन गुंतवणुकीचे योग्य आणि वेगळे पर्याय शोधल्यास आगामी काळासाठी योग्य आर्थिक तजवीज राहील.

नौकरी : नौकरीच्या ठिकाणी संयम पुर्वक आपले श्रम वाढवावे लागतील कदाचीत त्यामुळे वरिष्ठाची मर्जी संपादन करता येईल आणि नौकरीत बढतीचे योग संभवतील.नौकरीच्या ठिकाणी प्रगती करण्यासाठी पुरक असा काळ आहे.आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचे यथा योग्य पालन केल्यास तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

व्यवसाय : आपल्या प्रति स्पर्धी किवा आपल्या शत्रूंवर विजय मिळवता येईल आणि त्यामुळे उत्साह वाढेल.आपल्या कामाचा वेग वाढवावा लागेल जेणेकरून नवीन काम मिळतील.आणि कामात व्यवसायात प्रगती करून व्यवसाय वाढवता येईल.

नातेसंबंध : कौटुंबिक सौख्य वाढेल.कुटुंबातील मंडळींसोबत वेळ घालवावा लागेल.कोणाच्याही हलक्या गोष्टींवर विश्वास न ठेवता सगळ्यांसोबत म्हणजेच आपल्या नातेवाईकांसोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा.संयम ठेवल्यास सगळ काही सुरळीत होऊ शकत.पाल्यांकडून आनंदाची वार्ता कळेल.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांची खेळातली आणि अभ्यासातली प्रगती उत्तम राहील.सकारात्मक वातावरणामुळे अभ्यासात प्रगती होईल.

मीन 

रविचे भ्रमण चतुर्थातून तृतीयात होत आहे शुक्र रवी बरोबर द्वितीयातच असणार आहे.राहु तृतीयात असुन मंगळ आणि बुध अनुक्रमे चतुर्थातुन पंचमात जाणार आहे.गुरु नवमात असुन शनी आणि केतु दशमात असणार आहे.एकंदरीत काहीसे अस्थीर वातावरण असणार असुन तुम्हाला शांतता आणि संयमाने सगळ हाताळाव लागेल.महिनाभर उत्तम कार्य केल्यास आपल्या मनाच्या इच्छा पूर्तीचा महिना आहे.

आरोग्य : वाढत्या कामामुळे एखादा ताण वाढू शकतो त्यामुळे मानसिक दडपण जानवेळ.छोट्या मोठ्या तक्रारी वगळता आरोग्याच्या विशेष काही तक्रारी जाणवणार नाही.ज्येष्ठ मंडळींच्या तब्येतीची काळजी घ्यावी त्यांच्या तब्येतीला जपावे.

आर्थिक : आर्थिक बाबतीत हा महिना समाधान कारक राहील.या  महिन्यात स्वावलंबन स्वीकाराव कोणालाही  उधारी देऊ नये आणि कोणाकडुन हि उधारी घेऊ नये.असे धोरण ठेवावे.

नौकरी : कामाच्या ठिकाणी कायदेशीर बाबी योग्य पद्धतीने हाताळल्यास तुम्हाला काही अडचणी जाणवणार नाही.कामाच्या ठिकाणी जरा जपुन राहिल्यास अडचणींचा सामना करावा लागणार नाही.आपल्या कामावर वरिष्ठांची नजर राहील त्यामुळे काम करताना योग्य पद्धतीने केल्यास तुम्हाला वरिष्ठा च्या वागण्याचा त्रास होणार नाही.तुमच्या परिश्रमामुळे त्यांना तुमच्या बद्दल चांगली प्रतिमा बनण्यास मदत होईल.

व्यवसाय : व्यवसायात काही बदल होतील अचानकपणे झाल्यामुळे जमवून घेताना थोडी दमछाक होईल.व्यवसायासाठी काही व्यवसायिक प्रवास घडतील.सहकाऱ्यांची व्यवहारात मदत होईल.आपल्या परिश्रमाने आपल्या समस्यांवर / अडचणींवर मात करावी लागेल.

नातेसंबंध :वैवाहिक नात्यात समजुतदार पणा दाखवल्यास नाते अत्यंत सुखकारक राहील.आपला अहंकार बाजुला ठेवण समोरच्या व्यक्तीचे योग्य पद्धतीने एकून घेतल्यास  समोरच्याची बाजु समजून घेण्यास मदत होईल.

विद्यार्थी: विद्यार्थ्याना एखादी शुभ वार्ता कळेल.निकाल उत्तम लागल्यामुळे  नवीन अभ्यासक्रमासाठी उत्साहाने कामाला लागाला तर करिअर च्या दृष्टीने योग्य पाऊले उचलावीत.

शुभम भवतु