खग्रास चंद्र ग्रहण : अर्थ आणि बोध.

सुर्यग्रहण आणि चंद्र ग्रहण या जरी खगोलीय घटना असल्या तरी या ग्रहणांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम हे अनुभवायला येतातच,अवकशातील घटना,ब्राम्हंडातील संकेत,वैश्विक ऊर्जा.पृथ्वीवरील मानवीय देह आणि मन याची विज्ञाननिष्ठ सांगड घातल्यास बऱ्याच गोष्टींचा उलगडा प्राचीन काळापासून आपल्या पुर्वसुरींनी ज्ञान समृद्ध करून ठेविला आहे.

आषाढ शुक्ल पौर्णिमा शुक्रवार २७ जुलैला होणारे खग्रास चंद्र ग्रहण ही एक अवकाशीय घटना जरी असली तरी तिचा अर्थ व बोध ज्ञानपिपासुनी करून घेतल्यास कल्याणप्रद नक्कीच आहे.ग्रहणाचा वेध आरंभ दुपारी एक पासुन सुरु होत आहे.प्रखर वेध सायंकाळी ५ नंतर आहे.बाळ,वृद्ध तसेच गर्भवती महिलांनी व रुग्णांनी प्रखर वेध काळ पाळावेत.वेध काळात स्नान,अध्यात्म,ध्यान,मनन,चिंतन,जप,नित्यकर्म देवपुजा अथवा श्राद्ध करता येऊ शकते. ग्रहणाच्या मोक्षा पर्यंत हे वेध पाळावेत.या ग्रहणाचा पुण्यकाळ ग्रहणाच्या स्पर्श काळापासून ग्रहणाच्या मोक्ष काळापर्यंत राहील.

शुक्रवारी मध्यरात्री ११.५४ ला ग्रहण स्पर्श होत आहे,ग्रहणाचा मध्य मध्यरात्री १.५२ ला असेल तर मोक्ष पाहते ३.४९ मिनिटापर्यंत राहील.एकंदरीतच ग्रहणाचे पर्व सुमारे ३ तास ५५ मिनिटे असेल,अशी ही अद्भुत खगोलीय घटना संपुर्ण भारतातुन दिसणार आहे.शक्यतो ग्रहणाचा स्पर्श होताच स्नान करावे आणि होम-हवन,ध्यान-धारणा,देव,पुजा,तर्पण,श्राद्ध करावे,तसेच  ग्रहणमोक्ष होताच स्नान करावे व स्नान पश्चात दान करावे.नित्य मंत्रांच दिव्यात्त्व ग्रहण कला मध्ये सिद्ध करता येते.ग्रहण काळात निद्रा,भोजन आदि वर्ज्य आहे.

चंद्र ग्रहणाच्या वेळी पृथ्वी सुर्य आणि चंद्राच्या मधून मार्गक्रमण करत असल्यामुळे नैसर्गिक समीकरणावर प्रभावी परिणाम जाणवतो. हि एक खगोलीय घटना असल्यामुळे,सर्वसाधारणपणे हे तिघे एकाच परिघात कधीच नसतात. नाहीतर याचा नित्य अनुभव आला असता.चंद्र मनाचा कारक ग्रह असल्यामुळे ग्रहणाच्या आधीपासुनच याचे परिणाम अनुभवयाला मिळतात.भावनांची नकारात्मक आंदोलने आणि भयगंडाची झालेली लागण,यामुळे भावना अतिरेक उन्माद आणि संभ्रम अवस्था निर्माण होते.त्यामुळे याकाळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय आणि मोठे बदल करण्यास अनुकुलता नसते.मनात झालेली घुसळण सुप्त अवस्थेतील गुणधर्म जागृत करतात.

ग्रहणाच्या प्रत्यक्ष दिवशी याची तीव्रता अधिक अनुभवयास येते.याची तीव्रता हळुहळु ग्रहणाचा आवेग संपल्यावर कमी कमी होत जाते.मनाचा नैसर्गिक ताळतंत्र स्थिर ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यास त्रास होत नाही चंद्र ग्रहणाचा प्रत्येक राशीवर होणारा परिणाम हा भिन्न भिन्न प्रकारचा असतो हे ग्रहण तुमच्या राशी चक्राच्या कुठल्या स्थानी यावर त्याची तीव्रता आणि परिणाम अवलंबून असतात.

जन्म तारखेच्या किवा राशीच्या मध्ये होणारे ग्रहण हे जास्त तीव्र फळ देतात आयुष्यातील मोठ्या बदलला सामोरे जावे लागते.काही नित्य स्थितीला परिवर्तनाला सामोरे जावे लागते.ग्रहणाच्या काळात कोणत्या न कोणत्या प्रकारची असुरक्षितता जाणवते राशीत झालेले ग्रहण परिवर्तन चक्राला जागृत करते.ग्रहणाची राशीपरत्वे फळे खालील प्रमाणे राहतील.

मेष,सिंह व वृशिक आणि मीन  :- शुभ फळ प्राप्त होतील.

वृषभ ,कन्या ,कर्क व धनु:-  यांना संमिश्र फळ प्राप्त होईल तर,

मिथुन ,तुल, मकर व कुंभ: – यांना अशुभ फळ प्राप्त होतील.

|| शुभम भवतु ||